प्रवरा सायन्स अकॅडमी’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या सात केंद्राद्वारें मराठी,इंग्रजी आणि सेमी ,इंग्रजी माध्यमाच्या एकुण ४१ शाळेतील सुमारे १ हजार ९२ विद्यार्थ्यांनी दिली प्रज्ञा शोध परीक्षा

स्पर्ध्येच्या युगात शालेय शिक्षण संपवून उच्यशिक्षणाच्या विविध संधीसाठी लागणाऱ्या पूर्व परीक्षेच्या तयारी मार्गदर्शनासाठी  प्रवरानगर येथे स्थापन  केलेल्या “प्रवरा सायन्स अकॅडमी’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विशेष नैपुण्य मिळवले असल्याची माहिती प्रवरा सायन्स अकॅडमीचे संचालक प्रा. शहाजी साखरे यांनी दिली.  मराठी,इंग्रजी आणि सेमी ,इंग्रजी माध्यमाच्या एकुण ४१ शाळेतील सुमारे १  हजार ९२ विद्यार्थ्यां सात केंद्रावर घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी बसले होते.

ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्म भुषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थ्ये मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवं-नविन संकल्पना राबविण्यात येत असतात . संस्थेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतुन आणि कल्पक मार्गदर्शनाखाली आधुनिक उपक्रम  राबवुन या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ऊत्तमोत्तम मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली जाते.

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. प्रवेश पुर्व परिक्षेत उत्तम यश संपादन केल्याशिवाय, १२ वी विज्ञान परीक्षेनंतरच्या ऊच्च शिक्षणासाठी चांगल्या दर्जाच्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळत नाही. इंजिनिअरींग, ऍग्रीकल्चर,  फार्मसी, मेडिकल,आर्किटेक्चर  ईत्यादी अभ्यासक्रमास  प्रवेश घेण्यासाठी एमएचसीसीइटी ,नीट ,आयआयटी,जेईई  सारख्या परिक्षेत चांगले यश संपादन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी  लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्म भुषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थ्ये गेल्या वर्षी पासून ” प्रवरा सायन्स अकॅडेमी”ची स्थापना केली आहे. आज या अकॅडेमी मध्ये  अकरावी  आणि बारावी विज्ञान शाखेचे एकुण ३४४ विद्यार्थी मार्गदर्शन घेत आहेत.पूर्व परिक्षेचे यश हे प्रामुख्याने  विद्यार्थ्यांच्या गणित व  विज्ञान  या विषयाच्या नैपुण्यावर  अवलंबून असते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिक्षणाच्यावेळीच गणित विज्ञान या विषयात आवड निर्माण व्हावी, यासाठी सुरवातीला प्रायोगितक तत्वावर अकॅडेमीने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या पाच शाळेतआठवी  ,नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स सुरु केला आहे.आज या अकॅडेमी मध्ये  एकुण ४२६  विद्यार्थी  फाउंडेशन कोर्स द्वारे मार्गदर्शन घेत आहेत.

प्रवरा सायन्स अकॅडमी’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये  इयत्ता आठवी मधील वैभव धारपळे,कु.स्नेहा बडे,ओंकार मेहर,प्रबोध तांबे,सार्थक निमसे,वैभव गायकर,कु.समृद्धी खांडरे तर, इयत्ता नववीच्या अथर्व चौधरी,सोमेश हुलजुटे, अरविंद इथापे,कु. सायली गागरे आणि इयत्ता दहावी मधील कु. अक्षदा जाधव, कु. अनुराधा मुळे, युवराज पवार, हर्षवर्धन होन या विद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्य मिळविले. 

या विद्यार्थ्यांचे  संस्थेचे अध्यक्ष आ.राधाकृष्ण विखे पाटील, जि. प. अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, खासदार सुजय  विखे पाटील, महासंचालक डॉ यशवंत थोरात, प्रा. दिगंबर खर्डे, आणि सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

फोटो कॅप्शन:- प्रवरा सायन्स अकॅडमी’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेसाठी  सात केंद्रावर  परीक्षा देणारे विद्यार्थी. 

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कमवा व शिका विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक

आर्थिक परिस्थिती खडतर असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करतानाच सुरु केलेल्या “कमवा आणि शिका’ योजने द्वारे शिक्षण घेता येईल अशी कल्पना नसलेले हजारो युवक-युवती “कमवा आणि शिका ” योजनेतून शिक्षण घेऊन देश आणि जागतिक पातळीवर स्थावरझाले असून नुकत्याच पार पडलेल्या स्वयंसिद्धा यात्रेत लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या विविध वस्तूंची विक्री करून अर्थार्जन केल्याने विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असल्याची माहिती कृषी  शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांनी दिली.

उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक गरीब कुटुंबातील होतकरू मूले-मुलींना शिक्षण मिळाले पाटहजे या साठी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी  यासाठी या योजनेचा आणखी विस्तार करून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये ” कमवा आणि शिका “ही योजना आणखी प्रभावी पणे स्वबळावर सुरू केली.संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातही हि योजना   सन २००३ पासून कार्यान्वित आहे.  आज पर्यंत अनेकांनी या योजनेचा लाभ घेऊन शिक्षण पूर्ण केल्या नंतर  मोठ्या पदावर काम करण्याची मजल मारली आहे.

त्याच अनुषंगाने पंचायत समिती राहता आणि जनसेवा फाऊंडेशन लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी येथे पाच दिवसीय स्वयंसिद्ध यात्राचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध बचतगट, महाविद्यालयाच्या कमवा आणि शिका मधील विद्यार्थ्यांनी स्टॉल लावून आपल्या उत्पादनाचे सादरीकरण करण्यात आले यामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कागदी फुले व बुके बनवून त्याची विक्री केली तसेच महाविद्यालयातील शेती विभागाद्वारे उत्पादित पेरू, ढोबळी मिरची व पेरू रोपे यांची माहिती व विक्री केली.

विद्यार्थ्यांनी यावेळी मान्यवरांना माहिती पटवून दिली यामध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जि. परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील व कार्यकारी सहाय्यक सुश्मिता माने यांनी विद्यार्थ्यांचा स्टॉल बघून कौतुक केले. कार्यक्रमाच्या सांगता समारंभावेळी सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून विद्यार्थ्यांनी बनवलेले कागदी  बुके घेऊन इतर संस्थांना वापरण्याचे आव्हान करून प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन अभिनंदन केले.या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कृषी संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे यांनी अभिनंदन केले व या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना फार्म विभाग प्रमुख श्री.सुनील कानडे, प्रशांत आहेर तसेच कमवा आणि शिका समन्वयक प्रा. मनीषा आदिक यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो कॅप्शन :- कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातीळल ‘कमवा आणि शिका’योजनेतील  विद्यार्थ्यांनी वस्तु विक्रीतून केलेल्या कमाई या  उपक्रमाचे कौतुककरताना ना.सौ शालिनीताई विखे , सरपंच सौ. मनीषा आहेर, सौ. रुपाली लोंढे आणि मान्यवर

अंतरविद्यापीठ युवा महोत्सवात प्रवरेच्या कृषी महाविद्यालयाचे यश

लोकनेतेडॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयातील विध्यार्थिनी कु. तृप्ती राजेश पंडित हिने गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात नुकताच पार पडलेल्या राज्य स्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव “इंद्रधनुष्य” मध्येमहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले असल्याची माहिती प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी दिली.

सदर स्पर्धा दिनांक ०२ डिसेंबर ते ०६ डिसेंबर दरम्यान पार पडल्या होत्या.या युवा महोत्सवातमहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघालावकृत्व स्पर्धा,सांस्कृतिक मिरवणूक, पथनाट्य इ. मध्ये अनुक्रमेप्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले. या सर्व स्पर्थामध्ये कु.तृप्ती राजेश पंडित हिने उल्लेखनीय सहभाग घेतला होता.तिला या यशामध्ये म.फु.कृ.वि.,राहुरीचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चव्हाण व महाविद्यालाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वाल्मिक जंजाळ आदींचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल  संथेचेअध्यक्षआ.श्री.राधाकृष्ण विखे पाटील, जि. प. अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री श्री. आण्णासाहेब म्हस्के पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील , संस्थेचे महासंचालक डॉ. वाय.एस.पी. थोरात , सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील , कृषि शिक्षणसंचालक डॉ.मधुकर खेतमाळस आदींनी अभिनंदन केले.

