पंडित जवाहरलाल नेहरू जयंती

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येणारा बालदिवस मुलांविषयी वाटणार्‍या प्रेम व जिव्हाळ्याविषयी आदर व्यक्त करण्याचा उत्तम  मार्ग असून, देशाची भावी पिढी सुशिक्षित आणि मनाने व शरीराने आरोग्यसंपन्न होण्यासाठी बालदिनासारखे उपक्रम नेहमीच साजरे व्हावेत असी अपेक्षा ब्रिलियंन बर्ड स्कुलच्या संचालिका सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी व्यक्त केली.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानीत)  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या  जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादनकार्यक्रम  प्रसंगी सौ. धनश्रीताई विखे पाटील बोलत होत्या. या प्रसंगी संस्थेचे सचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे,प्रा. विजय आहेर, एकनाथ सरोदे,बापूसाहेब अनाप,विलास वाणी,शामराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

सौ. धनश्रीताई विखे म्हणाल्याकी,  देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता संघर्ष करणा.या प्रमुख महापुरूषांमधे पंडित जवाहरलाल नेहरू हे एक महत्वाचे नेते होते. ज्यांना आपण  चाचा नेहरू  या नावांनी देखील ओळखतो. स्वतंत्र भारतामध्ये भावी नागरिक होणाऱ्या बालकांनाही आपल्या आयुष्याचा आनंद घेण्याचा आणि मौजमस्ती करण्याचा हक्क आहे आणि या मुलांमधूनच देशाचे भावी  नागरिक तयार होणार आहेत. म्हणूनच बालकांविषयी पंडित नेहरूंना वाटणार्‍या प्रेमाची आठवण म्हणून १४ नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस आपल्या देशात बालदिनाच्या रूपाने साजरा केला जातो असे त्या म्हणाल्या.

फोटो कॅप्शन: माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याजयंती निमित्त अभीवादन करताना  ब्रिलियंन बर्ड स्कुलच्या संचालिका सौ. धनश्रीताई विखे पाटील, संस्थेचे सचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे,प्रा. विजय आहेर, एकनाथ सरोदे,बापूसाहेब अनाप,विलास वाणी,शामराव गायकवाड आदी

पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील कु. रसिका नितीन साळी सेट परीक्षा उत्तीर्ण.

लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स विषयातील कु. रसिका नितीन साळी या विद्यार्थिनीने जून २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र्र शासनाच्या सेट पसरिक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये भरघोस गुणांनी उत्तीर्ण झाली असून एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स वार्षिक   परीक्षेमध्येही मुलींमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान तीला  मिळाला आहे.

कु. रसिका साळी ही सध्या पुणे विद्यापीठाचे मध्ये पी.एच डी.  करीत असून सध्या तिला इस्र्रो च्या एका प्रकपमध्ये संशोधन करण्याची संधी मिळाली आहे. या पूर्वी तिला  इलेक्ट्रॉनिक्स विषयातील प्रोजेकट मध्ये आंतरराष्ट्रीय ,पुणे विद्यापीठाचा अविष्कार आणि  महाविद्यालयीन स्तरावरील विविध प्राप्त झालेले आहेत. विखे पाटील महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. नितीन साळी यांची  कु. रसिका हि कन्या आहे.

कु. रसिका साळी हिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील , खासदार डॉ. सुजय  विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषद अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, डॉ. राजेंद्र विखे पाटील,लोणीच्या सरपंच सौ. मनीषाताई आहेर,संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत  थोरात, सहसचिव भारत घोगरे,डॉ. हरिभाऊ आहेर. प्रा. दिगंबर खर्डे , प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे  आणि इतर प्राध्यापकांनी अभिमानदंन  केले.

कृषी जैवतंत्रज्ञान महाविदयालयात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा.

लोकनेते बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत भारताचे पहिले शिक्षणमंत्री डॉ.मौलाना अब्दुल आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले. असल्याची माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली.

