प्रवराच्या डी फार्मसीचा मेडमार्ट फार्म कंपनी सोबत सामंजस्य करार

लोकनेते  पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म मोहु चिंचोली तालुका सिन्नर व मेडमार्ट फार्मा प्रायव्हेट लिमिटेड विरार ठाणे यांचे दरम्यान नुकताच सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. विजय तांबे यांनी दिली.           फार्मसी शिक्षणामध्ये औषध कंपन्या आणि महाविद्यालय यामध्ये विविध स्तरांवर जसे विद्यार्थी प्रशिक्षण,  इंडस्ट्रीयल  भेटी,  नवीन औषधी संशोधन, औषध विकसित करणे, विद्यार्थ्यांना नोकरी मध्ये सामावून घेणे आदी विषयांची या करारामध्ये नोंद केली जाते. प्रवरा डी फार्मसी च्या वतीने या अगोदर २२ कंपन्यांबरोबर सामंजस्य करार केले आहेत. मेडमार्ट फार्म यांच्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये विभागीय मार्केटिंग शाखा कार्यरत आहेत. मेडमार्ट फार्म कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश शेळके यावेळी म्हणाले की, आम्हाला अधिक चांगल्या प्रकारचे ज्ञान असलेले होतकरू विद्यार्थी मिळणे ही काळाची गरज बनलेली आहे. आम्ही या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे,  त्यांच्यासाठी व्याख्याने आयोजित करणे, नोकरीच्या संधी उपलब्ध करणे, एकंदरीत महाविद्यालयीन शिक्षणाची गुणवत्ता वाढ होणे याकामी मदत करणार आहे. यावेळी मेडमार्ट फार्मचे प्रतिनिधी  मार्केटिंग मॅनेजर  संदीप चकोर, ट्रेनिंग विभाग प्रमुख श्री. रवींद्र माने, आस्थापना प्रमुख. शरद गिते,  जायभाये,  अशोक शेळके,  महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. योगेश ठोंबरे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाकडून गुणवत्तावाढीसाठी नेहमी प्रयत्न केले जात आहेत. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील,  खा. डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ सहसचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक सौ.लिलावती सरोदे आदींनी अभिनंदन केले.

प्रवरा ग्रामीण औषधीनिर्माणशास्त्र महाविद्यालय व कायटेल टेकनॉलॉजि प्रा.ली. मध्ये सामंजस्य करार

लोकनेते पद्मभूषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण औषधीनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि कायटेल टेकनॉलॉजि प्रा.ली. मध्ये सामंजस्य करार झाल्याची माहिती महाविद्यालचे प्रचार्य डाॅ.संजय भवर यांनी दिली.    या सामंजस्य कराराचा फायदा ग्रामीण भागातील मुलांना व्हावा आणि त्यांना नवीन औषधे मार्केट मध्ये येण्यापूर्वी ती मनुष्य वापरासाठी कशी गुणकारी व सुरक्षित आहेत याचा अभ्यास व्हावा या साठी हा समंजस्या करार फायद्याचा ठरणार आहे. तसेच आजच्या या कोरोना कालावधी मध्ये विद्यार्थ्यांना औषधे गुणवत्ता सुधारणा बद्द्ल प्रक्षिक्षण मिळावे  या उद्देशाने हा सामंजस्य करार करत असल्याचे  कायटेल टेकनॉलॉजि प्रा.ली.चे मुख्य कार्यकारी अधिकारी  पियुष राजपूत यांनी सांगितले.  या सामंजस्य करारानुसार महाविद्यालय व कायटेल टेकनॉलॉजि प्रा.ली. या मध्ये विविध विद्यार्थी गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम होणार असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. या मध्ये प्रामुख्याने नवीन औषधांवरील संशोधन, मानवीय औषधी चाचणी,  त्यांची सुरक्षतता तपासणी प्रशिक्षण आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत . प्रवरा औषधीनिर्मानशास्त्र महाविद्यालयात असे विविध सामंजस्या करार करण्यात आले असून सध्य परिस्थिती मध्ये औषध कंपनी मध्ये चालणाऱ्या विविध नवनवीन तंत्रज्ञानाचा शिक्षक- विद्यार्थ्यांना या मार्फत मोफत मिळत आहे. महाविद्यालयातील ट्रेनिंग आणि प्लेसमेंट चे प्रमुख प्रा.सोमेश्वर मनकर यांनी हा सामंजस्य करार करण्यात विशेष परिश्रम घेतले.   महाविद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंञी आ.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,खा.डाॅ.सुजय विखे पाटील,संस्थेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,सहसचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक सौ.लिलावती सरोदे आदींनी अभिनंदन केले आहे

