पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील कु. रसिका नितीन साळी सेट परीक्षा उत्तीर्ण.

लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स विषयातील कु. रसिका नितीन साळी या विद्यार्थिनीने जून २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र्र शासनाच्या सेट पसरिक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये भरघोस गुणांनी उत्तीर्ण झाली असून एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स वार्षिक   परीक्षेमध्येही मुलींमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान तीला  मिळाला आहे.

कु. रसिका साळी ही सध्या पुणे विद्यापीठाचे मध्ये पी.एच डी.  करीत असून सध्या तिला इस्र्रो च्या एका प्रकपमध्ये संशोधन करण्याची संधी मिळाली आहे. या पूर्वी तिला  इलेक्ट्रॉनिक्स विषयातील प्रोजेकट मध्ये आंतरराष्ट्रीय ,पुणे विद्यापीठाचा अविष्कार आणि  महाविद्यालयीन स्तरावरील विविध प्राप्त झालेले आहेत. विखे पाटील महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. नितीन साळी यांची  कु. रसिका हि कन्या आहे.

कु. रसिका साळी हिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील , खासदार डॉ. सुजय  विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषद अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, डॉ. राजेंद्र विखे पाटील,लोणीच्या सरपंच सौ. मनीषाताई आहेर,संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत  थोरात, सहसचिव भारत घोगरे,डॉ. हरिभाऊ आहेर. प्रा. दिगंबर खर्डे , प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे  आणि इतर प्राध्यापकांनी अभिमानदंन  केले.