प्रवरेच्या विद्यार्थिनीची समर फेलोशिपसाठी मैसूर येथे निवड.

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थी कु. भावना बापू शिंदे हिची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या उन्हाळी संशोधन फेलोशिप -२०२० योजनेअंतर्गत मैसूर येथील सेंट्रल फूड टेकनोलॉजिकल इन्स्टिट्यूट मैसूर, बँगलोर येथे दोन महिन्याच्या उन्हाळी संशोधन प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.

या प्रशिक्षणासाठी कु. भावना शिंदे या विद्यार्थिनीला प्रति महिना दहा हजार रुपये संशोधन फेलोशिप मिळणार असून या प्रशिक्षणासाठी डिपार्टमेंट ऑफ फुड सायन्स येथील वैज्ञानिक डॉ. नांनजप्पा गणेश यांचे तिला संशोधनासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील व प्रथम वर्षांपासून महाविद्यालयाच्या कमवा आणि शिका योजनेत काम करून शिक्षण घेणारी कु. भावना शिंदेच्या यशा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या विद्यार्थिनीला  प्रा. स्वरांजली गाढे, प्रा. भाऊसाहेब घोरपडे, प्रा. अमोल सावंत, प्रा. प्रविण गायकर, प्रा. श्रद्धा रणपिसे व प्रा. मिनल शेळके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

कु. भावना  शिंदे या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय  विखे पाटील, विश्वस्त श्री. आण्णासाहेब म्हस्के, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, सहायक सचिव सौ. सुश्मिता माने, सहसचिव भारत घोगरे, आस्थापना प्रमुख डॉ. दिगंबर खर्डे, संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. धनंजय आहेर, कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषीकेश औताडे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

विद्यार्थी,शिक्षक,पालक आणि व्यवस्थापन यांच्या संयुक्त मेळावा (सुवर्ण चतुष्कोण)

साठच्या दशकातील स्वात्रंत्र्याच्या उंबरठ्यावर पद्मश्री विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले सामाजिक काम प्रवरा परिसरातील बेचाळीस गावाच्या  शेतकरी,शेतमजूर आणि समाजजीवनासाठी क्रांतिकारक ठरले. म्हणूनच, आज या परिसरातील सुमारे ७० तरुण अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात काम करीत असल्याचे सांगताना. आज देशपातळीवर सेंद्रिय शेती उत्पादनाला महत्व दिले जात असल्याने शेती करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी संधी असल्याचे प्रतिपादन पायरेन्स संस्थेचे डायरेक्टर डॉ.बी.बी दास यांनी केले.

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित केलेल्या विद्यार्थी,शिक्षक,पालक आणि व्यवस्थापन यांच्या संयुक्त मेळाव्यात (सुवर्ण चतुष्कोण) डॉ दास बोलत होते.या प्रसंगी कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर, पालक आणि भुसावळचे नायब तहसीलदार दिलीप बारी,विलास पासले, नंदकुमार चौधरी.सिध्दार्थ निकम आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात  पालक व शिक्षकामध्ये सवांद व्हावा, विद्यार्थ्यांची प्रगती समजावी या उद्वेषाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. या वेळी महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती  पालकांना देण्यात आली. महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा आणि प्रक्षेत्राला भेटी देऊन उपलब्ध सुविधांची माहिती जाणून घेतली.

डॉ. दास म्हणाले कि,प्रवरेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला जागतिक स्पर्ध्येमध्ये सुलभ सहभाग घेता यावा या साठी प्रत्येक विद्यार्थ्याला  पुस्तकी ज्ञान देतानाच व्यवहारिक ज्ञानाची जोड आणि जागतिक पातळीवर जलद गतीने होणाऱ्या  बदलांची माहिती करून देण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम नेहमीच राबविले जात असल्याचे सांगताना प्रवरेत शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असल्याचे ते म्हणाले. 
     