कॉलेज ऑफ फार्मसीचे डाॅ.विजय तांबे यांना भारत सरकार कडून पेटंट

लोकनेते पद्मभुषणबाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म मोहु चिंचोली( ता. सिन्नर) या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय तांबे यांचेकडून भारत सरकार कडे डिझाईन पेटंट नोंदणी झाली होती यांस सरकारकडून पेटंट मिळाला आहे, याविषयी अधिक माहिती देताना डॉ. तांबे यांनी सांगितले की, वेगवेगळ्या संशोधन कार्यामधील नाविन्यपूर्ण गोष्टींचा समावेश पेटंट नोंदणी करून भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयमार्फत अधिकृत केला जातो. आम्ही संशोधक सहकाऱ्यांच्या मदतीने ‘ऑटोमॅटिक मेडिसिन डोसेज अपलाईंग डिवाइस विथ कंट्रोल्ड हेल्थ मॉनिटरिंग’ यासाठी डिझाईन केलेले उपकरण पेटंट नोंदणीसाठी दिले होते त्याची अधिकृत नोंद पेटंट जनरल मध्ये झाली. महाविद्यालयाकडून संशोधन कामासाठी नेहमी सुविधा पुरविल्या जातात व इतर आवश्यक मदत दिली जाते. सदर पेटंट मिळणे ही महाविद्यालयासाठी व संस्थेसाठी गौरवाची बाब आहे. असे मत संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुश्मिता विखे यांनी व्यक्त करतांनाच डाॅ.तांबे यांचे अभिनंदन केले आहे.
डॉ. तांबे यांचे यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे शिक्षण संचालक सौ.लिलावती सरोदे यांनी अभिनंदन केले.

कोल्हारच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार मध्ये मैदानी स्पर्धा उत्साहात संपन्न

लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी  प्राध्यापक सिताराम वरखड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते  मागील दोन वर्षापासून करोना परिस्थिती मुळे विद्यार्थी खेळापासून वंचित राहिलेले होते . विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल इंटरनेट टीव्ही या सारख्या साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि त्याचा एकूण परिणाम विद्यार्थ्यांच्या शरीरावर मनावर जाणवत होता. या सर्व बाबी मधून सुटका करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मैदानावर आणणे अतिशय गरजेचे होते. या मैदानी स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी 100 मीटर ,200 मीटर धावणे ,400 मीटर धावणे 100 मीटर , 4 रिले स्पर्धा उंच उडी लांब उडी क्रीडा प्रकारामध्ये आपले नैपुण्य दाखवले . विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक वरखड म्हणाले विद्यार्थ्यांची शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती उत्तम राहण्यास मदत होते विद्यार्थ्यांच्या शरीरावर डोळ्यांवर मनांवर होणाऱ्या परिणामांपासून केवळ खेळच मुक्तता देऊ शकतो . खेळ आपणास व्यक्तिमत्त्व विकासामध्ये कष्ट करण्याची वृत्ती इत्यादी गुण निर्माण करण्यास मदत करतो . स्पर्धेची सुरुवात कोल्हार भगवतीपुर येथील भगवती मातेच्या मंदिराजवळ क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आली  . स्पर्धेचे सूत्रसंचालन तन्वी कडू आणि आणि श्रावणी थेटे यांनी केले तर पाहुण्यांची ओळख गुण राका हिने करून दिली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य  सुधीर मोरे यांनी केले .तर निशा मुथा हिने सर्वांचे आभार मानले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे क्रीडाशिक्षक कबीर शेख , ए.सी. कडू   अमोल म्हस्के , सुरेश जाटे  संदीप आहेर इत्यादी परिश्रम घेतले.

प्रवरेच्या कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून ममदापुर येथे द्राक्ष पिकांवर चर्चसत्र संपन्न

लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून ममदापुर ता राहाता येथे नुकतेच द्राक्ष पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन या विषयावरती  चर्चासत्रास उत्पादकांनी मोठा प्रतिसाद दिला अशी माहिती प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी दिली .  या चर्चासत्रास  प्रगतशील शेतकरी  सुभाष गडगे , बायर क्रॉप सायन्स चे विभागीय विक्री व्यवस्थापक  राहूल पाटील,  तंत्र अधिकारी  शुभम कडलग प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.  आपल्या मार्गदर्शनात  गडगे म्हणाले शेतकऱ्यांना  द्राक्ष पिकास आवश्यक असलेली जमीन,हवामान, पाणी ,खते व  विक्री व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले.तर राहुल पाटील यांनी द्राक्ष पिकाच्या कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.  चर्चासत्रास ममदापुर परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी श्री अनिल उंडे, दत्तात्रय म्हसे, अजय टिळेकर, संपत उंडे, एकनाथ जवरे, इरफान पटेल, अविनाश म्हसे, भाऊसाहेब गोरे आदी  हजर होते. सदर चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे , विस्तार विभाग प्रमुख प्रा. रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम वर्षातील विद्यार्थी अंकीत उंडे,ऋषिकेश पाटील, संकेत काळे, कुंजन गिरी, उदय निंबाळकर, तनोज कडू, तेजस तांबे, आकाश दिघे,ऋषिकेश चव्हाणके, गौरी भोंडे, मुग्धा सावंत,अक्षता भांगे,जान्हवी शिंदे, अमृता घोलप आदींनी प्रयत्न केले

प्रवरा शैक्षणिक संकुलात ३ हजार २२४ विद्यार्थ्याना लसीकरण

लोकनेते पद्यभुषण डॉ .बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालया अंतर्गत ३ हजार २२४ विद्यार्थ्याचे लसीकरण पूर्ण झाले आहे.   देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी १५ वर्षापुढील विद्यार्थ्यांना  कोव्हीडची लस देण्याचा निर्णय घेतला.  १ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरण देखिल सुरू झाले. माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकनेते पद्‌मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण व्हावे यासाठी स्वता: कोव्हीड पॉझिटिव्ह असतांना देखिल आरोग्य यंत्रणा, शासकीय अधिकारी, संबंधीत प्राचार्य यांच्याशी  संपर्क साधून संस्थेच्या ४२ माध्यामिक आणि कनिष्ठ महाविद्यालययपैकी २० शाळा आणि महाविद्यालयातील ३ हजार २२४ विद्यार्थ्याना लसीकरण पुर्ण झाले आहे. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालकांना आव्हान केल्याने संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांनी लसीकरण अॅपवर नोंदणी करून मोठा प्रतिसाद देखिल दिला आहे. शाळा आणि स्थानिक स्कुल कमिटीव्दारे प्रत्येक विद्यार्थ्याचे शंभर टक्के लसिकरणांचे नियोजन आहे. मागील दोन दिवसात शाळा आणि महाविद्यालये राज्य सरकारने बंद केली असली तरी प्रवरेच्या शैक्षणिक संकुलामार्फत  १५ वर्षापुढील सर्व विद्यार्थीना लस देण्याचे नियोजन संबंधीत शाळांनी केले आहे. 

प्रवरेच्या कृषि महाविद्यालया मार्फत थेट बांधावर जावून शेतक-यांना मार्गदर्शन

शेती क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणि पिक व्यवस्थापन यांची माहीती शेतकऱ्यांना व्हावी या उद्देशाने प्रवरेच्या कृषि संलग्नित महाविद्यालयामार्फत शिर्डी मतदार संघात शेतकरी-शास्त्रज्ञ संवादातून थेट बांधावर जावून  कृषी विस्ताराचा सुरू केलेला जागर  कृषी क्षेत्रातील सर्वच घटकांना मार्गदर्शक ठरत आहे.
लोकनेते पद्‌मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी अंतर्गत जैव तंञज्ञान, कृषि  व्यवसाय व्यवस्थापन, कृषि महाविद्यालय , डेअरी सायन्स आदीचे शिक्षण दिले जाते. कृषि शिक्षासोबतचं विद्यार्थी, शेतकरी आणि कृषिपुरक व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना कृषि क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान, पिक व्यवस्थापन,  लागवड तंत्र, बाजारपेठ, प्रक्रिया उद्योग, प्रक्रिया  याविषयी प्रत्यक्ष बांधावर जावून परिसंवाद, शिवारफेरी, चर्चासत्रातून माहीती देण्याचा अनोखा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कार्यक्रम नियोजन, प्रत्यक्ष बांधावर शिक्षण तर शेतक-यांना थेट बांधावर माहीती आणि विविध योजनेद्वारे शेतीमध्ये नाविन्य पुर्ण माहीती मिळत आहे. यासाठी संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक लिलावती सरोदे ,प्राचार्य ऋषिकेश औताडे, प्राचार्य निलेश दळे, प्राचार्य रोहीत उबरकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थी आणि शेती क्षेञासाठी महत्वपूर्ण ठरत आहे.