खेड्यातील मुलां-मुलींना उच्च शिक्षणासाठी आयआयटी सारख्या ठिकाणी प्रवेश मिळविता यावा याकरिता मुंबई येथील अवंती या संस्थेशी शैक्षणिक करार- डॉ. यशवंत थोरात

उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता. खेड्यातील मुलां-मुलींमध्ये प्रवेश परीक्षेबाबत असलेला न्युनगंड घालवून त्यांच्या करियरच्या स्वप्नपुर्तीसाठी आयआयटी सारख्या ठिकाणी प्रवेश मिळविता यावा यासाठी  या  मुलां-मुलींना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी  लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने आता  स्पर्धा परिक्षा साठी  मार्गदर्शनाचे उत्कृष्ठ काम करणाऱ्या मुंबई येथील अवंती या संस्थेशी शैक्षणिक करार केला असून आधुनिक शिक्षण पद्धतीच्या गुरुकुल निर्मिती कडे वाटचाल केली असल्याचे संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण व त्याचबरोबर बारावीनंतरच्या जेईई व तत्सम प्रवेश स्पर्धा परिक्षेत उत्तम यश प्राप्त होण्यासाठी मुंबई येथील अवंती या संस्थेशी नुकताच  करार करण्यात आला. यावेळी प्रवरा एवीएशन संस्थेच्या संचालिका सुस्मिता माने-देशमुख, अवंती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा रामकुमार, संस्थेचे शिक्षण व अस्थापणा संचालक प्रा.दिगंबर खर्डे उपस्थित होते.

डॉ. यशवंत थोरात म्हणाले की, ग्रामीण  भागामधील विद्यार्थ्यांना जेईई अथवा तत्सम प्रवेश परिक्षा स्पर्धेबाबत मोठी अडचण भासते. पालकांनाही याबाबत अतिशय कमी प्रमाणात माहीती असते. त्यामुळे होतकरू व पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांच्या चांगल्या करियरच्या संधी हुकल्या जातात. यावर प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने आता नवे पाऊल उचलले असून त्यादृष्टीने मुलांचे नुकसान होऊ नये व त्यांना प्रवेश स्पर्धा परिक्षेबाबत आवड निर्माण व्हावी व उत्तम यश प्राप्त करून योग्य दिशा प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

संस्थेतील ईयत्ता आठवी पासूनच विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत शिक्षकांमार्फत विशेष प्रशिक्षण देणार आहेत. यासाठी प्रवेरतील शिक्षकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन दिल्यावर अकरावी व बारावीत त्यांना जेईई व इतर प्रवेश स्पर्धा परिक्षेबाबत आणखी सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी क्रमिक पुस्तके, डीजीटल अँप व विशिष्ठ अभ्यासक्रम यांचा वापर होईल. त्यामुळे विद्यार्थी चागल्या प्रकारे तयार होतील व परिक्षेत उत्तम यश प्राप्त करतीलच परंतू त्यांना करियरची योग्य दिशा व उच्च शिक्षणासाठी आयआयटी सारखी योग्य संस्था निवडणे सोपे होईल याची खात्री असल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले.

सध्या बारावीत विज्ञान शाखेतील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश स्पर्धा परिक्षेच्या मार्गदर्शनासाठी संस्थेने “२०२० प्रवरा टू आयआयटी” हा उपक्रम हाती घेतला असून तिनशे विद्यार्थ्यांनी निवड करून जेईई प्रवेश परिक्षेची ऑनलाईन सराव परिक्षा घेण्यात अली.  यातून विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना एक महिन्याचे अवंती या संस्थेमार्फत विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे. अवंती या संस्थेच्या मार्गदर्शनातून आयआयटी मध्ये प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने हा शैक्षणिक करार केला असल्याचे डॉ. यशवतं थोरात यांनी शेवटी सांगतिले.

कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा) पालक मेळावा

आवडीनुसार महाविद्यालयीन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना पालकांकडून हळूहळू स्वातंत्र्य मिळत असले तरी,स्वावलंबी आयुष्य जगताना मुलांना आत्मविश्वास मिळण्यासाठी  धावपळ आणि धकाधकीच्या जीवनातील पालकांनी आपल्या मुलांशी लक्ष आणि सुसंवाद  ठेवावा असे प्रतिपादन कृषिभूषण बन्सी पाटील तांबे यांनी केले.

