महात्मा ज्योतिबा फुलेंच्या १२९ व्या पुण्यतिथी निमित्त प्रवरा परिवाराकडून विनम्र अभिवादन.

महात्मा ज्योतिराव फुले हे १९ व्या शतकातील एक महान विचारवंत आणि एक क्रांतिकारी समाजसुधारक होते. – भारत घोगरे.

बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून तत्कालीन सामाजिक परिस्थिती मध्ये सुधारणा व्हावी यासाठी सर्वप्रथम ‘विद्येविना मती गेली’ या महाराष्ट्रात खळबळ ओळींद्वारे समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी अस्पृश्य मुलांसाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठची मुहूर्तमेढ रोवली म्हणूनच ज्योतिराव  फुले हे १९ व्या शतकातील एक महान विचारवंत आणि एक  क्रांतिकारी समाजसुधारक होते असे प्रतिपादन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव भारत घोगरे यांनी केले.

महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या या थोर महापुरूषाला लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित)  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये प्रवरा परिवाराकडून विनम्र अभिवादन करताना श्री भारत घोगरे बोलत होते. या प्रसंगी शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे, डॉ.प्रिया राव,एकनाथ सरोदे, बापूसाहेब अनाप,विलास वाणी,शामराव गायकवाड, आत्माराम मुठे,योगेश शेफाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

महात्मा फुले यांनी १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत १८५२ मध्ये एक शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. ज्योतिरावांनी पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.असे ते म्हणाले.

माजी विद्यीर्थी तब्बल १९ व्या वर्षानी एकत्र.

आपण मोठं व्हा पण ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेला विसरु नका.आपल्या प्रगतीत शाळेचा वाटा मोठा आहे म्हणून एकञ या.. बोला बसा..आणि एकोपा कायम ठेवा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
      

राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील माजी विद्यीर्थी तब्बल १९ व्या वर्षानी एकञ येत महात्मा फुले विद्यालय दाढ बुद्रुक शाळेतील आठवणीला माजी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला.यावेळी सौ.विखे पाटील या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.कार्यक्रम यशस्वीतेसाठी असलम शेख,कपील तांबे,पवन तांबे,एकनाथ नाईवाडी,गणेश पवार,मनिषा तांबे,सुनंदा तळोले,संदीप माकोणे,दत्तू थेटे आदी विशेष परिश्रम घेतले.
       

आपल्या मार्गदर्शन करतांना सौ.विखे पाटील म्हणल्या आज प्रवरेत होणारे माजी विद्यार्थी मेळावे दिशादर्शक आहेत यांतून विचारांचे मंथन होते.गावसाठी..शाळेसाठी मद्दत होते.आपण किती मोठे झालो तरी आपली शाळा आपण कायम स्मरणात ठेवावी कारण शालेतून मिळालेले संस्कार यामुळे आपण आज समाजात उभे आहोत असे एकञ या असा संदेश दिला.

फोटो कॅप्शन :- दाढ बुद्रुक येथील १९ वर्षानी एकञ येत महात्मा फुले विद्यालय शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी शालेय आठवणीला  उजाळा दिला.यावेळी प्रमुख पाहुण्या  ना. सौ.शालीनीताई विखे पाटील समवेत  असलम शेख,कपील तांबे,पवन तांबे,एकनाथ नाईवाडी,गणेश पवार,मनिषा तांबे,सुनंदा तळोले,संदीप माकोणे,दत्तू थेटे आदी.

प्रवरेच्या कृषी महाविद्यालयात संविधान दिवस साजरा.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालत नुकताच भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती प्राचार्य रोहित उंबरकर यांनी दिली.

या वेळी महाविद्यालयातील विविध मान्यवरांनी भारतीय संविधाना विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मौजे चंद्रापुर येथे प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रा. रमेश जाधव,, प्रा.वाल्मिक जंजाळ, डॉ. गोविंद  शिऊरकर, प्रा. प्रियांका दिघे,प्रा.विशाखा देवकर आदि सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा संदीप पठारे यांनी केले.

फोटो कॅप्शन:-लोणी येथील कृषी महाविद्यालत नुकताच भारतीय संविधान दिवस दिवसानिमित्त  मौजे चंद्रापुर येथे प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.याप्रसंगी  प्राचार्य रोहित उंबरकर, प्रा. रमेश जाधव,, प्रा.वाल्मिक जंजाळ, डॉ. गोविंद  शिऊरकर, प्रा. प्रियांका दिघे,प्रा.विशाखा देवकर आणि विद्यार्थी

प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञाना बाबत युवकांना प्रशिक्षण.

पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि  कौशल्य विकास अभियान व सिमेसीस लर्निंग एलएलएलपी अंतर्गत कृषिक्षेत्रात व्यावसाईक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक युवतींना मोफत रोजगारक्षम वयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण मिळावे या अनुषंगाने लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये  सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञ या पहिल्या ४० विद्यार्थ्यांच्या वर्गाचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु झाला.असल्याची माहिती संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी दिली.

या  प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सह-सचिव श्री. भारत घोगरे,  कौशल्य झोनल म. फु. कृ. वि. राहुरी समन्वयक श्री. दिलीप क्षीरसागर, संस्थेचे कौशल्य विकास संचालक प्रा. धनंजय आहेर, प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे व महाविद्यालय कौशल्य योजना समन्वयक प्रा. स्वप्नील नलगे आदी मान्यवर उपस्थितीत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञ या विषयातील संधी व व्यवसायासाठी प्रशिक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच हे प्रशिक्षण हे निशुल्क असून, पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, भारत सरकार यांचे द्वारे प्रमाणपत्र देण्यात येणार असून रोजगार व नोकरी मिळण्यापर्यंत मदत केली जाणार असल्याने जास्तीत जास्त युवकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन श्री. दिलीप क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक  सूक्ष्म सिंचन  प्रशिक्षक श्री. शुभम गायकवाड तसेच आभार  केंद्र समन्वयक श्री. संदीप समासे यांनी मानले.

फुटी कॅप्शन ;- लोणी येथील  कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञ या पहिल्या ४० विद्यार्थ्यांच्या वर्गाचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करतानाकृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, सह-सचिव श्री. भारत घोगरे, म. फु. कृ. वि. राहुरी समन्वयक श्री. दिलीप क्षीरसागर,  प्रा. धनंजय आहेर, प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे  प्रा. स्वप्नील नलगे आदी.

प्रवरेच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालायातील तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातील नामांकित अशा विविधकृषी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहितीकृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी दिली.

महाराष्ट्र कृषी शिक्षण, संशोधन परिषद, पुणे यांच्या द्वारे कृषीतील पदव्युत्तर शिक्षणासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले असून त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आदी विद्यापीठामध्ये  प्रवेश मिळालेला आहे. या मध्ये अनिल भिटे , विनीत कोल्हे  व कु. दिशा चव्हाण  आदींचा समावेश होतो व त्यांना अनुक्रमे कृषी सूक्ष्मजीवशास्त्र, कृषीव्यवसाय व्यवस्थापन , काढणी पच्शात तंत्रज्ञान या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षणाची संधी मिळणार आहे. या यशाबद्दल संथेचेअध्यक्ष श्री.राधाकृष्ण विखे पाटील, जि. प. अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील,माजी मंत्री श्री. आण्णासाहेब म्हस्के पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील , संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत  थोरात , सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील , कृषि संचालक डॉ.मधुकर खेतमाळस आदींनी अभिनंदन केले.

लोणी येथील कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयातील वर्षातील कु. भाग्यश्री कोल्हे या विदयार्थिनीची इंद्रधनुष्य युवक महोत्सव स्पर्ध्येसाठी निवड.

लोणी येथील कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयातील  वर्षातील कु. भाग्यश्री कोल्हे या विदयार्थिनीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे झालेल्या नृत्य ,गायन, स्किट स्पर्ध्ये मध्ये नेत्रदीपक प्रगती केल्याने तिची आता  गोंडवाना विद्यापीठामध्ये होणाऱ्या इंद्रधनुष्य या युवक महोत्सव  स्पर्ध्येसाठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य रोहित उंबरकर यांनी दिली.

गडचिरोली येथील  गोंडवाना विद्यापीठामध्ये २ते ५ डिसेंबर२०१९ या कालावधीमध्ये  होणाऱ्या इंद्रधनुष्य स्पर्ध्येसाठी कु. भाग्यश्री कोल्हे या विदयार्थिनीची निवड झाल्याने संस्थेचे अध्यक्ष आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील , खासदार डॉ. सुजय  विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषद अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, डॉ. राजेंद्र विखे पाटील,संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत  थोरात, सहसचिव भारत घोगरे,डॉ. हरिभाऊ आहेर. प्रा. दिगंबर खर्डे , कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,आणि प्राध्यापकांनी अभिमानदंन केले.

