बारावीच्या निकालात प्रवरेची गुणवता कायम!

जिल्ह्याच्या शैक्षणिक परंपरेचा आलेख उंचावत असल्याचा अभिमान -ना.विखे पाटील

संस्थेच्या १० कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के

लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या इयत्ता बारावीच्या  निकालात संस्थेने आपली शैक्षणिक गुणवता कायम राखली असून, संस्थेच्या १० महाविद्यालयांनी  निकाल   १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही राखली आहे. विज्ञान १० ,कला २ वाणिज्य शाखेतील ४ तर किमान कौशल्य अभ्यासक्रम शाखेतील २  महाविद्यालयांचा समावेश आहे.,प्रवरेच्या इंग्रजी माध्यमांच्या तीनही शाखांचा  निकाल १०० टक्के लागला आहे.

     लोकनेते पद्‌मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या १७  कनिष्ठ महाविद्यालाने आपली निकालांची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी २५६० विद्यार्थी पैकी २४६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संस्थेचा कला शाखेच्या १२ महाविद्यालयाचा निकाल ८५.१३  लागला असून प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणी आणि कै.जनार्दन काळे पाटील विद्यालय चिंचोली या कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० टक्के लागला असून   कला शाखेतून ४१७ पैकी ३५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विज्ञान शाखेच्या महाविद्यालयांचा निकाल ९८.९२ टक्के लागला असून मराठी माध्यमातील छत्रपती शिवाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय पाथरे, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालय बाभळेश्वर,डाॅ.बाबासाहेब आंबडेकर कनिष्ठ महाविद्यालय,भगवतीपूर या तीन तर इंग्रजी माध्यमातील प्रवरा पब्लीक स्कूल प्रवरानगर, प्रवरा सेंट्रल पब्लीक स्कुल प्रवरानगर,पद्मश्री डाॅ.विखे पाटील सैनिकी स्कुल,प्रवरानगर या तीनही महाविद्यालयांचा १०० टक्के लागला असून, १८५१ पैकी १८३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

वाणिज्य शाखेचा निकाल हा ९४.९२ टक्के लागला असून डाॅ.बाबासाहेब आंबडेकर महाविद्यालय भगवतीपूरचा  निकाल १०० टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून २३६ पैकी २२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर किमान कौशल्य शाखेचा निकाल ९६.४३ टक्के लागला असून प्रवरा कन्या विद्या मंदीरच्या कनिष्ठ महाविद्याल लोणी यांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

 विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सर्वानीच केलेल्या सांघिक प्रयत्नामुळे अहील्यानगरची निकालाची परंपरा कायम राखली गेली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा महमंडळाच्या निकालाची आकडेवारी पाहीली तर आपला जिल्हा गुणवत्तेत तिसर्या क्रमांकावर आहे. याचाच अर्थ जिल्ह्याच्या शैक्षणिक परंपरेचा आलेख उंचावत आहे याचा सर्वानाच अभिमान असल्याचे नमूद करून जिल्ह्यातील सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कौतुक केले असून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे संस्थाचालक पालक यांचेही अभिनंदन केले आहे.