News

‘परिक्षा पे चर्चा’ या उपक्रमात तालुक्‍यातील सर्व शाळांनी सहभाग घेवून विद्यार्थ्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन घडविले. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना यशाचा दिलेला कानमंत्र सर्वांच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण ठरला. महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी प्रवरा कन्‍या विद्या मंदिर मध्‍ये विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह पदाधिका-यांनी यांच्‍या समवेत या उपक्रमात सहभाग घेतला.
लोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी संलग्ननित महाविद्यालयातील २८ विद्यार्थ्यांची एच डी एफ सी बँकेमध्ये आर्थिक सल्लागार या पदावरती निवड झाली असल्याची माहिती कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्लेसमेंट अधिकारी प्रा.भाऊसाहेब घोरपडे यांनी दिली. कॅम्पस मुलाखतीचे आयोजन लोणी येथील पदमश्री डॉ विखे पाटील महाविद्यालयात करण्यात आले
स्टार्टअप्स साठी केंद्र सरकार प्रमाणेच राज्य शासन देखिल उद्योगांच्या मागे उभे राहील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दुरदृष्टीने देशात उद्योगाचे मोठे जाळे निर्माण होण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी
गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयाची तृतिय वर्ष बीसीए विभागाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी वसंत मापारी हिची मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक संचलनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चमुमध्ये निवड झाली आहे ती १७ जानेवारीपासून सहभागी होणार आहे अशी माहिती प्राचार्य डॉ अनुश्री खैरे यांनी दिली. तिच्या या निवडीसाठी राष्ट्रीय
पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र संशोधन केंद्रांतर्गत प्रेरणा धनंजय जाधव यांनी डॉ. महेश खर्डे व डॉ. अनिल वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले “रुटा ग्रेव्होलेन्स एल पासून हर्बल औषधांची निर्मिती आणि विकास” या विषयावर पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करत असताना हर्बल औषधांची निर्मिती आणि त्यांचा विकास या अनुषंगाने नाविन्यपूर्ण संशोधन करून सावित्रीबाई फुले
राज्‍यात पोलीस भरती प्रक्रीया सुरु झाल्‍यानंतर ग्रामीण भागातील असंख्‍य तरुण तरुणी या भरती प्रक्रीयेसाठी शहरातील प्रशिक्षण केंद्राकडे आकर्षित होवून तिथे आपला प्रवेश घेतात. मात्र या विद्यार्थ्‍यांना राहाण्‍याची सुविधा उपलब होत नाही. आशा पार्श्‍वभूमीवर निर्माण होणारी अडचण दुर करण्‍यासाठी महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सामाजिक बांधिलकीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांसाठी प्रवरा
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा रूरल कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची आंतराष्ट्रीय विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याची माहीती प्राचार्या तेजश्री ठाणगावकर यांनी दिली. दर्जेदार शिक्षण आणि शिक्षणासोबतचं व्यक्तीमत्व विकासावर विविध व्याख्याने, विषयांतील विविध करीअर संधी यामुळे प्रवरेतील विद्यार्थी हे जगाच्या विविध
गणित-विज्ञान हा विषय जीवनासाठी महत्वपूर्ण आहे. हा विषय मुलांच्या कल्पना शक्तीला संधी देणारा आहे. प्रदर्शनामुळे मुलांना हा विषय सोपा होत असून यामुळे विषयाची आवड मुलामध्ये निर्माण होते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत अंतर्गत
प्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह,प्रवरानगर यांच्यावतीने लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीच्या पद्यश्री डाॅ.विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते अमृत महोत्सवी स्वातंञ दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संस्थेचे विश्वस्त माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जि.प.सदस्या रोणीनीताई निघुते,संस्थेचे सर्व
लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या प्रवरानगरच्या प्रवरा पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार घोषित करण्यात आला. हा पुरस्कार बद्दल राज्याचे महसुल,पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंञी तसेच लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्कुलचे अभिनंदन केले आहे.
भारतीय संस्‍कृतीचा मुलभूत सिंध्‍दांतच हा त्‍यागाशी जोडला गेला आहे. ही संस्‍कृती सगळ्यांमध्‍ये एकता निर्माण करणारी आहे. येथील साहित्‍य आणि कलासुध्‍दा मानवाला एकत्रित ठेवून मजबुत करण्‍याचे काम करत असल्‍यामुळेच उद्याच्‍या काळात भारत देश बौध्‍दीक, अध्‍यात्मिक, वैज्ञानिक, आर्थिेक क्षेत्रात जगावर राज्‍य करेल असा अशावाद केरळचे राज्‍यपाल आरीफ महोमंद खान यांनी व्‍यक्‍त केला.
शिक्षणा सोबतच विवेकी विचार निर्भयता आणि व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची आवश्यकता असल्याचे मत ९५व्या अखिल भारतीय मराठी साहीत्य संम्मेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी केले. प्रवरा औद्योगिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक समूह आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य