या वेळी काही पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी दिलीप बारी यांनी विद्यार्थी हे पालकांपासून दूर असून केवळ शिक्षकांवरच अवलंबून असणाऱ्या विद्यार्थ्यांचा अडचणी समजावून घेऊन त्या सोडविल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सिद्धार्थ निकम यांनी परिस्थितीनेच माणूस घडत असल्याचे सांगून परिस्थिती मुळे शिक्षणापासून  वंचित राहू नये यासाठी प्रवरा शैक्षणिक संकुलात राबविण्यात येणाऱ्या कमवा आणि शिका योजनेचे कौतुक करताना.गरीब कुटुंबातील मुलं-मुली काम करून शिक्षण घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.तर, प्रवरेत विद्यार्थी घडविण्याचे काम होत असल्याचे नंदकुमार चौधरी म्हणाले. पायरेन्स संस्थेच्या सेमिनार हॉल मध्ये झालेल्या  या कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संखेने उपस्थित होते,शेवटी क्रीडा संचालक प्रा. सिताराम वरखड यांनी आभार व्यक्त केले.

फोटो कॅप्शन:- लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित केलेल्या विद्यार्थी,शिक्षक,पालक आणि व्यवस्थापन यांच्या संयुक्त मेळाव्यात (सुवर्ण चतुष्कोण) मार्गदर्शन करताना पायरेन्सचे संचालक डॉ. बी. बी दास, कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर,  भुसावळचे नायब तहसीलदार दिलीप बारी,महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,विलास पासले, नंदकुमार चौधरी.सिध्दार्थ निकम आदी.

शेतकरी,बचतगटातील महिला आणि विद्यार्थ्यांना चर्चासत्राच्या माध्यमातून पेटंट कायदया विषयी मार्गदर्शन मिळेल – सौ. शालिनीताई विखे

कल्पकतेला महत्व देणारा पेटंट जगभर कायद्यांच्या स्वरूपात अस्तित्वात असून ग्रामीण भागातील शेतकरी,बचतगटातील महिला आणि विद्यार्थ्यांना चर्चासत्राच्या माध्यमातून पेटंट कायदया विषयी विश्वासार्ह मार्गदर्शन मिळेल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील   (पद्मभूषण उपाधिने सन्मानीत ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, सात्रळ येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य,अर्थशास्त्र व रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित “पेटंट भरणे: प्रक्रिया व कायदेशीर पैलू” या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सौ.शालिनीताई विखे बोलत होत्या.महाविद्यालयाच्या  प्राचार्या श्रीमती जयश्री सिनगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सोनई (नेवासा) येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ,डॉ.एस. एल. लावरे,पुणे येथील  इंडिअन पेटंट एजंट. श्रीमती आशा गुरुळे. अकोले येथील अगस्ती महाविद्यलयातील भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. डॉ.एस. जी. वावले, आदी मान्यवर उपस्थित होते.   या वेळी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील विद्यार्थी सुविधा केंद्राचे व पोस्टर प्रेसेंटेशनचे उद्घाटन करण्यात आले.

सौ विखे म्हणाल्याकी,  आज ग्रामीण भागातील विद्यार्थांसाठी पेटंट बद्दल माहिती मिळविणे व स्वतः पेटंटची नोंदणी करणे फार गरजेचे आहे. आजची कार्यशाळा त्यांना प्रेरणादायी ठरणार आहे, कारण त्यांच्याकडे पेटंट कायद्यानुसार लागणारी बुद्धीमत्ता ही  कला आहे. पण त्याची नोंदणी कशी करावी  व बौद्धिक हक्क कसा  संपादन करावा याची  माहिती त्यांना मिळणार आहे .त्यामुळे ते आपली  शेती उत्पादने व फळावर प्रक्रिया करून आपली पेटंट नोंदणी करू शकतात . ग्रामीण भागात नवीन व्यवसाय करून रोजगार निर्माण करू शकतात.हे सांगून परिसरात बचत गटाच्या माध्यमातून कोणकोणते नवीन व्यवसाय यशस्वीपणे सुरु आहेत ते सांगितले आणि  हेच  पदमश्री व पद्मभूषण विखे पाटील यांचे स्वप्न आहे व ते आपले विद्यार्थीदेखील पेटंट नोंदणी करून पूर्ण करतील असा मला विश्वास सौ.शालिनीताई विखे पाटील यांनीव्यक्त केला.

