माजी विद्यीर्थी तब्बल १९ व्या वर्षानी एकत्र.

आपण मोठं व्हा पण ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेला विसरु नका.आपल्या प्रगतीत शाळेचा वाटा मोठा आहे म्हणून एकञ या.. बोला बसा..आणि एकोपा कायम ठेवा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
      

राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील माजी विद्यीर्थी तब्बल १९ व्या वर्षानी एकञ येत महात्मा फुले विद्यालय दाढ बुद्रुक शाळेतील आठवणीला माजी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला.यावेळी सौ.विखे पाटील या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.कार्यक्रम यशस्वीतेसाठी असलम शेख,कपील तांबे,पवन तांबे,एकनाथ नाईवाडी,गणेश पवार,मनिषा तांबे,सुनंदा तळोले,संदीप माकोणे,दत्तू थेटे आदी विशेष परिश्रम घेतले.
       

आपल्या मार्गदर्शन करतांना सौ.विखे पाटील म्हणल्या आज प्रवरेत होणारे माजी विद्यार्थी मेळावे दिशादर्शक आहेत यांतून विचारांचे मंथन होते.गावसाठी..शाळेसाठी मद्दत होते.आपण किती मोठे झालो तरी आपली शाळा आपण कायम स्मरणात ठेवावी कारण शालेतून मिळालेले संस्कार यामुळे आपण आज समाजात उभे आहोत असे एकञ या असा संदेश दिला.

फोटो कॅप्शन :- दाढ बुद्रुक येथील १९ वर्षानी एकञ येत महात्मा फुले विद्यालय शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी शालेय आठवणीला  उजाळा दिला.यावेळी प्रमुख पाहुण्या  ना. सौ.शालीनीताई विखे पाटील समवेत  असलम शेख,कपील तांबे,पवन तांबे,एकनाथ नाईवाडी,गणेश पवार,मनिषा तांबे,सुनंदा तळोले,संदीप माकोणे,दत्तू थेटे आदी.