लोणी येथील प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा) आणि लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या पाल्यांच्या अभ्यासातील प्रगती पालकांना समजावी या साठी आयोजित केलेल्या विद्यार्थी,शिक्षक आणि पालक मेळाव्यात प्रेमिक पाहुणे म्हणून बन्सी पाटील तांबे बोलत होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ. शिवानंद हिरेमठ,प्राचार्य  दत्तात्रय थोरात,सौ.औटी,श्री देशमुख श्री जाधव,श्री हारदे प्रा दत्तात्रय थोरात, प्रा. विशाल  तांबे   आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रा. प्रदीप घुले यांनी प्रस्ताविक केले.

या वेळी प्रा. विशाल तांबे ,प्रा वैशाली अरगडे यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. प्रा जालिंदर पाटील यांनी आभार व्यक्त केले.

फोटो कॅप्शन :- लोणी येथील प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा) आणि लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विद्यार्थी,शिक्षक आणि पालक मेळाव्यात मार्गदर्शन करताना कृषिभूषण  बन्सी पाटील तांबे समवेत प्राचार्य डॉ. शिवानंद हिरेमठ,प्राचार्य  दत्तात्रय थोरात,प्रा. प्रदीप घुले, प्रा. विशाल  तांबे   प्रा वैशाली अरगडे आदी.

प्रवरा कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयांचा ग्रीनलाईफ अग्रो इंडस्ट्री प्रा. लि.बरोबर सामंज्यस करार

प्रवरा कृषी व कृषी सल्ग्नित महाविद्यालायान्द्वारे ग्रीनलाईफ अग्रो इंडस्ट्री प्रा. लि. नेवासा या नामांकित कंपनीशी औद्योगिक व शैक्षणिक सामंज्यस करार झाला असल्याची माहिती प्राचार्य रोहित उंबरकर यांनी दिली.

या सामंज्यस कराराद्वारे संस्थेंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय ,कृषी जैवतंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय व व्यवस्थापन या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रशिक्षण कार्यशाळा, शेतकरी मेळावे, अनुभवी उद्योगांचे मार्गदर्शन व नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याचे   ग्रीनलाईफ कंपनीचे अध्यक्ष किरण जोंधळे यांनी सांगितले . कृषी व कृषी सलग्न महाविद्यालयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,कृषी महाविद्यालयाचे  प्राचार्य. निलेश दळे,कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे  प्राचार्य. रोहित उंबरकर, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. ऋषिकेश औताडे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारासाठी ट्रेनिंग व प्लेसमेण्ट अधिकारी प्रा. रमेश जाधव, प्रा. धीरज कारले यांनी विशेष परिश्रम घेतले.


फोटो कॅप्शन :-प्रवरा कृषी व कृषी सल्ग्नित महाविद्यालायानी नेवासा येथील ग्रीनलाईफ अग्रो इंडस्ट्री प्रा. लि.  या नामांकित कंपनीशी औद्योगिक व शैक्षणिक सामंज्यस करारावर स्वाक्षरी करताना ग्रीनलाईफ कंपनीचे अध्यक्ष किरण जोंधळे,  कृषी व कृषी सलग्न महाविद्यालयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,कृषी महाविद्यालयाचे  प्राचार्य. निलेश दळे,कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे  प्राचार्य. रोहित उंबरकर, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. ऋषिकेश औताडे, ट्रेनिंग व प्लेसमेण्ट अधिकारी प्रा. रमेश जाधव, प्रा. धीरज कारले आदी.

कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालत नुकताच देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंती निमीत्त कृषी शिक्षण दिवस साजरा

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालत नुकताच देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंती निमीत्त कृषी शिक्षण दिवस साजरा करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर यांनी दिली.

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महाविद्यालयातील प्रा.राहुल पाचोरे यांनी देशातील व महाराष्ट्र राज्यातील कृषीक्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची विद्यार्थ्यांना माहिती देताना भविष्यातील संधीची जाणीव करून दिली. कृषी क्षेत्रातल्या उच्च शिक्षणाच्या संधी विषयी मार्गदर्शन केले तसेच कृषी पदवीधारकांनी शेतकरी सुखी होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले.  सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल विखे, प्राध्यापक वृंद  व सर्व स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो कॅप्शन –  कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालत नुकताच देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंती निमीत्त कृषी शिक्षण दिवस साजरा करताना विद्यार्थी .

राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत लोणी येथील विखे पाटील तंत्रनिकेतनचे विदयार्थी चमकले असून चांगली कामगीरी करत तृतिय क्रमांकाचे पारितोषिक पटकावीले

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यातर्फे नाशिक येथील संदीप तंत्रनिकेतन येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत लोणी येथील विखे पाटील तंत्रनिकेतनचे  विदयार्थी  चमकले असून चांगली कामगीरी करत तृतिय क्रमांकाचे पारितोषिक पटकावीले असल्याची माहीती प्राचार्य प्रा.दशरथ मगर यांनी दिली.

विखे पाटील तंत्रनिकेतनचे मेकॅनिकल विभागाचे महेश वणे, निलेश खर्डे हे विद्यार्थ्यी या प्रश्नमंजुषा स्पर्धेत  तृतिय क्रमांकाचे पाच हजार रूपयांचे बक्षिसाचे मानकरी ठरले आहे. तसेच चेतन कोकाटे, कुणाल बेंद्रे यांचीही कामगीरी सरस झाली आहे. त्यांना विभाग प्रमुख प्रा.राजेंद्र बेलकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कल्पक नेतृत्वाने अभ्यासक्रमाच्या पलिकडे जावून प्रवरेत अत्याधुनिक शिक्षण पध्दती सुरू आहे. आमचे विद्यार्थी सर्व स्तरावर आघाडीवर आहेत. विद्यार्थी केंद्रबिंदू माणून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे प्राचार्य प्रा.दशरथ मगर यांनी सांगितले.


फोटो कॅप्शन –  लोणीः विखे पाटील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत यश प्राप्त केल्याबद्द्ल त्यांचा सत्कार करताना प्राचार्य प्रा. दशरथ मगर.

प्रवरा फार्मसीत एकदिवसीय दिव्यांग कार्यशाळा उत्साहात.

लोणी येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभुषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विध्यार्थ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.

या कार्यशाळेत पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील मराठी  विषयाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. शांताराम चौधरी यांनी दिव्यांगासाठी “भविष्यातील वाटचाल व संधी” या विषयावर मार्गदर्शन केले, त्यात त्यांनी दिव्यांगासाठी सरकारी नोकरी, वेगवेगळ्या संधी अस्या  सर्व बाबींवर उपस्थितांचे  लक्ष वेधले व सखोल माहिती दिली, या सत्रास परिसरातील विविध क्षेत्रातील दिव्यांग, विध्यार्थ्यांचा उत्स्पुर्थ प्रतिसाद लाभला या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी व्हर्चू फार्मासुटीकल्स, श्रीरामपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गागरे होते, सत्राचे प्रास्ताविक प्रा. हेमलता भवर यांनी केले, समारोप प्रसंगी आभार महाविद्यालयाचे प्रा. सोमेश्वर मानकर यांनी मानले, सदर कार्यशाळेस सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन :- लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विध्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी व्हर्चू फार्मासुटीकल्स, श्रीरामपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गागरे,  प्रा. डॉ. शांताराम चौधरी, प्राचार्या डॉ. प्रिया राव,  प्रा. हेमलता भवर यांनी केले, प्रा. सोमेश्वर मानकर आदी.

लोणी येथे युवा प्रबोधन केंद्राच्या वतीने तीन दिवसीय व्याख्यामालेस युवा वर्गाचा प्रचंड प्रतिसाद