पद्मश्री विखे पाटील सैनिकी स्कुल आणि सैनिकी सेवापूर्व शिक्षण इन्स्टिट्यूटच्या (एस.पी.आय.) च्या २२ व्या स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

धड्पडकरून कोषातून बाहेर पडनारा पतंग जीवनातील प्रयत्नांद्वारेच प्रत्येक गोष्ट शिकत पुढे जातो. त्याच प्रमाणे ध्येय प्राप्ती अशक्य कधीच नसते त्यासाठी जीद्द,चिकाटी, आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणे ज्याला शक्य होईल तो जीवनात यशस्वी होतॊच असे प्रतिपादन पद्मश्री विखे पाटील सैनिकी स्कुल आणि सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थे (एस.पी.आय.) चे माजी विद्यार्थी आणि सध्या गोरखा रेजिमेंटचे प्रमुख मेजर निखिल निकम यांनी केले.

लोणी पद्मश्री विखे पाटील सैनिकी स्कुल आणि सैनिकी सेवापूर्व शिक्षण इन्स्टिट्यूटच्या (एस.पी.आय.) च्या २२ व्या स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात मेजर निखिल निकम बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी लोणी खुर्दच्या सरपंच सौ. मनीषा आहेर,प्रवरा ग्रामीन शिक्षण संस्थेचे सदस्य ज्ञानदेव म्हस्के,आप्पासाहेब दिघे, सदस्य व सचिव श्री भारत घोगरे, शिक्षणाधिकारी प्रा. विजय आहेर, कन्या कॅम्पसच्या संचालक सौ. लीलावती सरोदे,गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कुलच्या प्राचार्या सौ संगिता देवकर, प्रवरा पब्लिक स्कुलचे प्राचार्य सयाराम शेळके, प्रवरा हाईसस्कुलचे प्राचार्य श्री निर्मळ ,विलास शेळके,सौ. ज्योती कौशिक तसेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एन डी  ए) परीक्षेची तयारी करणारे  माजी विदयार्थी श्री आदित्य कासार,रौमिक चोखंडे,राज करणोरे आणि सत्यम सानप आदी मान्यवर उपस्थित होते . प्रारंभी शाळेचे कमांडण्ट कर्नल डॉ. भरतकुमार यांनी स्वागत तर, प्राचार्य सुधीर मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या वार्षिक प्रगतीचा अहवाल सादर केला.

भारत गाढवे, रमेश दळे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक आणि क्रीडा पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक पारितोषिकांमध्ये  सिद्धांत शेळके,तन्मय पवार,सुशील पुरी,महेश ढाकळे,आणि क्रीडा पारितोषिकांमध्ये मृणाल तारडे ,यश कुताल,निरंजन गांगर्डे,गौरव माधावी तर ,सर्वसमावेशक सिध्दांत शेळके,जयगलांडे,तेजस पारखे,महेश ससाणे यांचा समावेश होता . यावर्षीची चॅम्पियन ट्रॉफी वैद्दय हाऊस ने प्राप्त केली. या वेळी जबाबदारी पेक्षा सरस कामगिरी केलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांचाही सन्मान करण्यात आला. या मध्ये भारत गाढवे,इसाक पठाण,रमेश दळे,अकिल शेख,आर एम मोरे,बी. ए कुलांगे,प्रमोद देशमुख,विनय धालयांत,शहाजी मगर,दीपक ढोणे, संतोष कांबळे,विनोद शिरसाठ,अण्णासाहेब पगारे, संदीप पडघलमल,गणेश काळे, सौ. सविता दिवे,सौ सुनिता खोडे यांना सन्मानित करण्यात आले.

तर, प्रा. राजेश माघाडे आणि सुनील ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर, भारत हमको जनसे भीप्यारा है. हि थीम असलेला सांकृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांची उपस्थीतीउल्लेखनीय होती शेवटी इसाक पठाण यांनी आभार व्यक्त केले.

लोणी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात दि. १३ डिसेंबर ते १६  डिसेंबर या कालावधीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या क्रिकेट या स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असणाऱ्या १०  जिल्यातील  ३०  संघानी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेचे  उदघाटन १३ डिसेंबर २०१९  रोजी महाविद्यालयाती प्रांगणात झाले असून या उदघाटन प्रसंगी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीर सिंग चौहान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे पाटील हे उपस्थित होते. डॉ. महावीरसिंग चौहान यांनी सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून खेळाचे महत्व समजून सांगितले तसेच कार्क्रमाचे अध्यक्ष भारत घोगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना उदघाटनप्रसंगी  मार्गदर्शन केले.

