लोणी इंटरझोनल फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरचा संघ विजयी.

लोणी येथील  पद्मश्री विखे पाटील तंत्रनिकेतन मध्ये पार पडलेल्या  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परिक्षा मंडळातर्फे राज्यातील सर्व तंत्रनिकेतनमधील विदयार्थ्यांच्या इंटर झोनल राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर येथील डॉ. बापूजी साळूंखे टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संघाने विजेते पद पटकावीले असल्याची माहीती तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. दशरथ मगर यांनी दीली.

इंटर इंजिनिअरींग स्टुडंट स्पोर्ट असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे राज्यातील सर्व तंत्रनिकेतन मधील मुलांच्या राज्यस्तरीय इंटरझोनल फुटबॉल स्पर्धेचे आयोजन लोणी येथील पद्मश्री विखे पाटील तंत्रनिकेतनमध्ये करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन तांत्रिक संचालक डॉ. के.टी.व्ही.रेड्डी यांचे हस्ते झाले. यावेळी प्राचार्य प्रा. दशरथ मगर, प्राचार्य आयटीआय प्रा.अर्जून आहेर, प्रा. राजेंद्र साबळे, प्रा.सोमनाथ लव्हाटे, प्रा. नामदेव गरड उपस्थित होते.

यावेळी राज्यातून औरंगाबाद, नाशिक, लातूर, अक्कलकुवा, सोलापूर, रत्नागीरी, वसई, मंबई, नागपूर अहमदनगर आदी विभागातून चौदा संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामन्यात शासकिय तंत्रनिकेतन नागपूरच्या संघाबरोबर 1-0 अशी खेळी करून कोल्हापूर येथील डॉ. बापूजी साळूंखे टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संघाने स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवीले. स्पर्धेच्या उत्त्म आयोजनाचे सर्व संघ व्यवस्थापकांनी कौतुक केले. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा.अविनाश अनाप, प्रा. अभिषेक निबे, प्रा. वसिम तांबोळी, प्रा. सचिन भोसले, उज्ज्वल म्हस्के, प्रा. विशाल लवांडे, प्रभाकर म्हस्के यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन प्रा. रवींद्र काकडे यांनी केले.

फोटोकॅप्शन :- पद्मश्री विखे पाटील तंत्रनिकेतन येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परिक्षा मंडळातर्फे इंटर झोनल राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर येथील डॉ. बापूजी साळूंखे टेक्नॉलॉजीच्या संघाने जेते पद पटकावीले. याप्रसंगी प्राचार्य प्रा.डी.सी.मगर, प्रा.अविनाश अनाप.

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली कार्यानुभवातून दुग्धजण्यपदार्थांची निर्मिती आणि विक्री.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयातीळ अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांनी कार्यानुभवातून विविध दुग्धजण्यपदार्थांची निर्मिती करून त्याची विक्री केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे  यांनी दिली.

कृषी पदवीच्या अभ्यासक्रमानुसार अंतिम सत्रात विद्यार्थ्याला प्रत्यक्ष व्यावसायिक ज्ञान मिळावे यासाठी त्यांना महाविद्यालयात विविध विभागात कार्यानुभव कार्यक्रम असतो. त्यानुसार कृषी महाविद्यालयातील पशु विज्ञान व दुग्ध शास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. दीपाली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कु. अश्विनी लबडे, कु. सायली एखंडे , अमोल पवार ,शुभम गव्हाणे ,ज्ञानेश्वर पाठक,तुषार उगले , परमेश्वर हगारे ,निलेश मगर , सुरज पवार आदि विद्यार्थ्यांनी पेढा, गुलाबजामून, पनीर,व्हे ड्रिंक्स , सुगंधी दुध इ. पदार्थांची निर्मिती केली.त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन परीसरत विक्री केंद्र सुरु करून पदार्थ विक्रीचा अनुभव घेतला. संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी या विक्री केंद्रास भेट देऊन विद्यार्थांच्या उपक्रमाचे कौतुक केले.