आजच्या संघर्षमय जीवनात, यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा, भौतिक गोष्टींची प्रलोभने यामुळे  धकाधकीच्या  आणि असुरक्षित दैनंदिन जीवनात  निर्माण होणाऱ्या चिंता आणि संकटांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनाचा खूप फायदा होतो असे प्रतिपादन शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग अंतर्गत परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र श्री नितिन भाऊ यांच्या मार्गदर्शनाने कार्यरत असलेले लोणी येथील श्री स्वामी समर्थ  युवा प्रबोधन केंद्र  यांच्या आयोजनाने राष्ट्रीय  युवादिनानिमित्त आयोजित केलेल्या तीन दिवसीय युवा प्रबोधन व्याख्यानमालेचे उद्घाटन प्रसंगी  सौ. शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या.शिर्डी येथील  उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, संस्थेच्या कृषी संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश दळे, कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित उंबरकर, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सौ.शालिनीताई विखे पाटील म्हणाल्याकी, विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर अध्यात्म पण तितकाच महत्वाचा आहे जेव्हा आद्यत्म आणि विज्ञान यांची सांगड होते तेव्हा यश नक्कीच मिळेल आणि उच्चपदापर्यंत पोहचता येईल असे त्या म्हणाल्या. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संधी व आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी  शिर्डी चे उपविभागीय पोलिस अधिकारी .सोमनाथ वाघचौरे साहेब उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “स्पर्धा परीक्षा हे आव्हान नसून संधी” असल्याचे मत व्यक्त केले तसेच एकूण परिक्षा प्रणाली त्यातील संधी यावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून उपस्थित विद्यार्थ्यांना “तुम्हीही अधिकारी होऊ शकता” असा आत्मविश्वास देत प्रेरित केले. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पा.(पाटोदा,औरंगाबाद) तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे उपस्थित होते.श्री . पेरे यांनी  ग्रामविकासाचा युवकांचे योगदान या विषयावर बोलताना म्हणाले की,”विचार बदला देश बदलेल आणि बदलाची सुरुवात स्वतःपासून करा.संतांचे विचार म्हणजेचं अध्यात्माला विज्ञानाची जोड दिली तर भारत महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही.राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालून गावाचा विकास कसा करावा ?” याचं सूत्र सांगितलं. युवा प्रबोधन केंद्राबद्दल बोलताना म्हणाले की,हे विद्यार्थी योग्य दिशेने वाटचाल करत आहेत पण यामध्ये अनेक खडतर वाट असून अनेकदा नैराश्य पदरी पडते त्यातूनही तुम्ही मार्ग काढून योग्य वाटचाल करताय याचा आनंद वाटतो. कार्यक्रमाच्या सांगतेला तिसरे पुष्प गुंफण्यासाठी प्रसिद्ध विचारवंत अभय भंडारी( विटा,सांगली) साहेब उपस्थित होते. स्वामी विवेकानंद आणि आजचा तरुण या विषयावर विचार मंथन करताना “भारतासारख्या सुसंस्कृत भूमीत  जन्म होणे हे आपले भाग्य आहे.

परराष्ट्रात जाऊन हिंदू संस्कृतीचे दर्शन करणाऱ्या  स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेऊन मानसिक, शारीरिक, भावनिक,बौद्धिक रित्या सक्षम बना. दृढ आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे.” असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले तसेच “विवेकानंदांच्या संकल्पनेतील युवक घडवण्याचं काम श्री स्वामी समर्थ युवा विभागाच्या माध्यमातून सुरू आहे या लक्ष शुभेच्छा देऊन मार्गदर्शन करण्यास सदैव तत्पर राहील असे आश्वासन दिले. या व्याख्यानमालेसाठी युवा वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती.

फोटो कॅप्शन :- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग अंतर्गत परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र श्री नितिन भाऊ यांच्या मार्गदर्शनाने कार्यरत असलेले लोणी येथील श्री स्वामी समर्थ  युवा प्रबोधन केंद्र  यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय  युवादिनानिमित्त आयोजित केलेल्या तीन दिवसीय युवा प्रबोधन व्याख्यानमालाचे उदघाटन करताना सौ. शालिनीताई विखे पाटील, मार्गदर्शन करताना शिर्डी चे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, समवेत  डॉ. मधुकर खेतमाळस,  प्राचार्य निलेश दळे, प्राचार्य रोहित उंबरकर,  प्राचार्य ऋषिकेश औताडे आदी .

आर्मी डे परेड संचालनात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने दुर्गापूर गावाचे भूषण ठरलेल्या चेतनकुमार भारती याच्यावर प्रवरा परिसरातुन कौतुकाचा वर्षाव

कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना केवळ राष्ट्रभक्तीच्या प्रेमातून भारतीय सेना दलामध्ये रुजू व्हायचेच.या इकच इर्शेतून  लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयात शिक्षण घेताना एन. सी.सी च्या माध्यमातून अनेक उपक्रमात सहभाग घेताना  मध्यप्रदेशातील सिग्नल कोर येथे खडतर आर्मी प्रशिक्षण पूर्णकेल्यानंतर सेनेमध्ये दाखल झालेल्या चेतनकुमार दत्तात्रय भारती या तरुणाला नुकताच १५ जानेवारी २०२० मध्ये दिल्ली येथे पार पडलेल्या आर्मी डे परेड संचालनात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने दुर्गापूर गावाचे भूषण ठरलेल्या चेतनकुमार भारती याच्यावर  प्रवरा परिसरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लहानपणापासूनच भारतीय सेनेत प्रवेश घ्यायचा असे स्वप्न बाळगणाऱ्या चेतनकुमार भारती याने लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश घेताना पहिल्या वर्षीच एन सी.सी मध्ये सहभाग घेऊन  बी.सटिफिकेट प्राप्त केले. तर,द्वितीय वर्षांमध्ये असताना २६ जानेवारी २०१४ राजी दिल्ली येथील राजपथवर झालेल्या परेड संचलनात महाराष्ट्र डायरेक्टरेट च्या ट्रूप  मध्ये प्रतिनिधित्व केले. त्यानंतर महाविद्यालयामध्ये एन सी सी  सिनियर अंडर ऑफिसर म्हणून काम करताना आपल्या मित्रांना मार्गदर्शन केले. प्रवरा आदयोगिक,शैक्षणिक,सांस्कृतिक व अयोग्य समुहाच्यावतीने लोणी येथे होणाऱ्या स्वतंत्रदिन परेड संचालनामध्ये कमांडर म्हणून काम पहिले.राजपथवर झालेल्या परेड संचलनात प्रवरा परिवाराच्या वतीने सहभाग घेतल्याबद्दल माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी परिवाराच्या वतीने विशेष सन्मानित केले होते. 

अदयाप एसटी बसचीही सुविधा नसलेल्या राहता तालुक्यातील दुर्गापूर या खेडेगावातील चेतनकुमार भारती याने सिग्नल कोर ,जबलपूर (मध्यप्रदेश) येथील आर्मी ट्रेनींग सेंटर मध्ये खडतर प्रशिक्षण घेऊन ५ फेब्रुवारी २०१९ मध्ये भारतीय सेनेत आपल्या देशाची सेवा  कारण्यास सुरवात केली. विशेष म्हणजे या वेळी झालेल्या कसम परेड मध्येही चेतनकुमारला विविध ट्रूपच्या  संचलनात परेड कमांडर म्हणून सन्मान मिळाला. सिग्नल कोर ,जबलपूर येथे प्रशिक्षण घेताना ‘बेस्ट ड्रील ‘चे मेडल देऊन त्याचा सन्मानही करण्यात आला होता. केवळ जिद्द,अपार मेहनत, चिकाटी मुळेच चेतनकुमारला सेनेत दाखल होताच २ मेडल मिळाल्याने दुर्गापूर आणि प्रवरा परिसराला चेतनकुमार चा नक्कीच अभिमान आहे. 

आता २६ जानेवारी २०२० मध्ये राजपथ,दिल्ली होणाऱ्या परेड संचलनात सहभाग घेण्यासाठी जुलै २०१९ पासूनच खडतर प्रशिक्षणात सहभाग घेतला होता. नुकत्याच झालेल्या आर्मी डे परेड संचालनात सहभागी हिऱ्यांचे भाग्य चेतन कुमार याला मिळालेले आहेच. महाविद्यालयीन जीवनामध्ये कॅप्टन प्रा. सुजाता देवरे,लेप्टनंट प्रा. राजेंद्र पवार या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

चेतनकुमारच्या यशाबद्दल माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, आण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील,सौ. शालिनीताई विखे पाटील,डॉ. यशवंत थोरात, प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे आदींसह शिक्षक आणि विदयार्थी तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संपन्न

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन  महाविद्यालययांच्या सयुंक्त विद्यमाने शिक्षण-संस्कार-आरोग्य-कृषी-स्वावलंबन आधारित ग्रामविकास आदींसह विविध उपक्रमाद्वारे  विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासावर भर असणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनातून गोगलगाव राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संपन्न झाले असल्याची माहिती संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी दिली.

शिबिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखान्याचे संचालक श्री. सारंगधर दुशिंग, सरपंच सौ. संगीता माघाडे , उपसरपंच श्री. कैलास खाडे , कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षण-संस्कार-आरोग्य-कृषी-स्वावलंबन आधारित ग्रामविकास आदींसह विविध उपक्रमाद्वारे  विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासावर भर असणाऱ्या या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्याख्याने, प्रात्यक्षिक व शिवार भेटी, सांस्कृतिक तसेच  व्यक्तिमत्व विकासाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मौजे गोगलगाव येथे स्वयंसेवकांनी पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, आरोग्य, मोबाईल दुष्परीणाम, नारी शक्ती इ. विषयी नागरिकांमध्ये  जनजागृती केली.  शिबिराच्या समारोप कार्यक्रमासाठी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष श्री. नामदेव पांढरकर,  माजी उपसरपंच श्री. बाळासाहेब धूळसुंदर, प्रा. रमेश जाधव मान्यवर उपस्थिती होते  शिबीर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी  प्रा. संदीप पठारे, प्रा.राहुल विखे आणि सर्व स्वयंसेवक इ. आदींनी परीश्रम घेतले.