यावेळी कृषी महाविद्यालय विळद घाट येथील प्राचार्य डॉ. मधुकर धोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. मधुकर खेतमाळस (संचालक कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय), प्रा. निलेश दळे (प्राचार्य कृषी महाविद्यालय), प्रा. रोहित उंबरकर (प्राचार्य कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय), प्रा. ऋषिकेश औताडे ( प्राचार्य कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय), डॉ. खर्डे (उपप्राचार्य पी व्ही पी जुनिअर कॉलेज ) व इतर शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

बाभळेश्वर येथे सोमवार पासून राहता तालुका विज्ञान व गणित प्रदर्शन

राहता तालुका पंचायत समिती आणि तालुका गणित – विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विदयमाने बाभळेश्वर येथील पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सोमवार दि. १६ ते बुधवार दि. १८ डिसेंबर २०१९ दरम्यान राहता तालुका विज्ञान व गणित प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या. विज्ञान व गणित प्रदर्शनाच उदघाटन सोहळा  सोमवार दि. १६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १२ वा. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सभापती सौ. हिराबाई कातोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या  प्रदर्शना साठीजिल्हा परिषद सदस्या सौ.पुष्पाताई रोहम,सौ. कविता लहारे,श्री शाम माळी,श्री दिनेश बर्डे,पंचायत समिती सदस्या  सौ. सुवर्णा तेलोरे, सौ. अर्चना आहेर, सौ. नंदाताई तांबे,श्रीमती शोभा जेजुरकर,श्री ओमेश जपे ,श्री काळू राजपूत, संतोष ब्राम्हणे, भारत अंत्रे , तुकाराम बेंद्रे, ज्ञानदेव आहेर, अण्णासाहेब बेंद्रे ,श्रीपाद मोकाशी सरपंच उपसरपंच आणि सद्स्य उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनांध्ये उत्कृष्ठ ठरलेल्या प्रयोगांना पारितोषिक देऊन गौवरविण्यात येणार असून  बुधवार दि. १८ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी २ वा. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते आणि उपसभापती बाबासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या प्रदर्शनासाठी तालुक्यातील विद्यार्थी आणि पालकांनी उपपिस्थत राहावे असे आवाहन गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे,गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री दिपक डेंगळे,शिक्षण विस्तार अधिकारी श्री ज्ञानेश्वर वाघचौरे,श्रीमती शबाना शेख ,श्री धोंडीराम राऊत,विज्ञान संघटनेचे अध्यक्ष श्री मधुकर साळुंके ,गणित संघटनेचे अध्यक्ष श्री शंकर रिंगे , बाभळेश्वरचे केंद्र प्रमुख श्री सुनील सिनारे यांचे सह तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख,प. स  राहता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि मुख्याध्यापकांनी केले आहे.

प्रवरा पब्लिक स्कुलचा वार्षिक क्रीडा महोत्सव जलौषात संपन्न

प्रवरानगर येथील प्रवरा पब्लिक स्कुलचा वार्षिक क्रीडा महोत्सव जलौषात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य प्राचार्य सयराम  शेळके यांनी दिली. या क्रीडा महोत्सवा मध्ये मनाचा समाजाला जाणारा प्रथम क्रमांकाचा मान  नेताजी सदनाने मिळविला.

प्रवरा पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी आणि माजी वरीष्ठ पोलीस अधिकारी श्री अरुण वाबळे यांच्या हस्ते या क्रीडा  महोत्सवामध्ये विजयी झालेले संघ आणि खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले.या प्रसंगी प्रवरा पब्लिक स्कूलचे संचालक कर्नल डॉ. के. जगन्नाथन,उपप्राचार्य  किसनराव   अडसूळ, , श्री मिनास जोसेफ,सौ. मीना जगधने,प्राथमिक विभागाच्या सौ. सिमा क्षिरसागर, सुरेश  गोडगे, प्रशांत  भावसार , संतोष .झोटिंग, भाऊसाहेब गटकळ , विकास शिंदे ,गणेश  तुरकणे,अब्दुलरसुल सय्यद,क्रीडा संचालक दीपक जाधव आदीमान्यवर उपस्थित होते.

