पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे जयंतीनिमित्त चिञकला स्पर्धा

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे जयंतीनिमित्त,प्रवरा कला अध्यापक संघ आयोजित भव्य ललित कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध व सुंदर बनली आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून पद्यश्रीच्या विचार आणि कार्याचीही ओळख करुन देण्यात आली. प्रवरा कन्या विद्यामंदिर प्राथमिक आणि माध्यमिक मिळून १७८० विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणीचा फुटबॉल संघ राज्य पातळीवर…

सोलापूर येथे झालेल्या विभागीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिर,लोणीच्या संघाने सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल १७ वर्षी वयोगटांत सेमी फायनल मध्ये सोलापूर ग्रामीण संघाचा ७-० ने पराभव केला तर अंतिम फेरीत पुणे पीसीएमसी संघाचा १-०ने पराभव करून विभागीय स्पर्धेत यश मिळविले.

प्रवरेच्या इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर ॲण्ड डेअरी सायन्सेसच्या चार विद्यार्थ्याची निवड…

लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर ॲण्ड डेअरी सायन्सेस लोणी, महाद्यालयातील डेअरी डिप्लोमाच्या ४ विद्यार्थ्यांची प्रिमियम सिरम्स ॲण्ड व्हॅक्सिन्स प्रा.लि.नारायणगाव,पुणे कंपनी या कंपनीमध्ये निवड झाली आहे.
आज पशुसंवर्धन विभागामध्ये मोठी करीअर संधी उपलब्ध होत आहे.संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल, पशुसंवर्धन मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था आणि महाविद्यालय पातळीवर विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम सुरु आहेत.विविध जनजागृती कार्यक्रम,माजी विद्यार्थी संघटना यामुळे ग्रामीण मुलांना मोठी संधी मिळत आहे. प्रिमियम सिरम्स ॲण्ड व्हॅक्सिन्स प्रा.ली.नारायणगांव ,पुणे कंपनीमध्ये शुभम हळनोर, प्रज्वल देशमुख, अजय निर्मळ, ऋषिकेश पुणेकर यांची निवड झाली आहे.

प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या ११ विद्यार्थिनींना भारत सरकारची संस्कृत शिष्यवृत्ती…

भारत सरकारच्या संस्कृत संवर्धन योजनेअंतर्गत केंद्रीय संस्कृत विश्व विद्यालयाकडून लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या ११ विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्या भारती कुमकर यांनी दिली.
संस्कृत भाषा आणि शिक्षणाच्या सर्वांगीण संवर्धन आणि विकासासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाची नोडल एजन्सी म्हणून केंद्रीय संस्कृत विद्यापीठामार्फत बहुविध केंद्रीय योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या एकूण ११ विद्यार्थिनींना प्रत्येकी रु. ५००० एवढी गुणवत्ता शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना संगणक विभाग प्रमुख प्रा. गिरीश सोनार यांनी सांगितले की संस्कृतला ज्ञान प्रणाली  म्हणून ओळखले जाते. संस्कृतमध्ये गणित, तत्त्वज्ञान, व्याकरण, संगीत, राजकारण, वैद्यकशास्त्र, वास्तुशास्त्र, धातूशास्त्र, नाटक, कविता, कथाकथन यांचा मोठा खजिना आहे. म्हणून संशोधनाच्या माध्यमातून संस्कृत शिक्षणात गुणात्मक बदल घडवून आणणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. ही शिष्यवृत्ती प्राप्त होण्यासाठी संस्कृत शिक्षिका निशाली शेजूळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रवरा अभियांत्रिकीचे क्रीडा संचालक डॉ श्रीनिवास मोतीयेळे यांच्यासह विद्यार्थ्याची राज्य एक्वाथोलोन स्पर्धेमध्ये रौप्य पदक