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, एम.व्ही.पी कृषी महाविद्यालय नाशिक येथील प्रा.एस.एस.अहिरे, के.के.वाघ कृषी महाविद्यालय येथील साहाय्यक प्रा.आर.एम.रौदाळ यांच्या उपस्थित आणि रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा.के.डी. काळे यांच्या हस्ते भारताचे पहिले शिक्षणमंत्री आणि स्वतंत्र सैनिक डॉ. मौलाना अबुल आझाद यांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी रासेयो स्वयंसेवक कु.देवयानी गोंदकर याने आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतातून कु.देवयानी गोंदकर हिने स्वयंसेवकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी  प्रा.सारिका गाढे, प्रा.मनीषा आदिक,प्रा.स्वप्नील नलगे तसेच महाविद्यालयाचे इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रासयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले तसेच रासेयो चे सर्व स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कु.रुचिका चौधरी हिने केले. तसेच महाविदयलायचे प्रा.अमोल सावंत यांनी आभार मानले.

प्रवरेच्या कृषी महाविद्यालयात कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न

कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालय तसेच सिमॅसेस लर्निंग एलएलपी संस्थेच्या पुढाकारातून कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत दुग्ध उत्पादक शेतकरी आणि उद्योजगता या अभ्यासक्रमाचे नुकतेच लोणी येथे उदघाटन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी म.फु.कृ.वि. राहुरीचे विभागीय समन्वयक डॉ. दिलीप क्षीरसागर,संस्थेचे कौशल्य विकास संचालक प्रा. धनंजय आहेर , महाविद्यालाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे, ,अभ्यासक्रम प्रशिक्षक श्री. सुशांत सांबारे, श्री. अभिषेक सापटे, प्रशिक्षण समन्वयक मालती बनसोडे,कौशल्य विकाससमन्वयक प्रा. प्राची शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषिक्षेत्रात व्यवसाईक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक युवतींना मोफत रोजगरक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयापैकी लोणी येथील कृषी महाविद्यालयाची निवड झाली त्यानुसार दुग्ध उत्पादक शेतकरी आणि उद्योजगता या अभ्यासक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

फोटो कॅप्शन :-पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना आणि  छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत लोणी येथील कृषी महाविद्यालयामध्ये  ‘दुग्ध उत्पादक शेतकरी आणि उद्योजगता’  अभ्यासक्रमाचे  उदघाटन प्रसंगी कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,म.फु.कृ.वि.चे विभागीय समन्वयक डॉ. दिलीप क्षीरसागर,प्रा. धनंजय आहेर , प्राचार्य प्रा. निलेश दळे, ,श्री. सुशांत सांबारे, श्री. अभिषेक सापटे,  मालती बनसोडे प्रा. प्राची शिंदे आदि

ग्रंथपालांनी सोशीयल मेडीयाच्या काळात ग्रंथालयाचे महत्व वाढवावे – भारती बॅनर्जी

बदलत्या काळानुसार ग्रंथ संग्रहालये हायटेक होणार होत असून  वाचकांना घरबसल्या  इंटरनेद्वारे कोणते पुस्तक उपलब्ध आहे ते समजू शकणार असल्याने ग्रंथपालांनी सोशीयल मेडीयाच्या काळात ग्रंथालयाचे महत्व वाढवावे असे प्रतिपादन सौ.भारती बॅनर्जी यांनी केले.

लोकनेते पद्मभुषन डॉ.बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ.विखे पाटील महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयात “आजच्या सोशीयल मेडीयाच्या काळात ग्रंथपालांचे कार्य व ग्रंथालयीन सेवेचे महत्व”  या विषयी सौ.भारती बॅनर्जी यांचे उद्बोधनात्मक व्याख्यान संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रा. विजय आहेर  होते.  कार्यक्रमाचे प्रास्तावीक ग्रंथपाल डॉ.बाळासाहेब आहेर यांनी केले. या वेळी ग्रंथपाल डॉ .अनिल पवार, श्री.तुरकने  यांनी ग्रंथपालांच्या समस्या मांडल्या,  श्री.बाळासाहेब कोरडे, श्री.आदिनाथ दरंदले, श्री.पोपट आव्हाड ,श्री. लक्ष्मीण पानसरे,सौ. विजया तांबे, सौ.मीरा काकडे श्री.नामदेव पांढरकर आदिसंह  संस्थेच्या विवीध शाखेतील ग्रंथपाल उपस्थीत होते उपस्थीत होते.