उपस्थित मार्गदर्शकांनी पेटंट म्हणजे काय,त्याचा इतिहास ,भारतातील पेटंट कायदा ,कोणत्या बाबी पेटंट मध्ये येत नाहीत, कायद्यानुसार झालेल्या नवीन दुरुस्त्या ,पेटंट मिळवण्याची पद्धती ,पेटंटचा कालावधी,शोधकर्त्याला त्याचे मिळणारे फायदे व त्याच्या अधिकारावरील मर्यादा इ. बाबी प्रश्नउत्तराच्या मार्गाने शंकांचे निरसन करून सांगितल्या

सदर कार्यक्रमासाठी डॉ.सोमनाथ घोलप, प्रा.दिनकर घाणे, श्री महेंद्र तांबे  कार्यालय अधीक्षक व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सेवक यांनी परिश्रम घेतले,सदर कार्यक्रमाला विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी  ,विद्यार्थिनी बहुसंख्येने हजर होते .सूत्रसंचालन डॉ.अनंत केदारे आणि प्रा.सुसर यांनी तर उपप्राचार्य प्रा.दिपक घोलप यांनी आभार व्यक्त केले.

फोटो कॅप्शन:- सात्रळ येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य,अर्थशास्त्र व रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित “पेटंट भरणे: प्रक्रिया व कायदेशीर पैलू” या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना सौ.शालिनीताई विखे ,सोनई (नेवासा) येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ,डॉ.एस. एल. लावरे,पुणे येथील  इंडिअन पेटंट एजंट. श्रीमती आशा गुरुळे. अकोले येथील अगस्ती महाविद्यलयातील भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. डॉ.एस. जी. वावले,महाविद्यालयाच्या  प्राचार्या श्रीमती जयश्री सिनगर आदी.

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ए.आय.सी.टी.ई.न्यू दिल्ली यांच्या सहकार्याने एस.टी. व एस. सी. विद्यार्थांसाठी स्कील डेव्हलपमेंट प्रशिक्षण.

भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाच्या ऑल इंडिया कॉन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनद्वारा सुरु असलेल्या एस.टी. व एस. सी. स्कील डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गत चालू शैक्षणिक सत्रासाठी विविध कौशल्य व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणाचा चांगला उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवीन संधी मिळविण्या करिता होणार असल्याचे प्रतिपादन प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी केले.

लोणी येथील  प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नुकताच एस.टी. व एस. सी. विद्यार्थांसाठी स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम  आयोजित करण्यात आला होता. या वेळी  पुणे येथील  प्रशिक्षण ट्रेनिंग हे इम्पॅक्टचे प्रशिक्षक  श्री. पंकज मित्तल तसेच नाशिक येथील फ्लाय हाय अप्टिट्यूड् ट्रेनिंग सर्विसेस चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओंकार जगदाळे,पूजा सनार, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नोडल ऑफिसर प्रा. अब्दुल हमीद अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रशिक्षणाअंतर्गत  विद्यार्थांना कम्युनिकेशन स्कील, रिझ्युम रायटिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्याच्या  मुलाखतीची तयारी, ग्रुप डिस्कशन व  ऍप्टिट्यूड  टेस्ट अश्या विविध प्रकारच्या गोष्टींचे कौशल्य प्राप्त करून देण्यात आले.त्याचा उपयोग रोजगाराच्या नवीन संधीकरिता होणार आहे.असल्याचे  प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने यांनी सांगितले तसेच  यापूर्वीही अशापद्धतीचा पंधरा दिवसांचे  प्रशिक्षण  सीयु-सकसिड संस्थेकडून सर्व विभागांच्या विभागप्रमुखांच्या साहाय्याने  घेण्यात आल्याचे ते म्हणाले. सदर प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी प्रा. निलेश कापसे, प्रा. लक्ष्मण लहामगे, प्रा. सचिन अनाप, प्रा. स्वप्निल बंगाळ ,प्रा. दिबा आफ्रीन अन्सारी, प्रा. अर्चना पवार यांनी परिश्रम घेतले.

गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन

गुणवत्ता असून देखील केवळ योग्य सादरीकरण करता येत नसल्याने ग्रामीण भागातील मुलीना अपेक्षित ध्येयप्राप्त करण्यास अडचणी येतात असे सांगताना,विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास आणि अवगत कलागुणांचा विकास करणाऱ्या विविध सुविधा प्रवरे मध्ये ऊपलब्ध आहेत. या सुधींचा उपयोग  करून मुलींनी चंद्राला गवसणी घालण्याचे लक्ष ठेवले तर, तारे तरी नक्कीच हाती लागतील असे प्रतिपादन अमळनेर येथील प्रताप ऑटोनॉमस महाविद्यालयातील प्राध्यपिका सौ. मोनाली परजणे-पाटील यांनी केले.

लोणी येथील गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून  सौ. मोनाली परजणे-पाटील बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्येक्षतेखाली झालेल्या या समारंभासाठी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वाय.एम.जयराज,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर,प्रवरा गर्ल्स एजुकेशन कॅम्पसच्या संचालिका सौ. लीलावती सरोदे, प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडिया स्कुलच्या प्राचार्या सौ. संगिता देवकर, प्रवरा कन्या विद्यामंदिरच्या प्राचार्य सौ.भारती कुमकर, गृहविज्ञान विभागप्रमुख सौ. कांचन देशमुख,संगणकशास्र विभागप्रमुख सौ. राजश्री नेहे-तांबे, महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. रेखिता वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत कुचेकर यांनी प्रास्ताविक तर, उपप्राचार्या सौ. अनुश्री खैरे-दुबे यांनी वार्षिक शैक्षणिक प्रगतीच्या अहवालाचे वाचन केले. तसेच प्रा. अर्चना घोगरे यांनी शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळविलेल्या आणि प्रा. डॉ. उत्तम अनाप क्रीडा क्षेत्रामध्ये तालुका पातळीपासून राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थिनींच्या नावाची घोषणा केली. संगणक विभागातील कु. कोमल मेधने आणि  गृहविज्ञान विभागातील कु. उमा खरे या विद्यार्थनींना या वर्षीच्या आदर्श विद्यार्थिनी म्हणून सन्मानित करण्यात आले.

सौ. शालिनीताई विखे पाटील मार्गदर्शन करताना म्हणाल्या कि,विद्यार्थिनींमध्ये जीवनाला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयांमधून होत असल्यानेच आज अनेक विद्यार्थीदेश विदेशात महत्वाच्या क्षेत्रामध्ये उत्क्रुष्ट काम करीत आहेत असे सांगताना, गृहविज्ञान विभागामध्ये अनेक संधी असून, द्रुष्टी असेल त्या प्रमाणे सृष्टी दिसत असल्याने विद्यार्थिनींनी अभ्यासाबरोबरच संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या सुविधांचा पुरेपूर उपयोग करून घेताना,ज्ञान मिळविण्यासाठी हट्ट धरावा असे आवाहन त्यांनी केले. शेवटी प्रा. जया डबरासे यांनी आभार व्यक्त केले.

फोटो कॅप्शन ;- लोणी येथे गृहविज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण प्रसंगी  जि प माजी अध्यक्षा ना शालिनीताई विखे पाटील,माजी विद्यार्थ्यांनी मोनाली कृष्णराव परजणे पाटील अमळनेर,प्रवरा अभिमत विद्यपीठाचे कुलगुरू डॉ जयराज,प्रा डॉ हरिभाऊ आहेर,प्राचार्य डॉ शशिकांत कुचेकर,उपप्राचार्य डॉ अनुश्री खैरे,संचालिका,लीलावती सरोदे,संगीता देवकर.

