जी व्ही के बायो सायन्स कंपनीने पद्मश्री विखे पाटील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या कॅम्पस मुलाखतीमध्ये १५ विद्यार्थ्यांची तीन लाख रुपये असे आकर्षक पैकेज देऊन नोकरीसाठी निवड.

लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला,विज्ञान व वाणिज्य  महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या कॅम्पस मुलाखतीमध्ये बेंगलोरस्थित जी व्ही के बायो सायन्स प्राव्हेट लिमिटेड, हैदराबाद या बहुराष्ट्रीय कंपनीने महाविद्यालयातील एम एस सी केमिस्ट्री विभागातील १५ विद्यार्थ्यांची तीन लाख रुपये असे आकर्षक पैकेज देऊन नोकरीसाठी निवड केली  असल्याची माहिती संस्थेचे प्लेसमेन्ट विभागाचे संचालक प्रा. धनंजय आहेर यांनी दिली.

जी व्ही के बायो सायन्स कंपनीने पद्मश्री विखे पाटील कला,विज्ञान व वाणिज्य  महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या कॅम्पस मुलाखतीमध्ये सुमारे १६६ सहभाग घेतला या पैकी १५ विद्यार्थ्यांची तीन लाख रुपये असे आकर्षक पैकेज देऊन नोकरीसाठी निवड केली आहे. या वेळी  जी व्ही के बायो सायन्स कंपनीचे वरिष्ठ संचालक डॉ.अनिल पाल, सहा संचालक डॉ प्रादीपत सिन्हा, एच आर मॅनेजर पुजा धिल्लोन, उपसंचालक आदित्य दोन्नती आदी उपस्थित होते.

माजी मंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटीलयांच्या संकल्पनेतून आणि नाबार्डचे माजी चेअरमन व संस्थेचे महासंचालक  डॉ. यशवंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट विभागातर्फे सातत्याने विविध महाविद्यालयांमध्ये परिसर मुलाखतींचे आयोजन केले जात असून त्याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी होत आहे.

निवड झालेल्या  विद्यार्थ्यांचे  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सौ. शालिनीताई  विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, सहसचिव श्री. भारत घोगरे, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. के. टी. व्ही रेड्डी,डॉ. हरिभाऊ आहेर,आस्थापना  संचालक प्रा. दिगंबर खर्डे, प्राचार्य डॉ प्रदीप दिघे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

फोटोकॅप्शन :- पदमश्री विखे पाटील कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये जी व्ही के बायो सायन्स प्राव्हेट लिमिटेड, हैदराबाद या बहुराष्ट्रीय कंपनीने आयोजित केलेल्या परिसर मुलाखतीद्वारे १५ विद्यार्थ्यांची नोकरी साठी  निवड झाल्याने  त्यांचा गौरव करताना प्लेसमेन्ट विभागाचे संचालक प्रा. धनंजय आहेर ,प्राचार्य डॉ प्रदीप दिघे ,प्रा दत्तात्रय थोरात आणि शिक्षक

सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्ध्येचा उदघाट्न संपन्न

विविध स्पर्धांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने युवावर्गाचे व्यक्तिमत्व घडत असतानाही आज ऑनलाईन पध्दतीने शिक्षण घेण्याचा कल  वाढत आहे, तर, समाज मनावर परिणाम करणाऱ्या माध्यमांचा युगातही  विविध चॅनेल्स द्वारे अनावश्यक विषयांवरच चर्चा होताना दिसत आहे.परंतु, खऱ्या अर्थाने आदर्श नागरिक घडविण्याचे काम हे महाविद्यालयीन शिक्षणचं करू शकत असल्याने, आता.  महाविद्यालयांनीही युवकांना काय अपेक्षित आहे. हे समजून घेऊन सार्वजनिक जीवनात आत्मविश्वासाने  सामोरे जाऊ शकतील असे शिक्षण युवा पिढीला दयावे लागेल  असे प्रतिपादन माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्ध्येच्या उदघाट्न प्रसंगी आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते या प्रसंगी प्रमुख पाहूण्या म्हणून नाशिक येथील सौ प्रसिद्ध कवियत्री सौ. सुरेखा बोऱ्हाडे,जेष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सदस्य आणि सचिव भारत घोगरे,शिक्षणधकिकारी प्रा. दिगंबर खर्डे, डॉ. राजेंद्र सलालकर “२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे “! असा विषय असलेल्या या वादविवाद स्पर्धेचे परीक्षण करणारे डॉ. उज्वला भोर, डॉ. अशोक लिंबेकर,प्रा. ओंकार रसाळ आदि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी प्रास्ताविक केले तर,सातत्याने ३९ वर्ष, देश आणि जागतिकस्तरावरील एका ज्वलंत विषयावर या वादविवाद स्पर्धेमधे तरुणाईच्या विचारमंथनातून वक्तृत्व-वादकौशल्य घडवुन आणण्याचे प्रयत्न होत असल्याचे स्पर्धेचे  कार्याध्यक्ष डॉ. शांताराम चौधरी यांनी सांगितले.

आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले कि, कालांतराने स्पर्धा या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. कितीही बदल झाले तरी, आदर्श नागरिक घडविण्याचे काम हे महाविद्यालयीन स्तरावरच होणार असल्याने होणाऱ्या स्पर्धा किंवा कार्यक्रम हे आपल्यासाठी होत असल्याचा विश्वास युवावर्गाला देण्यासाठी आता महाविद्यालयांनीच  पुढाकार घेऊन युवकांच्या अपेक्षा विचारात घेऊन स्पर्धांची आखणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जेष्ठ पत्रकार बाळ बोठे यांनी मुलांपेक्षा मुली सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवर असल्याचे सांगताना भविष्यात वर पसंतीहि मुलीच करतील या विनोदावर आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरेतील मुले आणि मुली हे सर्वच बाबतीत आणि क्षेत्रात आघाडीवर असल्याने मुला-मुलींमध्ये तुलना करणे चुकीचे ठरेल असे सांगितले.

 “२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे “! या विषयाचा धागा पकडून  बाळ ज. बोठे म्हणाले कि, आजची स्त्री ही जोखडातून मुक्त होऊन लढाऊ वैमाणिक होण्यापर्यंत आजच्या स्त्रीयांनी मजल मारली आहे. अत्याचार हे पूर्वी पासूनच होत असले तरी, आज माध्यमांमुळे जागरुकता वाढली आहे. सोशल मीडियामध्ये तरुण गुंतत चालला मात्र मुली मौलांच्या पुढे जाताना  दिसतात भविष्यात तर मुली इतक्या पुध्ये जातील कि, वर परिक्षा या मुलीच घेतील कि, काय असी परिस्थिती निर्माण झाली तर,आश्चर्य वाटण्याचे कारण नाही .असे ते म्हणाले.

सौ. सुरेखा बोऱ्हाडे,मध्यमयुगा पासून १८३० ते १९१५ या कालखंडामध्ये स्रियांच्या उन्नतीच्या दिशेने काम झाले असले आणि स्वातन्त्रतोत्तर काळात राज्यघटनेद्वारे स्त्रीयाच्या सौरक्षणासाठी नियम आणि कायदे होत असले तरी, दुर्दैवाने आजही बलात्कारासारख्या घटना घडत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. प्रा. छाया गलांडे यांनी आभार तर, प्रा. संगीत धिमते आणि डॉ. वैशाली मुरादे यांनी सूत्रसंचालन केले.

“२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे!” या प्रस्तावावर यंदाच्या ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन रौप्य करंडक वादविवाद स्पर्धा

राज्यभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागून असलेल्या  वक्तृत्व विषयातील एका महत्त्वाच्या स्पर्धेपैकी महाराष्ट्रात प्रसिध्द आणि मानाची समजली जाणारी ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा” ७ आणि ८ जानेवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आली असून लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये होणाऱ्या या’रौप्य करंडक वादविवाद स्पर्धे’साठी “२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे “! असा विषय ठेवण्यात आला असल्याची माहिती कार्याध्यक्ष डॉ. शांताराम चौधरी यांनी दिली.

