एन.सी.सी शिबिर ४०० मुली सहभाग

लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये ७ गर्ल्स बटालियन औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी शिबिरे सुरु असून एकून च्यार टप्प्यात होत असलेल्या या एकून बिरातील पहिल्या टप्प्यात महारातील सुमारे ४०० मुलीनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती लेप्टनंन्ट डॉ. राजेंद्र पवार यांनी दिली.

औरंगाबाद येथिल ग्रुप कमांडर ब्रिगेडियर श्री मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कमांडंट कर्नल अनुपम रंधावा सुभेदार मेजर बलवरसिंग,जसपालसिंग थापा,  गंगा,सोहनलाल ,अजय साहू ,श्री ताठे हे साबीर घेण्यासाठी काम करीत असून पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय थोरात,डॉ. रामचंद्र रसाळ, सौ. छाया गलांडे, एन.सी.सी ऑफिसर कॅप्टन सौ, सुजाता देव्हारे,यांच्या सहकार्याने एकून चार टप्यामध्ये हे शिबीर पार पडणार आहेत.

या शिबिरामधील पहिल्या टप्प्यात  सहभाग घेतलेल्या ४० मुलींची दिल्ली येथे होणाऱ्या ‘थल सेने कॅम्प साठी महाराष्ट्र निदेशलयातर्फे निवड करण्यात आली आहे. शिबिरामध्ये निवड झालेल्या मुलींसाठी विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. या मध्ये प्रामुख्याने फायरिंग ऑप्स्टाकल,म्याप रिडींग,टेन्ट पिचिंग,हेअल्थ व हायजीन, जजींग,डीस्टम्स,आदींचा समावेश आहे. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या मुलींना एन.सी.सी ए बी सी. प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र दिले जाते. तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कलागुनकार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते . विखे पाटील महाविद्यालयाच्या वतीने राहण्याची आणि जेवणाची सोया करण्यात अली. आहे.

फोटो कॅप्शन :- लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये ७ गर्ल्स बटालियन औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी शिबिरे सुरु असून एकून च्यार टप्प्यात होत असलेल्या या शिइकून बिरातील पहिल्या टप्प्यात महारातील सुमारे ४०० मुलीनी सहभाग नोंदवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जलशक्ती अभियाना साठी लोकसहभाग द्यावा- ना.सौ. शालिनीताई विखे पाटील

दुष्काळाची झळ बसलेल्यांनाच पाण्याची किंमत कळते. भविष्यात युध्द  पाण्यावरूनच होतील हे लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे यांनी ओळखले होते म्हणूनच पाण्यासाठी त्यांनी गावपातळी पासून देश पातळीवर पाणी प्राश्नावर आवाज उठविला होता.  असे सांगताना, आता प्रत्येक योजनांसाठी शासनावर  अवलंबून राहण्यापेक्षा जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, पारंपरिक व इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्र विकास यावर भर असलेल्या  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील  जलशक्ती अभियान राबविण्यासाठी लोकसहभाग द्यावा असे आवाहन  जिल्ह्या परिषदेच्या  अध्यक्षा ना.सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र (पायरेन्स ) अंतर्गत कृषी विभाग महाराष्ट्र  सहकार्याने आणि जलशक्ती मंत्रालय (पेयजल व स्वच्छता विभाग भारत सरकार )द्वारा संचालित बाभळेश्वर  केलेल्या जलशक्ती मेळावा व मिनी प्रदर्शन कार्यक्रमाचे उदघाट्न करताना ना.सौ शालिनीताई विखे पाटील  होत्या. या प्रसंगी रक्षामंत्रालयातील विभागीय आयुक्त आणि केंद्रशासनाने निरीक्षक अभिशांत पांडा जिल्हा कृषी अधिक्षक विलास नलगे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ . सुधाकर बोऱ्हाळे,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी भारत घोगरे,  आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ.संभाजी नालकर यांनी प्रास्थाविक केले. या वेळी डॉ. धनंजय धनवटे,संपतराव वाघचौरे,कैलास पठारे, उद्धवराव मोटे, संजय राऊत,प्रसाद देशमुख भागवतराव गागरे या जिल्ह्यातील मान्यवरांनी जलसंधारना संदर्भात आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये केलेल्या विविध कामांचे अनुभव मांडले.

