निधन वार्ता

पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निकच्या ऑटोमोबाईल विभागात सेवेत असलेले प्रा. गणपत अण्णासाहेब गागरे रा. कानडगाव ता. राहुरी ( वय २९ वर्षे) यांचे ह्रदयविकारामुळे नुकतेच रोजी निधन झाले.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या ऑनलाईन परिक्षेकरीता निरिक्षक म्हणून प्रा. गागरे हे अकोले येथील तंत्रनिकेतनात गेले होते. दुपारी जेवण झाल्यावर अचानक त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने संगमनेर येथील दवाखान्यात नेण्यात आले. परंतू त्याअगोदरच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच तंत्रनिकेतनातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी वर्गात शोककळा पसरली. प्रा. गागरे हे अतिशय गरिब कुटूंबातील होते. अतिशय कष्टाने अभियांत्रीकी पुर्ण करून लोणी येथील तंत्रनिकेतनात नोकरी सुरू केली होती. त्यांची नुकतीच उच्चशिक्षणाची पदवी देखील पुर्ण झाली होती. विद्यार्थी प्रिय शिक्षक व मितभाषी स्वभावामुळे ते सुपरिचित होते. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यापश्चात आई, वडील, बहीन, पत्नी व मुलगी असा परिवार आहे.  गागरे यांच्या आकस्मिक निधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, तंत्रनिकेतनचे प्राचार्य, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी शोक व्यक्त केला आहे.