डोंबिवली ठाणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटनेतर्फे आयोजित राज्य एक्वाथोलोन  स्पर्धेमध्ये मास्टर गटामध्ये ( २०० मीटर स्विमिंग आणि दोन किलोमीटर धावणे ) प्रवरा अभियांत्रिकीचे क्रीडा संचालक डॉ श्रीनिवास मोतीयेळे यांनी २०० मीटर स्विमिंग आणि दोन किलोमीटर धावणे हे अंतर २३ मिनिट सहा सेकंदात यशस्वीरित्या पूर्ण करून रोप्य पदक पटकावले त्याचबरोबर अभिमानाची बाब म्हणजे प्रवरा अभियांत्रिकीच्या प्रतीक चिंचाने याने ओपन कॅटेगिरी मध्ये ७५० मीटर स्विमिंग आणि पाच किलोमीटर धावणे हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण करून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामधील ओपन कॅटेगिरीच्या खेळाडूंमध्ये नववे स्थान पटकावले  त्यासोबतच प्रवरा अभियांत्रिकीच्या प्रथमेश जाधव, जतिन लाल तसेच प्रवरा तंत्रनिकेतनच्या निसर्ग गुगले यांनी ओपन कॅटेगिरी मध्ये ७५० मीटर स्विमिंग आणि पाच किलोमीटर धावणे हे अंतर यशस्वीरित्या  पूर्ण करून  पहिल्या १५ खेळाडूंमध्ये आपले स्थान पटकावले.
खेळाडूंना प्रवरा अभियांत्रिकीचे क्रीडा संचालक डॉ श्रीनिवास मोतीयेळे,संस्थेचे क्रीडा संचालक डॉ प्रमोद विखे पाटील, जलतरण प्रशिक्षक अकील शेख यांचे मार्गदर्शन लाभले
या यश प्राप्त केलेल्या खेळाडूंचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल ना.  राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा  सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीचे सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. शिवानंद हिरेमठ , संस्थेचे अतांञिकचे संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालक प्रा. लीलावती सरोदे, सहशिक्षण अधिकारी प्रा. नंदकुमार दळे,संस्थेचे क्रीडा संचालक डॉ प्रमोद विखे पाटील, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय गुल्हाने, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय राठी,महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे सदस्य तसेच ट्रायथलॉन आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी पंच श्री.अभय देशमुख, आदींनी अभिनंदन केले आहे

संगमनेर प्रांत आणि प्रवरेच्या आश्वी महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार ‘उन्नतीसाठी युवक हाच दुवा

महसूलच्या योजना लोकपर्यत पोहचविण्यासाठी विद्यार्थी देणार योगदान. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन महसूल विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले होते या सप्ताहाचे औचित्य साधून ‘उन्नतीसाठी युवक हाच दुवा’ या अंतर्गत लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वणिज्य, विज्ञान व संगणक महाविद्यालय, आश्वी खुर्द आणि प्रांत अधिकारी संगमनेर यांच्यात नुकताच जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे सामजस्य करार करण्यात आला. या प्रसंगी अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री. सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. सुहास मापारी, संगमनेर विभागाचे प्रांतअधिकारी श्री. शैलेश हिंगे आदि मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या वतीने प्रा. देविदास दाभाडे समन्वयक म्हणून उपस्थित होते कला, वणिज्य, विज्ञान व संगणक महाविद्यालय हे २००१ पासून महाराष्ट्रातील एक नामांकित व शैक्षणिक नेतृत्व करणारे महाविद्यालय आहे उत्कृष्टतेचा व समाजविकासाचा ध्यास तसेच समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहचविणे हे ध्येय मानुन महाविद्यालय प्रारंभापासूनच काम करत आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास महाविद्यालय सतत प्राध्यान्य देत आले आहे. विद्यार्थ्यांबरोबरच परिसरातील सर्वसामान्य व्यक्तींच्या विकासास हातभार लागतील असे उपक्रम महाविद्यालय वेळोवेळी घेत आलेले आहे. महाविद्यालय व्यवस्थापन, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नातून महाविद्यालयाचा लौकिक वाढत गेलेला आहे. विद्यार्थ्यांची कठोर मेहनत घेण्याची तयारी आणि जागरुक पालकांचा खंबीर पाठिबा ही यास कारणीभूत आहे.
सध्या महाविद्यालयातून सुमारे ७०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्पर्धा परीक्षा विभागामार्फत सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात भर पडत असून प्रशासकीय सेवेतील अधिकारी घडवण्याचे काम महाविद्यालय करत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी प्रशासन नेहमीच पुढाकार घेऊन लोकांच्या समस्या दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करत आहे. कृषी व्यवस्थापन, महिला आरोग्य, व्यसनमुक्ती, हुंडा बंदी, एडस् जणजागृती, ई पेमेंट, आरोग्य सर्वेक्षण आदि याबाबत लोकामध्ये जाऊन जनजागृतीच्या माध्यमाने समाजाला भेडसावणा-या अडचणी दूर करुन एक सशक्त समाज उभा करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.
या सामंजस्य करारानुसार महसूल विभागाच्या योजना विद्यार्थ्यामार्फत लोकांपर्यंत पोहचविणे. शासनाच्या वेळावेळी येणा-या लोककल्याणकारी योजनांबाबत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे यामध्ये पिक पाहणी, ई हक्क प्रणाली, ई चावडी सलोखा योजना लक्ष्मी मुक्ती योजना सारखे उपक्रम तसेच लोक कल्याणकारी योजनांच्या प्रसार, प्रचार, प्रबोधन व अंमलबजावणी करणे. मतदार नोंदणी करणे गरजू व्यक्तींना विविध शासकीय दाखले प्रदान करून देणे. ही कामे विद्यार्थ्यांच्या मदतीने केली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व दोन क्रेडीट देण्यात येणार आहे.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री श्री. आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांञिकचे संचालक डॉ. प्रदीप दिघे यांनी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. राम पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे यांना शुभेच्छा देऊन महाविद्यालयीन उपक्रमाचे कौतुक