प्रवरेच्या कृषी महाविद्यालयामध्ये पदवी घेतलेला योगेश फडतरे या विद्यार्थ्यांची राजपत्रीत अधिकारी पदी निवड.

लोणी येथील कृषी महाविद्यालायातुन २०१६-१७ मध्ये कृषी  पदवीचे शिक्षण घेतलेल्या  योगेश फडतरे या माजी विद्यार्थ्यांची  महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या  महाराष्ट्र कृषी सेवा स्पर्धा परीक्षा – २०१८ या परीक्षेत कृषी मंडळ अधिकारी (राजपत्रीत गट २) या पदावरती निवड झाल्याची माहिती महाविद्यालाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी दिली आहे.

योगेश  फडतरे हा कृषी महाविद्यालयातून सन २०१६-१७ मध्ये मध्ये उत्तीर्ण झालेला आहे. त्यानंतर त्याने कृषी कीटक शास्त्र या विषयातून कृषी महाविद्यालय, पुणे येथून कृषीपदवीत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्याला आता कृषी मंडळ अधिकारी (राजपत्रीत गट २) या पदावरती काम करण्याची संधी मिळणार आहे.

त्याच्या या यशाबद्दल  संस्थेचे अध्यक्ष श्री.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री  आण्णासाहेब म्हस्के पाटील , खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, सहसचिव भारत घोगरे, तांत्रिक शिक्षण व आस्थापना संचालक डॉ. दिगंबर खर्डे, अतांत्रिक शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर व प्रा.  विजय आहेर, कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे , कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित उंबरकर व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

इंदिरा गांधी यांची जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयांमधून प्रतिमापूजनासह विविध उपक्रम साजरे करण्यात आले. या वेळी इंदिरा गांधी यांच्या कार्याचे स्मरण करून  त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.मध्यवर्ती कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी नाबार्डचे माजी अध्यक्ष आणि संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, सचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे, एकनाथ सरोदे, बापूसाहेब अनाप,विलास वाणी,शामराव गायकवाड, दिपक विखे आत्माराम मुठे  आदी मान्यवर उपस्थित होते.

तर अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने,तंत्रनिकेतन चे प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी,फार्मसी संलग्नित महाविद्यालयामध्ये प्राचार्या डॉ. प्रिया राव,प्राचार्य डॉ. शिवानंद हिरेमठ,प्राचार्य  डी. बी. थोरात,कृषी संलग्नित महाविद्यालयामध्ये कृषी संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश दळे, कृषी व्यवसाय व व्यवस्थापन  महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित उंबरकर,कृषी तंत्रनिकेतनच्या प्राचार्या अरुण थोरात,विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे,उपप्राचार्य डॉ. अण्णासाहेव तांबे,आर्किटेचरल महाविद्यालयाच्या प्राचार्या राजेश्वरी जगताप, प्रवरा पब्लिक स्कूलचे संचालक कर्नल डॉ. के जगनाथन ,प्राचार्य सयाराम शेळके,प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचे प्राचार्य  सुशील शिंदे, प्रवरा कन्या संकुलाच्या संचालिका सौ. लीलावती सरोदे, गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कुलच्या प्राचार्या सौ. संगिता देवकर, प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या प्राचार्या सौ. कुमकर, सैनिकी स्कुलचे संचाल कर्नल भरतकुमार, प्राचार्य सुधीर मोरे, गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. शशिकांत कुचेकर, औदयोगिक प्रशिक्षण संस्थचे प्राचार्य आर्जुन आहेर, प्रवरा सायन्स अकादमीचे संचालक प्रा. शहाजी साखरे,प्लेसमेंट अँड स्किल डेव्हलपमेंट विभागाचे संचालक प्रा.धनंजय आहेर तसेच  विविध शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध उपक्रम साजरे करण्यात आले.

फोटो कॅप्शन :- भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची जयंती निमित्त लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये इंदिराजींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करताना संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, सचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे, एकनाथ सरोदे, बापूसाहेब अनाप,विलास वाणी,शामराव गायकवाड, दिपक विखे  आदी.

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांची निवड .निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीप टॉकच्या माध्यमातून मार्गदर्शन.

दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात इंटर्नशीप करण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या इंटर्नशाला  या संस्थेच्या वतीने  लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील ११  विद्यार्थ्यांची इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर १५ या कार्यक्रमासाठी निवड झाली असून मागील वर्षी या कार्यक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी इंटर्नशीप टॉकच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. असल्याची माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली.

