कॉलेज ऑफ फार्मसीचे डाॅ.विजय तांबे यांना भारत सरकार कडून पेटंट

लोकनेते पद्मभुषणबाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म मोहु चिंचोली( ता. सिन्नर) या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय तांबे यांचेकडून भारत सरकार कडे डिझाईन पेटंट नोंदणी झाली होती यांस सरकारकडून पेटंट मिळाला आहे, याविषयी अधिक माहिती देताना डॉ. तांबे यांनी सांगितले की, वेगवेगळ्या संशोधन कार्यामधील नाविन्यपूर्ण गोष्टींचा समावेश पेटंट नोंदणी करून भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयमार्फत अधिकृत केला जातो. आम्ही संशोधक सहकाऱ्यांच्या मदतीने ‘ऑटोमॅटिक मेडिसिन डोसेज अपलाईंग डिवाइस विथ कंट्रोल्ड हेल्थ मॉनिटरिंग’ यासाठी डिझाईन केलेले उपकरण पेटंट नोंदणीसाठी दिले होते त्याची अधिकृत नोंद पेटंट जनरल मध्ये झाली. महाविद्यालयाकडून संशोधन कामासाठी नेहमी सुविधा पुरविल्या जातात व इतर आवश्यक मदत दिली जाते. सदर पेटंट मिळणे ही महाविद्यालयासाठी व संस्थेसाठी गौरवाची बाब आहे. असे मत संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुश्मिता विखे यांनी व्यक्त करतांनाच डाॅ.तांबे यांचे अभिनंदन केले आहे.
डॉ. तांबे यांचे यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे शिक्षण संचालक सौ.लिलावती सरोदे यांनी अभिनंदन केले.