ग्रामीण भागातील तरुण -तरुणींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरोत्परी प्रयत्न झाले तर ग्रामीण आणि शहरी दरी नक्कीच कमी होईल- नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात. मेगाभरती मेळाव्यात ४० नामनिकत कंपन्यांचा सहभाग , आठ आजाराच्या वर विद्यार्थी सहभागी

साधारणतः  विकसित इंडिया आणि अविकसित ग्रामीण भारत असेच  चित्र आपल्या देशाचे आहे असे सांगताना , ग्रामीण भागातील तरुण -तरुणींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरोत्परी प्रयत्न झाले तर ग्रामीण आणि शहरी असी असलेली दरी नक्कीच कमी होईल असा विश्वास नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांनी व्यक्त केला. 

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या मेगा भरती मेळाव्याच्या उदघाट्न प्रसंगी डॉ. थोरात बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील , माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, एच. ए. एल. प्रवरा च्या संचालिका सुस्मिता माने,बोर्ड ऑफ  अँप्रेन्टीसशिप  ट्रेनिंग (BOAT) पश्चिम विभाग मुंबईचेडेप्युटी डायरेक्टर एन. एन. वडोदे,विखे पाटील पॉलिटेक्निचे माजी विद्यार्थी आणि सध्या औरंगाबाद डिस्टिलरी वालचंदनगरचे डायरेक्टर श्री करण यादव ,अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि वारले कंपनीच्या डेप्युटी जनरल मॅनेजर सौ. अनिता गुज्जर,  डीआरडीओ अहमदनगरचे श्री साबळे, विखे पाटील फौंडेशंनच्या  अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश नाईक ,संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, तांत्रीक विभागाचे संचालक डॉ.  के टी व्ही रेड्डी, कृषी संचालक डॉ.खेतमाळस, प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी  आदी मान्यवर उपस्थित होते. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे संचालक प्रा. धनंजय आहेर डॉ. आण्णासाहेब वराडे व प्रा. राजेंद्र निंबाळकर यांनी या मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी प्रास्ताविक केले. 

या मेगा नोकर भरती मेळाव्यासाठी व्हिआरडिई, इपिटोम, इटॉन इंडिया,बॉश्च, केप्लास्ट, होल्मकेके, व्हेरॉक इंजिनिअरींग, इके इलेक्ट्रॉनिक्स, बर्खार्ड कॉम्प्रेशन,एल अॅण्ड टी, एन एन नागा, आदी  ४० हून अधिक नामांकित बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय नामांकित अशा कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तर, सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मुलाखती मध्ये सहभाग घेतला. आणि आणखी तेव्हढेच विदयार्थी मुलाखती साठी या दिवशी हजार झाले. 

माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले कि, ग्रामीण तरुण् स्वयंपूर्ण झाला पाहिजे हे विखे पाटील यांचे स्वप्न होते. आज तरुण पिढी समोर रोजगारासाठी अनेक आव्हाने आहेत. अश्या परिस्थितीमध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी. करण यादव, सौ. अनिता गुज्जर यांनी आपले अनुभव सांगताना प्रवरेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच पाहिजे ती मदत केली जाईल असे सांगितले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विदयार्थीनिनी परिश्रम घेतले. 

चौकट :- * ना. सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या कि, ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार असतात मात्र, त्यांचा आत्मविश्वास कमी पडतो. म्हणूनच त्यांच्या मध्ये  आत्मविश्वासनिर्माण करण्याची आवश्यकता असून  ग्रामीण भागातील मुलांनीही आता घराजवळ नोकरी शोधण्यापेक्षा बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. * भरती मेळाव्यासाठी ४० हुन अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग * पाच हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मुलाखतीमध्ये सहभाग तर, आणखी सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनाही मुलाखतीमध्ये सामावून घेण्यात आले. 

नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करून जीवनात आवडत्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा- सिनेअभिनेते सयाजी शिंदे

 बालवयातील मुलांचा भविष्यातील कल ओळखून तो कल सर्वार्थाने विकसित करण्यासाठी प्रवरा पब्लिक स्कुल मध्ये उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक सुविधा या नव्या पिढीचे जीवन घडविणाऱ्या अस्याच असल्याचे सांगताना. तणावमुक्त वातावरण असलेल्या  या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करून जीवनात आवडत्या  क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा असा सल्ला प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी प्रवरा पब्लिक स्कुल मधील विद्यार्थ्यांना आपल्या सदिच्छा भेटी प्रसंगी दिला.        

अभिनेते सयाजी शिंदे हे साईबाबांच्या दर्शनानिमित्त शिर्डी येथे आले असता त्यांनी श्री अमोल जाधव आणि बाळासाहेब आहेर यांच्या समवेत प्रवरा पब्लिक स्कुलला सदिच्छा भेट दिली. या वेळी प्रवरा पब्लिक स्कुलमधील विविध विभागांना त्यांनी भेटी दिल्या. येथील प्रशस्त मैदाने,आणि अत्याधुनिक सुविधांचे त्यांनी कौतुक केले. वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना वसतीगृह जीवन अभ्यासासाठी सर्वात आदर्श वातावरण प्रदान करते. विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास करण्यासाठी अधिक वेळ आणि योग्य वातावरण मिळते असे सांगताना  तणावमुक्त मनाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करून जीवनात कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.      

प्राचार्य सयाराम शेळके यांनी सयाजी शिंदे यांचा पुष्प गुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. या वेळी उपप्राचार्य के.टी अडसूळ,एम ई जोसेफ,सौ. मीना जगधने,सौ. सिमा क्षिरसागर, एस व्ही गोडगे,एस.एस.झोटिंग भाऊसाहेब गटकळ यांचेसह विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्यासंख्येने उपस्तित होते.  