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालया मध्ये नेहमीच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळण्यासाठी  नवनवीन क्षेत्रात प्रशिक्षणाची ओळख करून दिली जाते त्याच दृष्टिकोनातून  महाविद्यालयात इंटर्नशाला इंटर्नशीप टॉक चे आयोजन करण्यात आले होते.इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर रघुनंदन चौधरी ,सायली  ढेरंगे,ऋचा खैरनार ,ऋतुजा भालेराव यांनी अतिशय सुलभपणे इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर १५ या कार्यक्रमासाठी निवड झालेल्या सचिन वाघ,स्नेहा हराळ,श्रद्धा शेळके,स्नेहल सहाने,जुई वाघ,मयुरी वालझडे व प्रीती ताकवणे अशा एकूण अकरा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.   या कार्यक्रमासाठी कृषी व संलग्नित महाविद्यालयांचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, प्रा.भाऊसाहेब घोरपडे,प्रा.प्रविण गायकर,प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वप्निल नलगे,डॉ.विशाल केदारी, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रमसिंह पासले याने केले.

इंटर्नशाला ही संस्था दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात इंटर्नशीप करण्याची संधी उपलब्ध करून देते.यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करून पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होते.ब-याच विद्यार्थ्यांना अंगी असलेल्या कौशल्यांचा योग्य ठिकाणी वापर करून महाविद्यालयात शिकत असतानाच अनुभव व अर्थार्जन करता येते. इंटर्नशीप टॉक कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांचे  आभार आदित्य जोंधळे याने मानले.

फोटो कॅप्शन :- विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात इंटर्नशीप करण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या इंटर्नशाला  या संस्थेच्या वतीने  लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील  इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर १५ या कार्यक्रमासाठी निवड झालेले विद्यार्थी.

लोकमान्य टिळक यांच्या जन्मगावी शिबिरासाठी विद्यार्थ्यांची निवड

रत्नागिरीतील चिखलगांव या लोकमान्य टिळक यांच्या  जन्मगावी राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर या दांपत्याने रुजविलेल्या लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट (लोकसाधना) आणि टिम तरुणाईच्या  वतीने २५ डिसेंबर २०१९ ते ०३ जानेवारी २०२० या कालावधीमध्ये आयोजित केलेल्या ‘लोकनिर्माण युवा शिबिरा’ साठी लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची निवड झाली  असल्याची माहिती  रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी दिली.

युवकांच्या मनात ग्रामविकासाची ओढ़ निर्माण करण्यासाठी, त्यांच्यातील राजकीय, सामजिक, आर्थिक, सांस्कृतिक बदलाला चालना देण्यासाठी आणि निसर्गाचा एक वेगळा अनुभव घेण्यासाठी लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यास, चिखलगाव (लोकसाधना) यांच्या वतीने प्रत्येक वर्षी समाजातील वेगळा विचार करणाऱ्या युवा पिढीला एकत्र आणून एक समृध्द, संपन्न समाजासोबतच भारताचे भविष्य निर्माण करण्यासाठी एकत्र करून एक आगळे वेगळे शिबिर जाते.पहिल्या टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रातून यासाठी अर्ज मागवले जातात व दुसऱ्या टप्प्यात फोनवरून मुलाखत घेवून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या ४३० अर्जांपैकी १५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.या मध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतीम वर्षातील विद्यार्थीनी कु.प्रतिक्षा अभंग तर तृतीय वर्षातील विद्यार्थी विक्रमसिंह पासले, रघुनंदन चौधरी, कु.धनश्री टेके, कु.राणी माने, कु.प्रिया गवळी, कु.ऋतुजा भालेराव व कु.रुपाली धूम अशा आठ विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दहा दिवस चालणाऱ्या  या शिबिरामध्ये विद्यार्थांना गेल्या ३८ वर्षापासून ग्रामविकास व कौशल्य आधारित शिक्षणासाठी काम करणारे समाजसेवक डॉ.राजा व रेणू दांडेकर यांच्यासोबत १० दिवस, श्रमदान, कोकण परिचय, कोकणातील कौशल्य विकासाची चळवळ,निसर्गभान, समाजातील हिरो, स्वपरिचय, समुद्रसफर, जंगलफेरी,गटचर्चा,कलाविष्कार,शेकोटी व नववर्षाचे संकल्प आदी गोष्टी अनुभवायला मिळणार आहेत.या सर्व विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, सहसचिव भारत घोगरे, तांत्रिक शिक्षण व आस्थापना संचालक डॉ. दिगंबर खर्डे, अतांत्रिक शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर व डॉ. विजय आहेर, कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषिकेश औताडे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