ना.सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्याकी, एकीकडे महापूर तर, दुसरीकडे दुष्काळ.एकाच जिल्ह्यात भिन्न परिस्थिती असे चित्र का निर्माण झाले याचा विचार आता सर्वानीच करण्याची गरज असून,नवीन पाणी निर्मिती साठी लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी गाव पातळीपासून देश पातळीपर्यंत आवाज उठविला होता याची आठवण करून देताना,पाण्याची उपलब्धता,वापर आणि संधारणा  साठी शासनाचे व्यक्तिगत पातळीवर  अनुदान मिळत असले तरी, हेच काम संस्थांनी केल्यास त्यानाही जलसंधारणाच्या या कामासाठी प्रोस्थाहन म्हणून आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा व्यक्त करताना , नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ.  यशवंत थोरात यांनी भविष्यात देशातील मोठा भूभाग कोरडा होण्याची भीती व्यक्त केली असल्याचे त्या म्हणाल्या, डॉ. थोरात यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रवरा परिसरातील विविध संस्थांमध्ये पाणी वापर आणि बचतीच्या योजना राबवीत असल्याचे सौ. विखे यांनी सांगितले. पर्यावरण वाचविण्यासाठी सरकारच्या योजनांना प्रत्येकाने हातभार लावण्याची आवशकता असल्याचेही  त्या यावेळी म्हणाल्या.   

प्रवरा फार्मसी लोणी येथेराष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात

लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्र महाविद्याल्यामध्ये राष्ट्रीय क्रीडादीना निमित्त आयोजित केलेल्या  विविध विविध क्रीडास्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला असल्यावही माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.

प्रारंभी मेजर ध्यानचंदयांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले, त्या नंतर देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्याह स्ते “ फिटइंडियामुवमेंट “ या कार्यक्रमाचे लाईव प्रक्षेपण महाविद्यालयात करण्यात आले तसेच त्या अंतर्गत १०,००० पावले (स्टेप) चालण्याचा उपक्रमव १०० मीटर धावण्याची स्पर्धा महाविद्यालयाच्या प्रांगणात घेण्यात आली.

तसेच हॉकी चेजादुगार मेजरध्यानचंद यांच्या जन्म  दिना निमित्त दर वर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या अंतर्गत महाविद्यालयात इंटरक्लास क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,या मध्ये महाविद्यालयातील सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. 

फोटो कॅप्शन :-लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्र महाविद्याल्यामध्ये राष्ट्रीय क्रीडादीना निमित्त आयोजित केलेल्या  विविध विविध क्रीडास्पर्धांप्रसंगी प्राचार्या डॉ. प्रिया राव आणि विद्यार्थी. 

प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा भित्तीपत्रक स्पर्धेत भारतात प्रथम क्रमांक

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थी विक्रमसिंह विलास पासले याने सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिजनेस, पुणे द्वारा  आयोजित केलेल्या राष्ट्रीय ग्रीसमीट – २०१९ स्पर्धेमध्ये मध्ये ‘चित्रम’ विभागातील ‘स्मार्ट फार्मिंग’ या विषयावर सादर केलेल्या  भित्तीपत्रकास भारतातून  प्रथम पारितोषिक मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे यांनी दिली.             

या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून एकूण ३८  भित्तीपत्रिकांचे सादरीकरण करण्यात आले होते. यामध्ये  लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातून ५ विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता.यामध्ये विक्रमसिंह पासले याला प्रथम क्रमांकाचे रु.३००० पारितोषिक व प्रशस्तीपत्रक मिळाले.या यशासाठी त्याला प्रा. महेश चंद्रे, प्रा.श्रद्धा रणपिसे,डॉ.अभिजीत दसपुते व प्रा.सारिका पुलाटे यांचे मार्गदर्शन लाभले तर सुप्रिया काळे,कोमल कुलत,धनश्री टेके व शिवांजली वाघमारे यांचे विशेष सहकार्य लाभले.या स्पर्धेतून मिळालेल्या पारितोषिकाच्या रक्कमेतून शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील मुक्त ग्रंथालयास पुस्तके भेट देणार असल्याचे विक्रमसिंह पासले याने जाहीर केले.               

या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजीमंत्री  आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, आस्थापना संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. के. टी. व्ही रेड्डी, अतांत्रिक शिक्षण संचालक डॉ. दिगंबर खर्डे, कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, प्राचार्य ऋषिकेश औताडे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

फोटो कॅप्शन : सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिजनेस, पुणे द्वारा  आयोजित केलेल्या राष्ट्रीय ग्रीसमीट – २०१९ स्पर्धेमध्ये मध्ये ‘चित्रम’ विभागातील ‘स्मार्ट फार्मिंग’ या विषयावर सादर केलेल्या  भित्तीपत्रकास-लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील भारतातून  प्रथम पारितोषिक . मिळविलेला तृतीय वर्षातील विद्यार्थी विक्रमसिंह विलास पासले.