नेताजी सदनाने२०९ गुण मिळवून  प्रथम तर, शिवाजी सदन २०२ गुण मिळवून व्दितीय,सरदार पटेल सदन १८९ गुण मिळवून तृतीय आणि तानाजी सदनाला १८४ गुण मिळवून चतुर्थ येण्याचा मन मिळाला. या क्रीडा महोत्सवामध्ये १९ वर्षे वयोगटाखालील वैयक्तिक विजेतेपद भागवत कुलथे आणि कु. प्रीती भालेराव यांना तर १७ वर्षे वयोगटाखालील विजेतेपद नोलेश भोये आणि ऋतुजा पाटील यांना आणि १४ वर्षे वयोगटाखालील विजेतेपद तेजस कापडणीस, तर, १२ वारस वयोगटाखालील विजेतेपद आशिष वसावे यांनी मिळविले. प्रवरा पब्लिक स्कुलच्या वतीने या वर्षी  खेळामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “स्पोर्टमन ऑफ द इयर’ म्हणून रणजित डोंगरे आणि “स्पोर्टउमन ऑफ द इयर’ म्हणून कु. अपूर्वा जाधव यांना गौरविण्यात आले.

श्री अरुण वाबळे (माजीवरिष्ठ  पोलीस अधिकारी ) -विद्यार्थी जीवनामध्ये शिस्तीला खूप महत्व असून कठोर मेहनतीशिवाय यशमिळत नसल्याचे सांगितले.

फोटो कॅप्शन :- प्रवरा पब्लिक स्कुलचा वार्षिक क्रीडा महोत्सव बक्षीस वितरण करताना माजी विद्यार्थी आणि माजी वरीष्ठ पोलीस अधिकारी श्री अरुण वाबळे समवेत  संचालक कर्नल डॉ. के. जगन्नाथन, प्राचार्य सयराम  शेळके,उपप्राचार्य  किसनराव   अडसूळ, , श्री मिनास जोसेफ,सौ. मीना जगधने,प्राथमिक विभागाच्या सौ. सिमा क्षिरसागर, सुरेश  गोडगे, प्रशांत  भावसार , संतोष .झोटिंग, भाऊसाहेब गटकळ , विकास शिंदे ,गणेश  तुरकणे,अब्दुलरसुल सय्यद,क्रीडा संचालक दीपक जाधव आदी.

सक्षम महिला महोत्सव २०१९ भव्य प्रदर्शन विक्री खाद्य महोत्सवाचे उदघाटन

महिलांकडे पॅनल इकॉनॉमी असल्यानेच आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून बचत गटांतील ९७ हजार महिलांना रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी निर्माण केल्या होत्या. आता शिर्डी या आंतरराष्ट्रीय धार्मिकस्थळला भेट देणाऱ्या सुमारे तीन कोटी भाविकांच्या संख्येचा विचार करून  टाटा केमिकल्स सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) च्या कस्तुरी विभागाने ग्रामीण भागातील बचत गटांना मार्गदर्शन करून राज्यातील महिलाबचत गटांना प्रेरणादायी ठरेल असे काम करावे अशी अपेक्षा माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

लोणी येथे जनसेवा फौंडेशन व पंचायत समिती राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंम सिद्धा यात्रा राहाता तालुकास्तरिय सक्षम महिला महोत्सव २०१९ भव्य प्रदर्शन विक्री खाद्य महोत्सवाचे उदघाटन  करताना माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे बोलत होते याप्रसंगी माजी मंत्री आणासाहेब म्हस्के पाटील,टाटा केमिकल्स सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) च्या कस्तुरी विभागाच्या प्रमुख मुग्धा शहा ,प्रशिक्षण प्रमुख डॉ. मंजुषा कदम ,प स सभापती हिराबाई कातोरे,उपसभापती बबलू म्हस्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर,शिर्डी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अर्चना कोते,तहसीलदार कुंदन हिरे, जितेंद्र मेटकर, भारत घोगरे ,प्रकल्प संचालक रुपाली लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी श्री विखे पाटील  म्हणाले कि, महिलांमध्ये कर्तृत्व सिद्ध करण्याची जिद्द असते ,जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ना. सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी स्वयंसिध्दा यात्रेच्या माध्यमातून बचत गटातील महिलानांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचे मोठे काम केले असून, जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपणही सुमारे ९७ हजार महिलांना कर्जाच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न केला होता. ९८ टक्के कर्जाची वसुली असलेल्या महिलांच्या बचत गटांना भांडवलाबरोबरच प्रशिक्षण देऊन हे गट उत्पादित करीत असलेल्या वस्तूंचे वर्गीकरण करून टाटा केमिकल्स सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) च्या कस्तुरी विभागाने राज्यातील महिलांना प्रेरणादायी ठरेल असे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करताना या कामी सहकार्य करीत असलेल्या नाबार्ड बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांचे आभार व्यक्त केले.

