प्रवरा कन्या विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाद्यालयातील मुलींचे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत यश.

पुणे ( बालेवाडी) येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेमध्ये प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणीच्या मुली शालेय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत कांस्यपदकांच्या मानकरी ठरल्या. राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत प्रवरा कन्या विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज लोणी येथील १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने ४x१०० मीटर फ्रीस्टाइल रिले स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळविले. सदर स्पर्धेमध्ये कु. सेजल लष्करे, कु. सुप्रिया आपसुंदे , कु.साक्षी खतेले आणि कु.शौर्या जगताप या विद्यार्थ्यीनीं सहभागी झाल्या होत्या.

प्रवरेच्या अभियांञिकी महाविद्यालयातील एन.बी,ए. मानांकीत “इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल अभियांत्रिकी” विभागाच्या पाच विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एन.बी.ए. मानांकीत “इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल” विभागाच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या पाच विद्यार्थ्यांची इमर्सन एक्सपोर्ट इंजिनिअरिंग सेंटर., नाशिक व जॉन्सन कंट्रोल., पुणे’ या बहुराष्ट्रीय कंपण्यामध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करून ५.६० लाखांपर्यंत पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून दिल्याने महाविद्यालयाचे परिसरातून कौतुक होत आहे,

महाराष्ट्र शासनाच्या करियर कट्टा उपक्रमांतर्गत उत्कृष्ट केंद्र हा पुरस्कार

लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली याचे कारण म्हणजे महाविद्यालयाला नुकताच
महाराष्ट्र शासनाच्या करियर कट्टा उपक्रमांतर्गत उत्कृष्ट केंद्र हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुणे येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला या पुरस्काराबरोबरच रुपये एक लाखाचा धनादेश सन्मानचिन्ह महाविद्यालयास प्रदान करण्यात आले हा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी स्वीकारला. शासनाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअर कट्टा हा उपक्रम चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून यावा यासाठी हा पुरस्कार महाविद्यालयास मोलाचा ठरणार आहे

राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव तालुकास्तरीय स्पर्धेत लोणीच्या प्रवरा कन्या विद्या मंदीर विद्यार्थ्यींनींच्या संघाने पटकवला प्रथम क्रमांक

जिल्हास्तरासाठी झाली निवड….

राहाता तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग आणि तालुका विज्ञान गणित अध्यापक संघटना यांचे संयुक्त विद्यमाने श्री यशवंतराव चव्हाण माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय राजुरी येथे राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था रवीनगर , नागपूर आणि जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा मानवाच्या शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या प्रमुख विषयांतर्गत भरड धान्य पौष्टीक आहार , आधुनिक प्रगत तंत्रज्ञान , विज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर पार पडली. या स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणीच्या विद्यार्थ्यींनींच्या संघाने पटकवला प्रथम क्रमांक मिळवत जिल्हा पातळीवर निवड झाली आहे.

आश्वी खुर्द येथील विद्यानिकेतन चे राज्यस्तरीय ड्रॉपरोबॉल स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळविले यश

लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन आणि कनिष्ठ महाविद्यालय शाळेच्या विद्यार्थ्यांनी नायगाव जि. सातारा येथे संपन्न झालेल्या १४ व्या राज्यस्तरीय ड्रॉपरोबॉल स्पर्धेत विवीध बक्षिसे विद्यार्थ्यानी प्राप्त केली.

या स्पर्धेत ज्युनियर गटात चि. पृथ्वीराज क्षिरसागर याने सिंगल इव्हेंट मधे प्रथम पारितोषिक व गोल्ड मेडल मिळविले, चि. अभिनव डहाळे याने ट्रिपल इव्हेंट मधे प्रथम पारितोषिक व गोल्ड मेडल मिळवले, ज्युनियर मुली गटात कु. गंभीरे शेडळ, कु. तेजल गंभीरे व वैष्णवी जेडगुले यांनी ट्रिपल इव्हेंट मधे प्रथम पारितोषिक व गोल्ड मेडल मिळवले , तसेच सब ज्युनियर मुली गटाच्या स्पर्धेत कु. रुपाली शेंडकर व कु समिक्षा मुन्तोडे यांनी डबल इव्हेंट मधे द्वितीय पारितोषिक व सिल्व्हर मेडल मिळवले, ज्युनियर मुले गटात चि. विवेक वर्पे याने सुपर सोलो इव्हेंट मधे प्रथम पारितोषिक व गोल्ड मेडल मिळवले, चि. ओमकार म्हस्के याने ट्रिपल इव्हेंट मधे प्रथम पारितोषिक व गोल्ड मेडल मिळवले तर चि. प्रसाद लावरे याने डबल इव्हेंट मधे द्वितीय पारितोषिक व सिल्व्हर मेडल मिळवले.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे जयंतीनिमित्त चिञकला स्पर्धा

