प्रवरेच्या कृषी महाविद्यालयामध्ये पदवी घेतलेला योगेश फडतरे या विद्यार्थ्यांची राजपत्रीत अधिकारी पदी निवड.

लोणी येथील कृषी महाविद्यालायातुन २०१६-१७ मध्ये कृषी  पदवीचे शिक्षण घेतलेल्या  योगेश फडतरे या माजी विद्यार्थ्यांची  महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या  महाराष्ट्र कृषी सेवा स्पर्धा परीक्षा – २०१८ या परीक्षेत कृषी मंडळ अधिकारी (राजपत्रीत गट २) या पदावरती निवड झाल्याची माहिती महाविद्यालाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी दिली आहे.

योगेश  फडतरे हा कृषी महाविद्यालयातून सन २०१६-१७ मध्ये मध्ये उत्तीर्ण झालेला आहे. त्यानंतर त्याने कृषी कीटक शास्त्र या विषयातून कृषी महाविद्यालय, पुणे येथून कृषीपदवीत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्याला आता कृषी मंडळ अधिकारी (राजपत्रीत गट २) या पदावरती काम करण्याची संधी मिळणार आहे.

त्याच्या या यशाबद्दल  संस्थेचे अध्यक्ष श्री.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री  आण्णासाहेब म्हस्के पाटील , खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, सहसचिव भारत घोगरे, तांत्रिक शिक्षण व आस्थापना संचालक डॉ. दिगंबर खर्डे, अतांत्रिक शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर व प्रा.  विजय आहेर, कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे , कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित उंबरकर व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.