कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील चि.सौरभ केदार या विद्यार्थ्यांला कृषीथॉन कृषी गुणवंत पुरस्कार प्रदान

युवकांचा कृषी क्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने कृषी शिक्षणात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन आणि मिडीया एक्झिबिटर्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय कृषीथॉन कृषी प्रदर्शनात लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील सौरभ केदार या विद्यार्थ्यांला ‘कृषीथॉन कृषी गुणवंत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली.

कृषी जैवतंत्रज्ञान अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या आणि कृषी विस्तार, संशोधनाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामविकास आदी क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या उपक्रमशील अशा विद्यार्थ्यांना ‘गुणवंत कृषी विद्यार्थ्यांना पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतून प्राप्त झालेल्या ३५०० प्रस्तावांपैकी ४२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात चतुर्थ वर्षात शिकत आसलेला चि. सौरभ केदार या विद्यार्थिची निवड करून त्याला हा ‘कृषीथॉन कृषी गुणवंत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.

या विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण व आस्थापना संचालक डॉ. दिगंबर खर्डे, डॉ.हरिभाऊ आहेर, डॉ. विजय आहेर, कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषिकेश औताडे,प्राचार्य निलेश दळे,प्राचार्य रोहित उंबरकर तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

फोटो कॅप्शन :-ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन आणि मिडीया एक्झिबिटर्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय कृषीथॉन कृषी प्रदर्शनात लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान  महाविद्यालयातील  सौरभ केदार या विद्यार्थ्यांला ‘कृषीथॉन कृषी गुणवंत पुरस्कार’  प्रदान करताना मान्यवर

कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील कु. पियुषा सिनारे या विद्यार्थिनीला कृषीथॉन कृषी गुणवंत पुरस्कार मिळाला

युवकांचा कृषी क्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने कृषी शिक्षणात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन आणि मिडीया एक्झिबिटर्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय कृषीथॉन कृषी प्रदर्शनात लोणी येथील कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयातील कु. पियुषा सिनारे या विद्यार्थिनीला ‘कृषीथॉन कृषी गुणवंत पुरस्कार’  प्रदान करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य रोहित उंबरकर यांनी दिली.

कृषी अभियांत्रीकी,कृषीव्यवसाय व व्यवस्थापन,कृषी जैवतंत्रज्ञान अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या आणि कृषी विस्तार, संशोधनाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामविकास आदी क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या उपक्रमशील अशा विद्यार्थ्यांना ‘गुणवंत कृषी विद्यार्थ्यांना पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते.  गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतून प्राप्त झालेल्या ३५०० प्रस्तावांपैकी ४२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात  लोणी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात  चतुर्थ वर्षात शिकत आसलेली कु. पियुषा सिनारे या विद्यार्थिनीची  निवड करून तिला हा   ‘कृषीथॉन कृषी गुणवंत पुरस्कार’  प्रदान करण्यात आला आहे.

कु. पियुषा सिनारे या या विद्यार्थिनीच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.  शालिनीताई विखे पाटील, विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, सहसचिव भारत घोगरे,  शिक्षण व आस्थापना संचालक डॉ. दिगंबर खर्डे,  डॉ. हरिभाऊ आहेर, डॉ. विजय आहेर, कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,प्राचार्य निलेश दळे,प्राचार्य ऋषिकेश औताडे तसेच  शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


फोटो कॅप्शन :- ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन आणि मिडीया एक्झिबिटर्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय कृषीथॉन कृषी प्रदर्शनात लोणी येथील कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयातील कु. पियुषा सिनारे या विद्यार्थिनीला ‘कृषीथॉन कृषी गुणवंत पुरस्कार’  प्रदान करताना मान्यवर.

रॉप रो बॉल निवड चाचणी स्पर्ध्येचे उदघाटन

बाभळेश्वर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये  अहमदनगर ड्रॉप रो बॉल निवड चाचणी स्पर्ध्येच्या उदघाटन प्रसंगी . राहता तालुका गट शिक्षणाधिकारी श्री काळे, विस्तार अधिकारी श्री. ज्ञानेश्वर वाघचौरे , अहमदनगर क्रीडा महासंघाचे अध्यक्ष सुनील गागरे,सचिव भाऊसाहेब बेंद्रे, मुख्याद्यापक दिपक डेंगळे ,क्रिडा शिक्षक सुनील आहेर,शशिकांत म्हस्के,हनुमंत गिरी,ज्ञानेश्वर जोंधळे,श्री आव्हाड आदी.