स्पर्धेचे उद्घाटन दि. ७ जानेवारी रोजी नाशिक येथील सौ सुरेखा बोऱ्हाडे यांच्या हस्ते होणार असून , या वेळी आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.तर ८ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या समारोप समारंभासाठी नाशिक येथील अपूर्वा जाखडी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील ह्या अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

जगामध्ये वादाची परंपरा फार फार जुनी तरी, आशा स्पर्धे मध्ये तिथे हार-जीत नसते.वक्तृत्वकलेची सर्वात खरी कसोटी वाद स्पर्धेमध्ये लागते. कारण वक्तृत्वाबरोबरच इथे विरोधी बाजूपेक्षा आपली बाजू कशी वरचढ आणि बरोबर आहे हे दिलेल्या वेळामध्ये परीक्षकांना आणि श्रोत्यांना पटवून द्यायचे असते.एका ज्वलंत विषयावर या वादविवाद स्पर्धेमधे तरुणाईच्या विचारमंथनातून वक्तृत्व-वादकौशल्य घडवुन आणण्याचे हे ३९ वे. वर्ष आहे.

या वादविवाद स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख सोमवार दि ६ जानेवारी २०२० असून,या स्पर्धेमध्ये गुणानुक्रमे श्रेष्ष्ठ ठरणाऱ्यासंघास फिरता पद्मश्री विखे पाटील करंडक आणि २१००/-चे पारितोषिक देण्यात येईल.तसेच गुणानुक्रमे श्रेष्ष्ठ ठरणाऱ्या वरिष्ट गटातील पहिल्या चार क्रमांकाच्या स्पर्धकांना अनुक्रमे ७,१०१/-रू, ५१०१/-रू,आणि ३,१०१/-रू व उत्तेजनार्थ १५००/- रोख रक्कम व प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. कनिष्ठ महाविद्यालय गटातील गुणानुक्रमे श्रेष्ष्ठ ठरणाऱ्या पहिल्या चार क्रमांकाच्या स्पर्धकांना अनुक्रमे २,५०१/-रू,२,१०१/-रू,आणि १,५०१/-रू व उत्तेजनार्थ ७०१/- अशी पारितोषिके देण्यात येतील. गुणानुक्रमे पहिल्या दहा संघांना एक्का बाजुचा प्रवास खर्च, सर्व स्पर्धकांना मोफत भोजन आणि निवास व्यवस्था आणि विजेत्या स्पर्धकांना स्मृति चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. ७ जानेवारी २०२० रोजी संद्याकाळी ५;३० नंतर महाविद्यालयाच्या बस ने मोफत शिर्डी येथे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दि. ८ जानेवारी २०२० रोजी आयोजित केला असून राज्यातील महाविद्यालयांमधून दोन्ही गटासाठी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, संयोजन समितीचे प्रा.यु ओ येवले,प्रा. डॉ राजेंद्र सलालकर,प्रा.ए.जी गाढवे, डॉ, व्ही. डी मुरादे,डॉ. बी.डी रणपिसे यांनी केले आहे.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

जोतीरावांच्या पश्चात सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाईं फुले यांनी  शिकवण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेलं पहिलं पाऊल ही आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात होती. असे प्रतिपादन संस्थेचे सदस्य आणि सचिव भारत घोगरे यांनी केले.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये  सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यकर्तमात  श्री घोगरे बोलत होते. प्रवरा एव्हीएशनच्या संचालिका सुश्मिता विखे पाटील, शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे, एकनाथ सरोदे, बापूसाहेब अनाप,सौ. लीलावती सरोदे , विलास वाणी,शामराव गायकवाड, आत्माराम मुठे,योगेश शेपाळ आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

श्री भारत घोगरे,म्हणाले कि, समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करीत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीबाई काम करत होत्या. त्या शाळेत जाता येताना सनातनी गुंड  त्रास देत.  कधीकधी दगड मारीत. अंगावर चिखल किंवा शेण टाकीत असत.पण त्यांनी शिक्षणाचे कार्य चालूच ठेवले,. जोतीरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्याचे ते म्हणाले.


फोटो कॅप्शन :-  लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये  सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यकर्तमात  श्री घोगरे बोलत होते. प्रवरा एव्हीएशनच्या संचालिका सुश्मिता विखे पाटील,  शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे, एकनाथ सरोदे, बापूसाहेब अनाप,विलास वाणी,शामराव गायकवाड, आत्माराम मुठे,योगेश शेपाळ आदी