सदातपुर मध्ये रा.सो.यो.मार्फत पि.एम किसान योजना शिबिर

लोणी येथील  कृषी जैतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने सादतपूर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये विविध कार्यक्रमाबरोबरच शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेचा प्रचार आणि प्रसार करून नावनोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची कागदपत्रे अद्ययावत करण्यात आली असल्याची माहिती रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी दिली.

सदर शिबिराचे उदघाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी आणि रासेयोचे कार्यक्रम समन्वयक डॉ.महावीरसिंग चव्हाण,सादतपुरच्या सरपंच सौ.अंजनीताई कडलग, श्री.बबनराव काळे,  कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित उंबरकर, प्रा.सिताराम वरखड,आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी डॉ.महावीरसिंग चव्हाण यांनी रासेयो शिबिर हे सुजान नागरिक घडविण्याची पाठशाळा आहे तसेच स्वयंसेवकांनी कॉलेज -नॉलेज -व्हिलेज या प्रक्रियेतून ग्रामविकासात आपले ज्ञान राबविले पाहिजे आणि शिबिरामुळे विद्यार्थी खेड्यांशी जोडला जातो असे प्रतिपादन केले.

संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या सात दिवसाच्या शिबिरात विविध प्रकल्प सादतपूर या गावत राबवण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण आणि नैसर्गिक संवर्धन, सर्वांगीन ग्रामीण विकास, स्वच्छता अभियान, व्यक्तिमत्व विकास, बेटी बचाव, हागणदारी मुक्त अभियान, वृक्ष लागवड इ.उपक्रम राबविले आहे. गावात जवळपास १४० झाडांची लागवड करून लोकसहभागातून सदर झाडांना सरंक्षण जाळी बसविल्या आणि ग्रामस्थांना झाडांचे संगोपन करण्यसाठी प्रोत्साहित केले.  तसेच गावात पथनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबविले. संत गाडगेबाबा एक मुक्त सिंचन, कृषी क्षेत्रातील भविष्यातील शक्यता, आरोग्यदायी योग, व्यक्तिमत्त्व विकास, ग्रामीण विकासात युवकांचा वाटा, महात्मा गांधींचे ग्रामीण स्वराज्य या विषयांवर व्याख्याने आयोजित केले.

शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेचा प्रचार आणि प्रसार करून सदर योजनेसाठी नावनोंदणी आणि ज्यांची नावनोंदणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांचे कागदपत्रे अद्ययावत करणे यासाठीचे  विशेष शिबीर आयोजित केले.प्राथमिक शाळेतील विदयार्थ्यांना आरोग्यविषयी मूलभूत सवयी सांगितल्या. सदर शिबिराच्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या प्रसंगी सादतपूर  वि.का.सह.सोसायटीचे चेअरमन सतीश बाबासाहेब तांबे, व्हा चेअरमन रामनाथ नाथा काळे ,श्री.बबन बाबा शिरसाठ ग्रामविकास अधिकारी,श्री.प्रकाश मॅचिंद्र गोरे, उप सरपंच,जयराम बापूसाहेब गुंजाळ संचालक प्रवरा सहकारी बँक लि. मा.श्री.हेमंत वाघमारे मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा,सुनिल अप्पासाहेब मगर कामगार पोलीस पाटील सादतपुर,श्री. विजय मगर, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित उंबरकर, प्रा.सिताराम वरखड, श्री.संदीप कडलग,प्रा.अमोल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रम पार पाडण्यासाठी रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले तर प्रा.अमोल सावंत, प्रा.महेश चेंद्रे, प्रा.विशाल केदारी, प्रा.स्वप्नील नलगे आणि तृतीय वर्षातील स्वयंसेवक विक्रम पासले, आदित्य जोंधळे, सोन्याबापू केदार, धनश्री टेके, भावना शिंदे, प्रिया गवळी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

बारावी ते पदवीधारक युवक युवती साठी पदमश्री विखे पाटील महाविद्यालयात शनिवार ११ जानेवारी २०२० रोजी नामांकित कंपन्यांच्या मुलाखतीचे आयोजन.