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे जयंतीनिमित्त,प्रवरा कला अध्यापक संघ आयोजित भव्य ललित कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध व सुंदर बनली आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून पद्यश्रीच्या विचार आणि कार्याचीही ओळख करुन देण्यात आली. प्रवरा कन्या विद्यामंदिर प्राथमिक आणि माध्यमिक मिळून १७८० विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणीचा फुटबॉल संघ राज्य पातळीवर…

सोलापूर येथे झालेल्या विभागीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिर,लोणीच्या संघाने सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल १७ वर्षी वयोगटांत सेमी फायनल मध्ये सोलापूर ग्रामीण संघाचा ७-० ने पराभव केला तर अंतिम फेरीत पुणे पीसीएमसी संघाचा १-०ने पराभव करून विभागीय स्पर्धेत यश मिळविले.

प्रवरेच्या इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर ॲण्ड डेअरी सायन्सेसच्या चार विद्यार्थ्याची निवड…

लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर ॲण्ड डेअरी सायन्सेस लोणी, महाद्यालयातील डेअरी डिप्लोमाच्या ४ विद्यार्थ्यांची प्रिमियम सिरम्स ॲण्ड व्हॅक्सिन्स प्रा.लि.नारायणगाव,पुणे कंपनी या कंपनीमध्ये निवड झाली आहे.
आज पशुसंवर्धन विभागामध्ये मोठी करीअर संधी उपलब्ध होत आहे.संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल, पशुसंवर्धन मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था आणि महाविद्यालय पातळीवर विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम सुरु आहेत.विविध जनजागृती कार्यक्रम,माजी विद्यार्थी संघटना यामुळे ग्रामीण मुलांना मोठी संधी मिळत आहे. प्रिमियम सिरम्स ॲण्ड व्हॅक्सिन्स प्रा.ली.नारायणगांव ,पुणे कंपनीमध्ये शुभम हळनोर, प्रज्वल देशमुख, अजय निर्मळ, ऋषिकेश पुणेकर यांची निवड झाली आहे.

प्रवरेच्या डाॅ.महेश खर्डे आणि डॉ. अनिल वाबळे यांना नाविन्यपूर्ण संशोधनासाठी पेटंट..

पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र संशोधन केंद्रांतर्गत प्रेरणा धनंजय जाधव यांनी डॉ. महेश खर्डे व डॉ. अनिल वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले “रुटा ग्रेव्होलेन्स एल पासून हर्बल औषधांची निर्मिती आणि विकास” या विषयावर पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करत असताना हर्बल औषधांची निर्मिती आणि त्यांचा विकास या अनुषंगाने नाविन्यपूर्ण संशोधन करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती ही पदवी संपादन केली आहे. आपल्या संशोधनामध्ये प्रेरणा जाधव यांनी “रुटा ग्रेव्होलेन्स एल” या वनस्पतीच्या माध्यमातून हर्बल औषधांची निर्मिती करत असताना या औषधांचा विविध उपचारांसाठी उपयोग होऊ शकतो अशा पद्धतीचे संशोधन केले. त्यांच्या या संशोधनाच्या अनुषंगाने डॉ. महेश खर्डे आणि डॉ. अनिल वाबळे यांनी पुढे आणखी सखोल व नाविन्यपूर्ण संशोधन करत हर्बल औषधांची निर्मिती व विकास कसा होत जाईल व त्याचा मानवी जीवनासाठी व आरोग्यासाठी कसा उपयोग होईल यासंदर्भात संशोधन केले
या संशोधनावर आधारित पेटंट मिळवण्यासाठी अर्ज सादर केला. त्यांच्या या संशोधनाची दखल घेऊन त्यांना नुकतेच पेटंट मिळाल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. नाविन्यपूर्ण संशोधन करून पेटंट मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
त्यांच्या या संशोधकीय कार्याबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, संस्थेचे अतिरिक्त सचिव डॉ. शिवानंद हिरेमठ व पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना पोलीस आणि सैन्‍य भरती प्रक्रीयेसाठी असलेले शारिरीक आणि बौध्‍दीक प्रशिक्षण स्‍थानिक पातळीवरच उपलब्‍घ करुन देण्‍यासाठी महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने १४ प्रशिक्षण केंद्रांची सुरुवात…