टाटा केमिकल्स सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) च्या कस्तुरी विभागाच्या मुग्धा शहा, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी   स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान २०१८ मधील उत्कृष्ठ ग्राम पंचायत पुरस्कार, बचत गटांना कर्ज वाटप ,तालुकास्तरीय हिरकणी पुरस्कार प्राप्त बचत गटांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जी प. सदस्या सौ. कविताताई लहारे,  पुष्पाताई रोहम,दिनेश बर्डे, शाम माळी,प. स सदस्य उमेश जपे, भारत अंत्रे,संतोष ब्राह्मणे, काळू राजपूत,सौ. अर्चनाताई आहेर, शोभाताई जेजुरकर,सौ.नंदाताई तांबे,सौ.सुवर्णाताई तेलोरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे,तालुका  कृषी अधिकारीडॉ. बापूसाहेब शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, लोणी बु;चे सरपंच लक्ष्मण बनसोडे,उपसरपंच  अनिल विखे, लोणीखुर्दच्या सरपंच सौ. मनीषा आहेर, उपसरपंच सौ. सुवर्ण घोगरे यांचे सह महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

लोणी येथे बुधवार पासून तालुकास्तरीय सक्षम महिला महोत्सव २०१९ (स्वयंसिध्दा यात्रा) चे आयोजन

राज्य शहरी आणि ग्रामीन जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जनसेवा फाउंडेशन लोणी आणि पंचायत समिती राहता यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ११ ते १५ डिसेंबर दरम्यान लोणी येथे राहता तालुकास्तरीय सक्षम महिला महोत्सव २०१९ (स्वयंसिध्दा यात्रा) चे आयोजन करण्यात आले असून महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन – विक्रीव व खाद्य महोत्सवाचे उदघाटन बुधवार दि. ११ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी २.३० व माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  होणार आहे.

लोणी येथील  प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या उदघाटन कार्यक्रमासाठी  खासदार डॉ. सुजय विखे पाटील ,खासदार सदाशिव लोखंडे, महात्मा फुलेकृषी विद्यापीठाचे प्रा. जितेंद्र मेटकर,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्ट चे विश्वस्त व सचिव डॉ. राजेंद्र विखे पाटील,जी.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील,अतिरिक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परिक्षित यादव, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन शिंदे आदी मान्यवर उपस्तित राहणार आहेत.

शंभर पेक्षा जास्त गटांच्या सहभाग असलेल्या या  स्वयंसिध्दा यात्रातील स्टॊल ना सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत भेटी देऊन स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन – विक्रीव व खाद्य महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन सभापती सौ. हिराबाई कातोरे, उपसभापती बाबासाहेब म्हस्के,बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, आत्माचे प्रकल्प संचालक  शिवाजीराव जगताप,जी प. सदस्या सौ. कविताताई लहारे,  पुष्पाताई रोहम,दिनेश बर्डे, शाम माळी,प. स सदस्य उमेश जपे, भारत अंत्रे,संतोष ब्राह्मणे, काळू राजपूत,सौ. अर्चनाताई आहेर, शोभाताई जेजुरकर,सौ.नंदाताई तांबे,सौ.सुवर्णाताई तेलोरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे,तालुका  कृषी अधिकारीडॉ. बापूसाहेब शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, लोणी बु;चे सरपंच लक्ष्मण बनसोडे,उपसरपंच  अनिल विखे, लोणीखुर्दच्या सरपंच सौ. मनीषा आहेर, उपसरपंच सौ. सुवर्ण घोगरे, जनसेवा फाउंडेशनचे सचिव डॉ. हरिभाऊ आहेर, प्रकल्प संचालिका सौ. रुपाली लोंढे यांनी केले आहे.