” आज अनेक शाळा , महाविद्यालयाच्या  ग्रंथालयातील ग्रंथ संग्रहाचा वापर पुरेशा प्रमाणात वाचक, विद्यार्थी ,शिक्षक  करतांना दिसत नाही ,वाचनाचे फायदे आपल्या सर्वांना ज्ञात असुन सुद्धा आजच्या सोशीयल मेडीयाच्या दुनीयेत ..वाचक वर्ग दुरावत चालला आहे या करीता इ-लायब्ररी चे सभासदत्व प्रत्येक ग्रंथपालांनी ,वाचकांनी व्हावे ,इ-जर्नल चे प्रमाण वाढवा ,मासीकांचा वापर ग्रंथालयात वाढवा,संगणकीकृत अद्यायावत ग्रंथालयीन सेवा वाचकांना ग्रंथपालांनी  दिल्यास निश्चितच ग्रंथालयाचे महत्व वाढेल ,अनेक ग्रंथालयाच्या अडी अडचणी असतात त्या वेळेत सोडवुन घ्या” असे प्रतिपादन सौ.भारती बॅनर्जी यांनी व्यक्त केले., शेवटी आभार ग्रंथपाल श्री उल्हास देव्हारे यांनी मानले.

कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची इंडियन इन्स्टिटयूट ऑफ प्लांटेशन मॅनॅजमेण्ट मध्ये निवड

प्रवरा शिक्षण संस्थेतील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील अंतिम वर्षातील श्रेयस वरंदल, अभिजित मोरे, कृष्णा क्षीरसागर, प्रवीण डोईफोडे या चार विद्यार्थ्यांचे इंडियन इन्स्टिटयूट ऑफ प्लांटेशन मॅनॅजमेण्ट बंगलोर येथे पदुत्तर  शिक्षणासाठी निवड झाली. असल्याची माहिती प्राचार्य रोहित उंबरकर यांनी दिली.

या इन्स्टिटयूट मध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाणारी सामाईक परीक्षा हे चारही विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. निवड झालेल्या चारही विद्यार्थ्यांचा  संस्थचे अध्यक्ष ना.  राधाकृष्ण विखे पाटील , खासदार सुजय  विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, महासंचालक डॉ. यशवंत  थोरात, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे,कृषी व कृषी संलग्न महाविद्यलयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस , या सर्वानी विद्यार्थ्यांचे अभिमानदं केले.

अशोक साहेबराव कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा कडून शिक्षणशास्त्र विषयात पी.एच. डी.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पदमभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या  प्रवरा ग्रामीण शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. अशोक साहेबराव कांबळे यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद कडून शिक्षणशास्त्र विषयात पी.एच. डी. पदवी प्रदान करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्या सौ. विदया वाजे यांनी दिली.

प्रा.  कांबळे यांनी “बुलढाणा जिल्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळामध्ये राबविण्यात आलेल्या अपंग समावेशित शिक्षण या उपक्रमाच्या यशश्वीतेचा अभ्यास” या विषयावर डॉ. कृतिका चिंचोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर केला. या बद्दल  संस्थेचे अध्यक्ष  ना.  राधाकृष्ण विखे पाटील , खासदार सुजय  विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, महासंचालक डॉ. यशवंत  थोरात, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे,डॉ. हरिभाऊ आहेर. प्रा. दिगंबर खर्डे  या सर्वानी विद्यार्थ्यांचे अभिमानदं केले.