राज्‍यात पोलीस भरती प्रक्रीया सुरु झाल्‍यानंतर ग्रामीण भागातील असंख्‍य तरुण तरुणी या भरती प्रक्रीयेसाठी शहरातील प्रशिक्षण केंद्राकडे आकर्षित होवून तिथे आपला प्रवेश घेतात. मात्र या विद्यार्थ्‍यांना राहाण्‍याची सुविधा उपलब होत नाही. आशा पार्श्‍वभूमीवर निर्माण होणारी अडचण दुर करण्‍यासाठी महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सामाजिक बांधिलकीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांसाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या माध्‍यमातून प्रशिक्षण केंद्राची उभारणी करुन, पोलीस, सैन्‍य भरती प्रक्रीयेतील इच्‍छुक विद्यार्थ्‍यांना संधी उपलब्‍ध करुन दिली आहे.
मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या संकल्‍पनेतून संस्‍थेची महाविद्यालये असलेल्‍या १४ गावांमध्‍ये ही प्रशिक्षण केंद्र सुरु झाली आहेत. केंद्रामध्‍ये दाखल झालेल्‍या विद्यार्थी, विद्यार्थींनींना रोज सकाळी आणि संध्‍याकाळी ५.३० ते ७.३० या कालावधीत मैदानावर शारिरीक प्रशिक्षण दि‍ले जाते. या मध्‍ये प्रामुख्‍याने धावणे, गोळाफेक, लांब उडी, सुर्य नमस्‍कार, योगासने अशा क्रिडा प्रकारांचा समावेश असून यासाठी संस्‍थेतील क्रीडा शिक्षक विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करीत आहेत. बाहेरील मार्गदर्शकांनाही यासाठी नियुक्‍त करण्‍यात आले असून, त्‍यांचेही मार्गदर्शन या विद्यार्थ्‍यांना उपयुक्‍त आणि महत्‍वपूर्ण ठरत आहे.

प्रशिक्षण घेत असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या वतीने दररोज केळी, अंडी आदि दूध यांचा नाष्‍टा सकाळी मोफत स्‍वरुपात देण्‍यात येतो. दुपारच्‍या वेळी या विद्यार्थ्‍यांना बौध्दिक आणि स्‍पर्धा परिक्षांसाठी उपयुक्‍त असलेले शैक्षणिक मार्गदर्शनाची सुविधाही महाविद्यालयांमधून निर्माण केली आहे. केवळ पोलीस आणि सैन्‍य भरती नाही तर शासनाच्‍या सरळ सेवा भरती प्रक्रीयेत आवश्‍यक असलेल्‍या सर्वच स्‍पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन तज्‍ज्ञ मार्गदर्शकांकडून देण्‍यात येत आहे. डिसेंबर २०२२ पासून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने हा उपक्रम सुरु केलेला उपक्रम भविष्‍यातही कायमस्‍वरुपी सुरु ठेवण्‍याचा मानस मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना स्‍थानिक पातळीवरच हे प्रशिक्षण मोफत उपलब्‍ध झाल्‍याने याचा मोठा दिलासा विद्यार्थी, विद्यार्थींनींना मिळाला असून, आत्‍तापर्यंत ६१९ विद्यार्थी या केंद्रामध्‍ये दाखल झाले आहेत.

प्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह,प्रवरानगर यांच्यावतीने लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीच्या पद्यश्री डाॅ.विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते अमृत महोत्सवी स्वातंञ दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले.

प्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह,प्रवरानगर यांच्यावतीने लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीच्या पद्यश्री डाॅ.विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते अमृत महोत्सवी स्वातंञ दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संस्थेचे विश्वस्त माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जि.प.सदस्या रोणीनीताई निघुते,संस्थेचे सर्व संचालक, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,सह सचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक सौ.लिलावती सरोदे, प्राचार्य डाॅ.प्रदिप दिघे यांच्यासह सर्व प्राचार्य विद्यार्थी उपस्थित होते.
प्रवरा शैक्षणिक संकुल आणि प्रवरा उद्योग समुह येथे राज्याचे महसुल,पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंञाचा अमृत महोत्सव आणि”हर घर तिरंगा..हर मन तिरंगा “या अंतर्गत प्रभात फेरी,पथनाट्य,चिञरथ याबरोबरचं विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक संकुलात स्वातंञ्याचा अमृत महोत्सवानिमित्त विशेष सप्ताह सुरु असून यामध्ये शिक्षक,पालक सर्व नागरीकांचा सहभाग घेण्यात येत आहे.
आजच्या स्वातंञदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यानी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रमातून सर्वधर्म समभावांची शिकवण देण्यात आली.मान्यवरांना संस्थेतील एन.सी.सी.,सुरक्षा कर्मचारी यांनी मानवंदना दिली.

लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेल विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या प्रवरानगरच्या प्रवरा पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार घोषित करण्यात आला.

लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या प्रवरानगरच्या प्रवरा पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार घोषित करण्यात आला. हा पुरस्कार बद्दल राज्याचे महसुल,पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंञी तसेच लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्कुलचे अभिनंदन केले आहे.