प्रवरेच्या कृषी महाविद्यालयातील डेसी कोर्सच्या प्रशिक्षकांची डोंगरगण गावाच्या पाणलोट क्षेत्रास भेट

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालय व राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था, हैद्राबाद यांच्या सयुंक्त विद्यमाने लोणी येथे सुरु असलेल्या कृषी निविष्टा विक्रेत्यांकारीता कृषी पदविका (डेसी) या अभ्यासक्रमा अंतर्गत   नुकतीच मौजे डोंगरगण ता. नगर येथे प्रक्षेत्र भेट गावातील विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली असल्याची माहिती प्रा.निलेश दळे  दिली.

कृषी निविष्टा विक्रेत्यांकारीता आयोजित या भेटीचा मूळ उद्देश म्हणजे डोंगरगण गावात लोकसहभागातून पाणलोट क्षेत्रात झालेला बदल अभ्यासाने हा होता. या भेटीदरम्यान  डोंगरगण गावाचे सरपंच श्री कैलाश पठारे यांनी कृषी निविष्टा विक्रेत्यांना लोकसहभागातून गावामध्ये कशाप्रकारे विविध कामे करता येतात या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.या वेळीकृषी निविष्टा विक्रेत्यांनि गावातील विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली.

सदर प्रक्षेत्र भेटीचे आयोजन संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था, हैद्राबाद डेसी कोर्से समन्वयक श्री. महेश माने , कोर्सचे  समन्वयक प्रा. रमेश जाधवयांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

फोटो कॅप्शन :-  लोणी येथील कृषी महाविद्यालय व राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था, हैद्राबाद यांच्या सयुंक्त विद्यमाने लोणी येथे सुरु असलेल्या कृषी निविष्टा विक्रेत्यांकारीता कृषी पदविका (डेसी) या अभ्यासक्रमा अंतर्गत   नुकतीच मौजे डोंगरगण ता. नगर येथे प्रक्षेत्र भेट गावातील विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांना भेटी देऊन माहिती जाणून घेताना कृषी निविष्ठा विक्रेते आणि  शेतकरी

बालदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ आणि शालेय वस्तूचे वाटप

भारताचे पाहिले पंतप्रधान  पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या  जयंतीनिमित्त लोणी  येथील  कृषी जैतंत्रज्ञान महाविद्यालायाच्या, राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत महाविद्यालयात आणि चंद्रापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे  मध्ये  सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ आणि शालेय वस्तूचे वाटप करून बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती  प्राचार्य  ऋषिकेश औताडे  यांनी दिली.

कृषी जैतंत्रज्ञान महाविद्यालायाच्या, राष्ट्रीय सेवा योजने चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या  प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर बालदिनाचे औचित्यसाधून प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चंद्रापूर ता- राहाता येथे बालदिन साजरा केला आहे. त्याप्रसंगी मुख्याध्यापक  श्री.सत्यवान मेहरे यांच्या उपस्थितीत जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शालेय साहित्य  आणि खाऊचे वाटप करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांचे आयोजन विद्यार्थ्यांनी मुलांसोबत आनंद साजरा केला. प्रसंगी विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाचे प्रा. अमोल सावंत, प्रा.महेश चन्द्रे, प्रा.स्वप्नील नलगे, प्रा.स्वरांजली गाढे, प्रा.मनीषा आदिक, जि.प.प्राथमिक शाळा चंद्रापूर येथील मुख्याध्यापक श्री.सत्यवान मेहरे, श्री.अनिल घोलप , श्री.बालाजी भोसले , श्रीमती. कहार , श्रीमती. भोसले , श्रीमती. मन्सुरी , श्री.अब्दुल जावेद  आणि इतर शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थतीत होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रासयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण गायकर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले तसेच रासेयो चे सर्व स्वयंसेवक आणि प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वयंसेविका कु.प्रांजल साळुंके, सूत्र संचालन कु. भाग्यश्री नेहाकर आणि कु. रुचिका चौधरी, यांनी केले तर स्वयंसेविका  कु. निकिता जाधव हिने गीत गाऊन उपस्थतीतांची मने जिंकली.

फोटो  कॅप्शन:- लोणी येथील कृषी जैतंत्रज्ञान महाविद्यालायाच्या, राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत महाविद्यालयात आणि चंद्रापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे  मध्ये भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या  जयंतीनिमित्त बालदिन मान्यवर आणि विदयार्थी