फोटो कॅप्शन :-प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी प्रवरा पब्लिक स्कुल ला दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी स्वागत करताना प्राचार्य सयाराम शेळके,उपप्राचार्य के.टी अडसूळ, श्री अमोल जाधव,बाळासाहेब आहेरएम ई जोसेफ,सौ. मीना जगधने,सौ. सिमा क्षिरसागर, एस व्ही गोडगे,एस.एस.झोटिंग भाऊसाहेब गटकळ आदी.

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील रासेयोचा ५०० वृक्षलागवड आणि संगोपन कार्यक्रम

मानवाने विकासासाठी निसर्गाचा केलेला ऱ्हास आणि पर्यायाने  निसर्गाचा ढासळलेला समतोल रोखण्यासाठी तसेच मानव जातीच्या उज्वल भविष्यासाठी पृथ्वीला तिचे गेलेले वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी  वृक्षसांगोपान होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन  कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांनी केले.

लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे यांच्या संकल्पनेतून रासयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण गायकर यांच्या मार्गदशनखाली एक विद्यार्थी एक झाड असा उपक्रम हाती घेऊन गोगलगाव रोड येथील परिसरात ५०० झाडांची  लागवड करण्यात आली या प्रसंगी डॉ. खेतमाळस बोलत होते. याप्रसंगी  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, संचालक अप्पासाहेब दिघे साहेब,लोणी खुर्द गावच्या सरपंच मनीषा आहेर,  उपसरपंच श्री. सुवर्णा घोगरे,ग्रामविकास अधिकारी संतोष ठिगळे,कामगार तलाठी श्री.कोळगे ,सामाजिक वाणीकरणाचे फॉरेस्ट रेंज अधिकारी बबनराव फटांगरे,  तालुका कृषि मंडळ अधिकारी नारायण लोळगे,सर्व शिक्षक वृंद आणि रासेयो चे स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.मधुकर खेतमाळस म्हणाले कि,पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंगोपन केले पाहिजे, वृक्षांमुळे शुद्ध हवा मिळते तसेच प्रदूषण रोखले जाते, आजारांपासून बचाव: दम्याची शक्यता ३३% कमी होते, हवा शुद्ध करून फुप्फुसाचा बचाव करते अश्या विविध फायदे होतात म्हणून वृक्षसांगोपान होणे गरजेचे आहे असे असे ते म्हणाले.            

राहता कृषि मंडळ अधिकारी  नारायण लोळगे म्हणाले की,   वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे ही   प्रत्येक नागरिकाची जाबाबदारी आहे आणि प्रत्येकाने ती स्वीकारली पाहिजे असे सांगताना कृषीजैव तंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.            

कार्यक्रम यशस्वी  पार पाडण्यासाठी प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वप्नील नलगे,प्रा.विशाल, केदारी,प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.मिनल शेळके,प्रा.स्वरांजली गाढे,प्रा.सारिका पुलाटे, प्रा.मनीषा आदिक, प्रा.श्रद्धा रणपिसे, रा.सो.यो चे सर्व स्वयंसेवक आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. 

फोटो कॅप्शन ;- लोणी येथील  कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील  राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे यांच्या संकल्पनेतून रासयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण गायकर यांच्या मार्गदशनखाली एक विद्यार्थी एक झाड असा उपक्रम हाती घेऊन गोगलगाव रोड येथील परिसरात ५०० झाडांची  लागवड करण्यात आली या प्रसंगी सहसचिव भारत घोगरे,डॉ.मधुकर खेतमाळस, संचालक अप्पासाहेब दिघे साहेब, सरपंच मनीषा आहेर,  उपसरपंच सुवर्णा घोगरे, संतोष ठिगळे,श्री.कोळगे , बबनराव फटांगरे,  नारायण लोळगे  आदी.

विजय दिन साजरा

कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून लोणी येथील पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी विद्यालयामध्ये कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्यगाथा आणि सुमारे दोन महिने चाललेल्या युद्धात कारगिलची शिखरे ताब्यात घेणाऱ्या भारतीय सैन्यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारे विविध कार्यक्रम आयोजित करून विजय दिन साजरा करण्यात आला असी माहिती प्राचार्य सुधीर मोरे यांनी दिली.            

प्रारंभी भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आला़. विद्यालयाचे माजी सैनिक डी. एस निबे यांनी. कारगिल युध्दाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. हरेश भांडारकर आदर्श रठोड , भूषण पारीख यांनी आपले मनोगत या वेळी व्यक्त केले. प्रथमेश साळुंके आणि अनुराग राऊत यांनी “चिठ्ठी अति है, या गीताद्वारे देशभक्तीपर भावना व्यक्त करून उपस्थितांची माने जिंकली. तसेच ऋषिकेश शिंदे,जयदीप दुशिंग, अवधूत गिमावकर यांनी देशभक्ती बात मार्गदर्शन केले.        

सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना सैनिकांच्या मुलांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देताना. त्यांनीही  वडिलांचा वारसा पुढे चालवावा असी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.सूत्रसंचालन प्रा. राजेश माघाडे आणि प्रा. रमेश दळे यांनी केले. यावेळी विद्यालयातील एन सी.सी. छात्रांना प्रशिक्षण देणारे ५७ महाराष्ट्र बटालियनचे सुबेदार सुरेंद्रसिंग आणि हवालदार गौतम जोशी यांचाही सत्कार करण्यात आला. कारगिल दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना भारतीय सैन्याची शौर्यगाथा दाखविणारा ‘एल.ओ सी (लाईन ऑफ कंट्रोल)’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

फोटो कॅप्शन :-लोणी येथील पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी विद्यालयामध्ये कारगिल विजयी  दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम सादर करताना विदयार्थी.