प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची टिसीएस या बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड

लोकनेते पदमभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालय लोणी येथील अनुक्रमे एम. फ़ार्म अभ्यासक्रमातील एक आणि बी . फार्मसी अभ्यासक्रमातील पाच अशा एकूण सहि विद्यार्थ्याची टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टिसीएस )या बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड झाली . एम. फार्मसी मधून कु. आरती घोरपडे हिची पुणे येथे वार्षिक वेतन पाच लाख रुपये वेतन श्रेणी मध्ये निवड झाली तर बी. फार्मसी मधून अनुक्रमे अनिकेत गाडेकर, रोहित नागरे, मोईन शेख, स्वप्नील पिंपळे आणि दिशा खंडागळे यांची वार्षिक वेतन तीन लाख रुपये वेतन श्रेणी मध्ये निवड झाली. औषधनिर्माणशास्रमध्ये अतिशय महत्वाचा समजला जाणारा विभाग म्हणजे फार्माकोव्हिजिलन्स या विभागामध्ये प्रवरा फार्मसीच्या सहा विद्यार्थ्यांची निवड होणे म्हणजे महाविद्यलयाच्या दृष्टीने विशेष बाब आहे. महाविद्यालयाने मुलाखती पूर्वी आयोजित केलेल्या सॉफ्ट स्किल ट्रैनिंग कार्यक्रमाचा फायदा या विद्यार्थ्यांना या नोकरीसाठी झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. अंतिम परीक्षेपूर्वी नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने त्यांच्यामध्ये चैतन्याचे वातावरण आहे. प्रवरा हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी कायमच अग्रभागी असते.महाविद्यालयात नेहमी विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षणआयोजित केले जाते.