डॉ. राठी यांना आऊट स्टँडीग सिनियर फॅकल्टी हा पुरस्कार जाहीर

हैद्राबाद येथील नामांकित ईलेट्स टेक्नोमिडीया या संस्थेतर्फे या वर्षीचा आऊट स्टँडीग सिनियर फॅकल्टी हा पुरस्कार लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रीकी महाविद्यालयातील डॉ. विजयकुमार राठी यांना जाहीर झाला आहे. हैद्राबाद येथे 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जागतिक शिक्षण परिषदेत डॉ. राठी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रवरा ग्रामीण अभियांत्रकी महाविद्यालयात 31 वर्षांपासून डॉ. राठी हे स्थापत्यशास्त्र विभागात प्रोफेसर म्हणून सेवेत आहेत. त्यांनी 2018 साली एसव्हीएनआयटी, सुरत येथील विद्यापीठात नॅनो मटेरीयल ईन कॉंक्रीट या विषयात पीएच.डी. पुर्ण केली. देश व विदेश पातळीवर त्यांचे 52 शोधनिबंध प्रसिध्द केले आहेत. उच्च शिक्षणाकरिता (एम.ई.) 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्याना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. महाविद्यालयात डॉ. राठी यांनी व्याख्याता, विभागप्रमुख, उपप्राचार्य व तांत्रिक संचालक, प्राचार्य अशा अनेक पदावंर काम केले आहे.

शिक्षक गौरव पुरस्कार अंतर्गत त्यांना आऊट स्टँडीग सिनियर फॅकल्टी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, प्राचार्य डॉ.संजय गुल्हाने, प्राचार्य प्रा. दशरथ मगर, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी विविध कंपन्यांमध्ये निवड.

शैक्षणिक व औद्योगिक शिक्षणाचा दुवा साधता यावा या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमाअंतर्गत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,लोणी येथील ३१ विद्यार्थ्यांची शेवटच्या सहामाही सत्रातील संशोधन प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी विविध कंपन्यांमध्ये निवड झाली असल्याची माहिती प्रकल्प समन्वयक प्रा. भाऊसाहेब घोरपडे यांनी दिली.

यामध्ये सृजन बायोटेक निफाड, नाशिक मध्ये चामवड पंढरीनाथ, हिवारे वैभव, मांटे विशाल, अगवान मुकुंद, सोनवणे चंदन, चौधरी अभिजित, खेडेकर प्रदीप, भालेराव प्रकाश, भिडे हरीश तसेच राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर मध्ये शिंदे शुभम, भोसके सौरभ, शिंदे मेघराज, मिटकॉन बायोफर्मा सेंटर, पुणे मध्ये कु.भवारी हर्षदा, कु.भोसले पूजा, राज्य स्तरीय जैवतंत्रज्ञान केंद्र म.फु.कृ.वि, राहुरी मध्ये कलांगडे महेश, खंडागळे विकास,थोरात बाबासाहेब,बरबडे शुभम,कु.आंधळे मोनिका तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये वाघमारे मयुरी, बागले अस्मिता, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे मध्ये यंदे प्रेषिता, खरसे शितल, जगताप मृणाली, जाधव मैथिली, अभंग प्रतीक्षा, राख शुभम. आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे मध्ये बोरसे श्रद्धा. प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लोणी गोरे पल्लवी, प. डॉ. वि. पा. सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर,
चोपडे संकेत आणि सौरभ केदार, जैवतंत्रज्ञान विभाग, डॉ. एम. पी. एस. कॉलेज, आग्रा, दिल्ली अशा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

हे सर्व विद्यार्थी सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ञ समितीस मांडणार आहेत. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान घेऊन शिकता येणार असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकाळात हा कार्यानुभव उपयोगी पडणार आहे सहा. समन्वयक प्रा.अमोल सावंत यांनी सांगितले.

या विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री  आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, महासंचालकांच्या कार्यकारी सहायक सुश्मिता माने, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण व आस्थापना संचालक प्रा.. दिगंबर खर्डे, डॉ. हरिभाऊ आहेर, प्रा. विजय आहेर, प्रा. धनंजय आहेर,कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस व प्राचार्य ऋषिकेश औताडे, तसेच इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.या विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट अधिकारी प्रा. महेश चंद्रे, प्रा. अमोल सावंत, प्रा. भाऊसाहेब घोरपडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोणी इंटरझोनल फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरचा संघ विजयी.

लोणी येथील  पद्मश्री विखे पाटील तंत्रनिकेतन मध्ये पार पडलेल्या  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परिक्षा मंडळातर्फे राज्यातील सर्व तंत्रनिकेतनमधील विदयार्थ्यांच्या इंटर झोनल राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर येथील डॉ. बापूजी साळूंखे टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संघाने विजेते पद पटकावीले असल्याची माहीती तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. दशरथ मगर यांनी दीली.

इंटर इंजिनिअरींग स्टुडंट स्पोर्ट असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे राज्यातील सर्व तंत्रनिकेतन मधील मुलांच्या राज्यस्तरीय इंटरझोनल फुटबॉल स्पर्धेचे आयोजन लोणी येथील पद्मश्री विखे पाटील तंत्रनिकेतनमध्ये करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन तांत्रिक संचालक डॉ. के.टी.व्ही.रेड्डी यांचे हस्ते झाले. यावेळी प्राचार्य प्रा. दशरथ मगर, प्राचार्य आयटीआय प्रा.अर्जून आहेर, प्रा. राजेंद्र साबळे, प्रा.सोमनाथ लव्हाटे, प्रा. नामदेव गरड उपस्थित होते.

यावेळी राज्यातून औरंगाबाद, नाशिक, लातूर, अक्कलकुवा, सोलापूर, रत्नागीरी, वसई, मंबई, नागपूर अहमदनगर आदी विभागातून चौदा संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामन्यात शासकिय तंत्रनिकेतन नागपूरच्या संघाबरोबर 1-0 अशी खेळी करून कोल्हापूर येथील डॉ. बापूजी साळूंखे टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संघाने स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवीले. स्पर्धेच्या उत्त्म आयोजनाचे सर्व संघ व्यवस्थापकांनी कौतुक केले. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा.अविनाश अनाप, प्रा. अभिषेक निबे, प्रा. वसिम तांबोळी, प्रा. सचिन भोसले, उज्ज्वल म्हस्के, प्रा. विशाल लवांडे, प्रभाकर म्हस्के यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन प्रा. रवींद्र काकडे यांनी केले.

फोटोकॅप्शन :- पद्मश्री विखे पाटील तंत्रनिकेतन येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परिक्षा मंडळातर्फे इंटर झोनल राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर येथील डॉ. बापूजी साळूंखे टेक्नॉलॉजीच्या संघाने जेते पद पटकावीले. याप्रसंगी प्राचार्य प्रा.डी.सी.मगर, प्रा.अविनाश अनाप.

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली कार्यानुभवातून दुग्धजण्यपदार्थांची निर्मिती आणि विक्री.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयातीळ अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांनी कार्यानुभवातून विविध दुग्धजण्यपदार्थांची निर्मिती करून त्याची विक्री केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे  यांनी दिली.

कृषी पदवीच्या अभ्यासक्रमानुसार अंतिम सत्रात विद्यार्थ्याला प्रत्यक्ष व्यावसायिक ज्ञान मिळावे यासाठी त्यांना महाविद्यालयात विविध विभागात कार्यानुभव कार्यक्रम असतो. त्यानुसार कृषी महाविद्यालयातील पशु विज्ञान व दुग्ध शास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. दीपाली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कु. अश्विनी लबडे, कु. सायली एखंडे , अमोल पवार ,शुभम गव्हाणे ,ज्ञानेश्वर पाठक,तुषार उगले , परमेश्वर हगारे ,निलेश मगर , सुरज पवार आदि विद्यार्थ्यांनी पेढा, गुलाबजामून, पनीर,व्हे ड्रिंक्स , सुगंधी दुध इ. पदार्थांची निर्मिती केली.त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन परीसरत विक्री केंद्र सुरु करून पदार्थ विक्रीचा अनुभव घेतला. संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी या विक्री केंद्रास भेट देऊन विद्यार्थांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