पुणे येथील गुगल पे,फोने पे,भारत पे, एम स्विप,बँक योग्य बरोडा,ओला, अम्याझोन ,दिपलेप टेक्नॉलॉजी आदी कंपन्याचा सहभाग.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पदमश्री विखे पाटील कला , विज्ञान , वाणिज्य महाविलाया मध्ये शनिवार दि. ११ जानेवारी २०२० रोजी प्रवरा परिसरातील बारावी ते पदवीधारक युवक युवती साठी नामांकित कंपन्यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती असल्याची माहिती संस्थेचे प्लेसमेन्ट विभागाचे अधिकारी  प्रा. धनंजय आहेर यांनी दिली.

अभियांत्रिकी,फार्मसी,आर्किटेक्चर आणि कृषी पदवीधर युवक युवतींना जागतिक स्पर्ध्ये मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या साठी संस्थेचे अध्यक्ष माजी  मंत्री आ.श्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महासंचालक डॉ. यशवंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय कंपन्यांना प्रवरानिमंत्रिक करून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात येत असते.औदयोगिक कंपन्यांना  कौशल्यात्मक कार्यक्षमता असलेले मनुष्यबळ अपेक्षित असल्यानेच संस्थेच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या  स्किल डेव्हलपमेंट साठी विविध अभयसक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच स्पर्ध्ये मध्ये प्रवरेतील विद्यार्थी टिकाव यासाठी व्यक्तिमत्वविकासा सारखे प्रशिक्षणही देण्यात येत असल्याने अस्या परिसर मुलाखतीच्या माध्यमातून दरवर्षी  मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या  प्राप्त झालेल्या आहेत.

त्रांत्रिक शाखेच्या विदार्थ्यांप्रमाणेच अतांत्रिक शिक्षण घेत असलेल्या विद्याथ्यांनाही नोकऱ्या प्राप्त व्हाव्यात यासाठी संस्थेचा सातत्याने प्रयत्न असतो . याचाच एक भाग म्हणून शनिवार दि. ११ जानेवारी २०२० रोजी सकाळी ठिक ८.३० वाजे पासून  प्रवरा परिसरातील बारावी ते पदवीधारक कला ,वाणिज्य, विज्ञान डिप्लोमा, अभियांत्रिकी तसेच इतर कोणत्याही शाखेतील युवक युवती साठी नामांकित कंपन्यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या साठी पुणे येथील गुगल पे,फोने पे,भारत पे, एम स्विप,बँक योग्य बरोडा,ओला, अम्याझोन ,दिपलेप टेक्नॉलॉजी आदी कंपन्या या मुलाखती घेणार आहेत. नोकरी साठी निवड केलेल्या युवक युवतींना  १.८ लाख  ते ४ लाख वार्षिक वेतन या काम्नायांकडून प्राप्त होणार आहे.मुलाखतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला बायोडाटा,शाळा सो. दाखला व इतर  शैक्षणिक कागदपत्रांची छायांकित प्रत, दोन कलर पासपोर्ट साईज फोटो आणावेत तसेच प्रा. श्री  शेळके   मो. ९८९०५८७९०९ यांचेशी नावनोंदणीसाठी संपर्क करावा आणि प्रवरा परिसरातील  युवक युवती या संधीचा मोठ्या संखेने  उपस्थित राहून फायदा घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी केले आहे.

आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा संघ यंदाचा फिरत्या चषकाचा मानकरी

वक्तृत्व विषयातील महत्त्वाच्या स्पर्धेपैकी महाराष्ट्रात प्रसिध्द आणि मानाची समजली जाणाऱ्या  ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद  ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा”  मध्ये “२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे “! या विषयावर चौकस आणि अभ्यासपुर्ण मत मांडणाऱ्या पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा संघ यंदाचा फिरत्या चषकाचा मानकरी ठरला.

‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्ध्येच्या ३९ व्या  वर्षी “२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे “! असा विषय ठेवण्यात आला होता. अहमदनगर,धुळे ,नाशिक औरंगाबाद, पुणे सह राज्यभरातील सुमारे ३० वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातून ६० स्पर्धक सहभागी झाले होते यात ३७ मुलींनी उल्लेखनीय असा सहभाग नोंदविला. नाशिक येथील नासा-स्पेस च्या अभियंत्या सौ. अपुर्वा जाखडी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी सौ. शालिनीताई विखे पाटील , प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे  सदस्य आणि सचिव श्री भारत घोगरे, परीक्षक आर.बी.एन बी महाविद्यालयातील डॉ. उज्वला भोर,शेवगाव येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रा. ओंकार रसाळ,संगमनेर महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्राचे समन्वयक व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. अशोक लिंबेकर, प्राचार्य डॉ. प्रदीप दीघे प्रा. दत्तात्रय थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी उपप्राचार्य डॉ. रामचंद्र रसाळ यांनी प्रास्ताविक केले.

पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील निखिल बेलोटे आणि कु.आश्विनी टावरे यांच्या संघाला  फिरता पद्मश्री विखे पाटील करंडक आणि २१००/-चे पारितोषिक देण्यात आले तर, तसेच गुणानुक्रमे श्रेष्ष्ठ ठरणाऱ्या वरिष्ट गटातील पहिल्या चार क्रमांकाच्या निखिल बेलोटे आणि कु.आश्विनी टावरे स्पर्धकांना  ७,१०१/-रू पारितोषिक आणि प्रशस्तिपत्रक, द्वितीय क्रमांकांचे ५१०१/-रू,चे  पारितोषिक पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील सुमित मेहेत्रे आणि तृतीय क्रमांकाचे आणि ३,१०१/-रू चे पारितोषिक पुणे जिल्ह्यातील वारजे येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सुमित काळगे या स्पर्धकाला राजे, उतेजनार्थ  १५००/- चे पारितोषिक लोणी येथील कृषी महाविद्यालयातील ऋषिकेश चोळके या स्पर्धकांनी मिळविले.

कनिष्ठ महाविद्यालय गटातील संगमनेर येथील विशाल कानवडे याला प्रथम क्रमांकाचे २,५०१/-रू, प्रवरा कन्या विद्यामंदिरची कु. हृतिक वाघ या विद्यार्थिनीला द्वितीय क्रमांकाचे ,२,१०१/-रू चे पारितोषिक आणि प्रवरा पब्लिक स्कुलच्या कु. करुणा जगताप  तृतीय क्रमांकाचे १,५०१/-रू चे पारितोषिक तर उत्तेजनार्थ ७०१/-रुपयांचे पारितोषिक पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील कु. आकांशा पवार या स्पर्धकांनी मिळविले. गुणानुक्रमे पहिल्या दहा संघांना प्रवास खर्च, सर्व स्पर्धकांना मोफत भोजन आणि निवास व्यवस्था आणि विजेत्या स्पर्धकांना स्मृति चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

अपुर्वा जाखडी यांनी आजच्या काळात मुलं-मुलींमध्ये फारसा भेदभाव केला जात नसला तरी मिळालेल्या संधीचा योग्य वापर करून समाजासाठी काम करू शकतो  असे सांगताना प्रवरेच्या महाविद्यालयांमधून विदयार्थी विकसित होणारे विविध कार्यक्रम राबविले जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तर, सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांनी माध्यमांचा वापर केवळ माहिती मिळविण्यासाठीच करावा तसेच वाढदिवसानिमित्त देण्यात येणाऱ्या भेटवस्तू मध्ये पुस्तकाचा समावेश असावा असी अपेक्षा व्यक्त केली. शेवटी स्पर्धेचे कार्याध्यक्ष डॉ. शांताराम चौधरी यांनी आभार व्यक्त केले.
संयोजन समितीचे प्रा.उत्तम येवले,प्रा. डॉ राजेंद्र सलालकर,प्रा.अनिल गाढवे, डॉ, वैशाली  मुरादे,डॉ. भाऊसाहेब रणपिसे यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

फोटो कॅप्शन:- लोणी येथे प विखे पाटील कला,विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन रौप्य करंडक वाद विवाद स्पेर्धेमध्ये यंदाचा मानकरी ठरलेल्या  पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या संघातील निखिल बेलोटे आणि कु.आश्विनी टावरे या स्पर्धकांना  फिरता चषक आणि ७,१०१/-रू पारितोषिक प्रदान करताना नासा-स्पेस च्या अभियंत्या सौ. अपुर्वा जाखडी, सौ.  शालिनीताई विखे पाटील , सचिव भारत घोगरे,,प्राचार्य डॉ प्रदीप दिघे, उपप्राचार्य प्रा डी जी थोरात,प्रा सी एस गलांडे,कार्याध्यक्ष डॉ शांताराम चौधरी.