प्रवराच्या डी फार्मसीचा मेडमार्ट फार्म कंपनी सोबत सामंजस्य करार

लोकनेते  पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म मोहु चिंचोली तालुका सिन्नर व मेडमार्ट फार्मा प्रायव्हेट लिमिटेड विरार ठाणे यांचे दरम्यान नुकताच सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. विजय तांबे यांनी दिली.           फार्मसी शिक्षणामध्ये औषध कंपन्या आणि महाविद्यालय यामध्ये विविध स्तरांवर जसे विद्यार्थी प्रशिक्षण,  इंडस्ट्रीयल  भेटी,  नवीन औषधी संशोधन, औषध विकसित करणे, विद्यार्थ्यांना नोकरी मध्ये सामावून घेणे आदी विषयांची या करारामध्ये नोंद केली जाते. प्रवरा डी फार्मसी च्या वतीने या अगोदर २२ कंपन्यांबरोबर सामंजस्य करार केले आहेत. मेडमार्ट फार्म यांच्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये विभागीय मार्केटिंग शाखा कार्यरत आहेत. मेडमार्ट फार्म कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश शेळके यावेळी म्हणाले की, आम्हाला अधिक चांगल्या प्रकारचे ज्ञान असलेले होतकरू विद्यार्थी मिळणे ही काळाची गरज बनलेली आहे. आम्ही या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे,  त्यांच्यासाठी व्याख्याने आयोजित करणे, नोकरीच्या संधी उपलब्ध करणे, एकंदरीत महाविद्यालयीन शिक्षणाची गुणवत्ता वाढ होणे याकामी मदत करणार आहे. यावेळी मेडमार्ट फार्मचे प्रतिनिधी  मार्केटिंग मॅनेजर  संदीप चकोर, ट्रेनिंग विभाग प्रमुख श्री. रवींद्र माने, आस्थापना प्रमुख. शरद गिते,  जायभाये,  अशोक शेळके,  महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. योगेश ठोंबरे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाकडून गुणवत्तावाढीसाठी नेहमी प्रयत्न केले जात आहेत. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील,  खा. डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ सहसचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक सौ.लिलावती सरोदे आदींनी अभिनंदन केले.