खेड्यातील मुलां-मुलींना उच्च शिक्षणासाठी आयआयटी सारख्या ठिकाणी प्रवेश मिळविता यावा याकरिता मुंबई येथील अवंती या संस्थेशी शैक्षणिक करार- डॉ. यशवंत थोरात

उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता. खेड्यातील मुलां-मुलींमध्ये प्रवेश परीक्षेबाबत असलेला न्युनगंड घालवून त्यांच्या करियरच्या स्वप्नपुर्तीसाठी आयआयटी सारख्या ठिकाणी प्रवेश मिळविता यावा यासाठी  या  मुलां-मुलींना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी  लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने आता  स्पर्धा परिक्षा साठी  मार्गदर्शनाचे उत्कृष्ठ काम करणाऱ्या मुंबई येथील अवंती या संस्थेशी शैक्षणिक करार केला असून आधुनिक शिक्षण पद्धतीच्या गुरुकुल निर्मिती कडे वाटचाल केली असल्याचे संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण व त्याचबरोबर बारावीनंतरच्या जेईई व तत्सम प्रवेश स्पर्धा परिक्षेत उत्तम यश प्राप्त होण्यासाठी मुंबई येथील अवंती या संस्थेशी नुकताच  करार करण्यात आला. यावेळी प्रवरा एवीएशन संस्थेच्या संचालिका सुस्मिता माने-देशमुख, अवंती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा रामकुमार, संस्थेचे शिक्षण व अस्थापणा संचालक प्रा.दिगंबर खर्डे उपस्थित होते.

डॉ. यशवंत थोरात म्हणाले की, ग्रामीण  भागामधील विद्यार्थ्यांना जेईई अथवा तत्सम प्रवेश परिक्षा स्पर्धेबाबत मोठी अडचण भासते. पालकांनाही याबाबत अतिशय कमी प्रमाणात माहीती असते. त्यामुळे होतकरू व पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांच्या चांगल्या करियरच्या संधी हुकल्या जातात. यावर प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने आता नवे पाऊल उचलले असून त्यादृष्टीने मुलांचे नुकसान होऊ नये व त्यांना प्रवेश स्पर्धा परिक्षेबाबत आवड निर्माण व्हावी व उत्तम यश प्राप्त करून योग्य दिशा प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

संस्थेतील ईयत्ता आठवी पासूनच विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत शिक्षकांमार्फत विशेष प्रशिक्षण देणार आहेत. यासाठी प्रवेरतील शिक्षकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन दिल्यावर अकरावी व बारावीत त्यांना जेईई व इतर प्रवेश स्पर्धा परिक्षेबाबत आणखी सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी क्रमिक पुस्तके, डीजीटल अँप व विशिष्ठ अभ्यासक्रम यांचा वापर होईल. त्यामुळे विद्यार्थी चागल्या प्रकारे तयार होतील व परिक्षेत उत्तम यश प्राप्त करतीलच परंतू त्यांना करियरची योग्य दिशा व उच्च शिक्षणासाठी आयआयटी सारखी योग्य संस्था निवडणे सोपे होईल याची खात्री असल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले.

सध्या बारावीत विज्ञान शाखेतील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश स्पर्धा परिक्षेच्या मार्गदर्शनासाठी संस्थेने “२०२० प्रवरा टू आयआयटी” हा उपक्रम हाती घेतला असून तिनशे विद्यार्थ्यांनी निवड करून जेईई प्रवेश परिक्षेची ऑनलाईन सराव परिक्षा घेण्यात अली.  यातून विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना एक महिन्याचे अवंती या संस्थेमार्फत विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे. अवंती या संस्थेच्या मार्गदर्शनातून आयआयटी मध्ये प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने हा शैक्षणिक करार केला असल्याचे डॉ. यशवतं थोरात यांनी शेवटी सांगतिले.

कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा) पालक मेळावा

आवडीनुसार महाविद्यालयीन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना पालकांकडून हळूहळू स्वातंत्र्य मिळत असले तरी,स्वावलंबी आयुष्य जगताना मुलांना आत्मविश्वास मिळण्यासाठी  धावपळ आणि धकाधकीच्या जीवनातील पालकांनी आपल्या मुलांशी लक्ष आणि सुसंवाद  ठेवावा असे प्रतिपादन कृषिभूषण बन्सी पाटील तांबे यांनी केले.

लोणी येथील प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा) आणि लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या पाल्यांच्या अभ्यासातील प्रगती पालकांना समजावी या साठी आयोजित केलेल्या विद्यार्थी,शिक्षक आणि पालक मेळाव्यात प्रेमिक पाहुणे म्हणून बन्सी पाटील तांबे बोलत होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ. शिवानंद हिरेमठ,प्राचार्य  दत्तात्रय थोरात,सौ.औटी,श्री देशमुख श्री जाधव,श्री हारदे प्रा दत्तात्रय थोरात, प्रा. विशाल  तांबे   आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रा. प्रदीप घुले यांनी प्रस्ताविक केले.

या वेळी प्रा. विशाल तांबे ,प्रा वैशाली अरगडे यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. प्रा जालिंदर पाटील यांनी आभार व्यक्त केले.

फोटो कॅप्शन :- लोणी येथील प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा) आणि लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विद्यार्थी,शिक्षक आणि पालक मेळाव्यात मार्गदर्शन करताना कृषिभूषण  बन्सी पाटील तांबे समवेत प्राचार्य डॉ. शिवानंद हिरेमठ,प्राचार्य  दत्तात्रय थोरात,प्रा. प्रदीप घुले, प्रा. विशाल  तांबे   प्रा वैशाली अरगडे आदी.

प्रवरा कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयांचा ग्रीनलाईफ अग्रो इंडस्ट्री प्रा. लि.बरोबर सामंज्यस करार

प्रवरा कृषी व कृषी सल्ग्नित महाविद्यालायान्द्वारे ग्रीनलाईफ अग्रो इंडस्ट्री प्रा. लि. नेवासा या नामांकित कंपनीशी औद्योगिक व शैक्षणिक सामंज्यस करार झाला असल्याची माहिती प्राचार्य रोहित उंबरकर यांनी दिली.

या सामंज्यस कराराद्वारे संस्थेंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय ,कृषी जैवतंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय व व्यवस्थापन या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रशिक्षण कार्यशाळा, शेतकरी मेळावे, अनुभवी उद्योगांचे मार्गदर्शन व नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याचे   ग्रीनलाईफ कंपनीचे अध्यक्ष किरण जोंधळे यांनी सांगितले . कृषी व कृषी सलग्न महाविद्यालयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,कृषी महाविद्यालयाचे  प्राचार्य. निलेश दळे,कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे  प्राचार्य. रोहित उंबरकर, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. ऋषिकेश औताडे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारासाठी ट्रेनिंग व प्लेसमेण्ट अधिकारी प्रा. रमेश जाधव, प्रा. धीरज कारले यांनी विशेष परिश्रम घेतले.


फोटो कॅप्शन :-प्रवरा कृषी व कृषी सल्ग्नित महाविद्यालायानी नेवासा येथील ग्रीनलाईफ अग्रो इंडस्ट्री प्रा. लि.  या नामांकित कंपनीशी औद्योगिक व शैक्षणिक सामंज्यस करारावर स्वाक्षरी करताना ग्रीनलाईफ कंपनीचे अध्यक्ष किरण जोंधळे,  कृषी व कृषी सलग्न महाविद्यालयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,कृषी महाविद्यालयाचे  प्राचार्य. निलेश दळे,कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे  प्राचार्य. रोहित उंबरकर, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. ऋषिकेश औताडे, ट्रेनिंग व प्लेसमेण्ट अधिकारी प्रा. रमेश जाधव, प्रा. धीरज कारले आदी.