निधन वार्ता

पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निकच्या ऑटोमोबाईल विभागात सेवेत असलेले प्रा. गणपत अण्णासाहेब गागरे रा. कानडगाव ता. राहुरी ( वय २९ वर्षे) यांचे ह्रदयविकारामुळे नुकतेच रोजी निधन झाले.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या ऑनलाईन परिक्षेकरीता निरिक्षक म्हणून प्रा. गागरे हे अकोले येथील तंत्रनिकेतनात गेले होते. दुपारी जेवण झाल्यावर अचानक त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने संगमनेर येथील दवाखान्यात नेण्यात आले. परंतू त्याअगोदरच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच तंत्रनिकेतनातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी वर्गात शोककळा पसरली. प्रा. गागरे हे अतिशय गरिब कुटूंबातील होते. अतिशय कष्टाने अभियांत्रीकी पुर्ण करून लोणी येथील तंत्रनिकेतनात नोकरी सुरू केली होती. त्यांची नुकतीच उच्चशिक्षणाची पदवी देखील पुर्ण झाली होती. विद्यार्थी प्रिय शिक्षक व मितभाषी स्वभावामुळे ते सुपरिचित होते. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यापश्चात आई, वडील, बहीन, पत्नी व मुलगी असा परिवार आहे.  गागरे यांच्या आकस्मिक निधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, तंत्रनिकेतनचे प्राचार्य, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी शोक व्यक्त केला आहे.

प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये क्राँस्- कंन्ट्री स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये  क्राँस्- कंन्ट्री  स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या असल्याची माहिती प्राचार्य सयाराम शेळके  यांनी दिली.

वेगवेगळया हाऊसधील ३७६  विदयार्थ्यांनी  या स्पर्धेत  भाग घेतला. वेगवेगळया  तीन वयोगटात मुलांच्या व दोन वयोगटात मुलींच्या यास्पर्धा झाल्या.  एकूण ४८ विदयार्थ्यीनीनी सहभाग घेतला.धावण्याच्या स्पर्ध्ये मध्ये मुलांमध्ये रोहीत सोरे, प्रविण भोये, तेजस कापडनीस व मुलींमध्ये प्राप्ती शेळके, समृदधी शेळके यांनी चांगल्या प्रकारे यश संपादन केले.तसेच सिनिअर व ज्युनिअर वयोगटामध्ये नेताजी हाऊस व सबज्युनिअर वयोगटामध्ये तानाजी हाऊस् व मुलींमध्ये एस.पी. व तानाजी हाऊसने यश संपादन केले.तसेच आय.पी.एस.सी. मेंबर शीप असलेल्या प्रवरा पब्लिक स्कूलने इंदोर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत चुतर्थ क्रमांक मिळवला. आय.पी.एस.सी आयोजित१७ वर्ष मुले या वयोगटातील सदर स्पर्धा ‘इमराल्ड हाईटस इंटरनॅशनल स्कूल’ इंदारे या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेत देशातील एकूण दहा संघ सहभाग झाले होते. अटीतटीच्या व रोम हर्षक झालेल्या या व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूल चौथ्या स्थानावर राहिले.१७ वर्षे वयोगटातील या संघाचे नेतृतव दर्शन सोळंके  यांनी केले तर चेतन पाटील, संकेत कोरडे, नितीन दिवे, दर्शन गांगुर्डे या खेळाडूनंनी अतिशय चांगले प्रदर्शन केले.

स्पर्धेकांचे शाळेचे संचालक त कर्नल डॉ . के. जगन्नाथन, उपप्राचार्य श्री.के.टी.आडसूळ व श्री.एम.ई.जोसेफ यांनी अभिनंदन केले. यशस्वी स्पर्धेकांना शाळेचे क्रिडा शिक्षक श्री. जाधव डी. के., श्री.शेख कदीर, श्री. कडसकर किरण, श्री.दळे प्रतिक,श्री. आसिफ खान,श्री.सुरज मारावि यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो कॅप्शन:- प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये  क्राँस्- कंन्ट्री  स्पर्ध्येमध्ये सहभागी झालेले खेळाडू

प्रवरेच्या कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षण दिवस साजरा

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालत नुकताच कृषी शिक्षण दिवस साजरा करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी दिली.

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महाविद्यालयातील प्रा. रमेश जाधव यांनी देशातील व महाराष्ट्र राज्यातील कृषीक्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची विद्यार्थ्यांना माहिती देताना भविष्यातील संधीची जाणीव करून दिली. तसेच कृषी पदवीधारकांनी शेतकरी सुखी होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप पठारे, प्राध्यापक वृंद  व सर्व स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो कॅप्शन :-लोणी येथील कृषी महाविद्यालत कृषी शिक्षण दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना रा. रमेश जाधव समवेत  प्राचार्य प्रा. निलेश दळे, प्रा. संदीप पठारे, प्राध्यापक वृंद  व सर्व स्वयंसेवक.