प्रवरा आर्किटेक्चरच्या प्रविण फेरंग याची गडचिरोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड…

लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा रुरल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर लोणी यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक  प्रविण फेरंग  या विद्यार्थ्याची गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरासाठी  निवड झाली आहे.

सदर शिबिरासाठी पुणे विद्यापीठातून रसेयो विभागाचे पुणे, नाशिक, अहमदनगर या तीन  जिल्ह्यातून एकूण पंचाहत्तर विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. त्यापैकी पंचवीस विद्यार्थी विद्यार्थिनी नगर जिल्ह्यातील आहेत.  यामध्ये आपल्या ग्रामीण भागातून अशा शिबिरासाठी निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे.

कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयास आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत सर्वसाधारण उपविजेतेपद.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत  कृषी महाविद्यालय बारामती येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालय लोणी येथील संघाने एकूण ३६ गुणांची कमाई करून सर्वसाधारण उपविजेतेपद तर कृषी महाविद्यालय पुणे संघाने ३७ गुण मिळवत विजेतेपद पटकाविले माहिती कृषी संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल केदारी यांनी दिली.

या स्पर्धेमध्ये कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयातील खेळाडू गौरव शिंदे यास सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेत गौरव शिंदे यांनी १०० मी धावणे व उंच उडी मध्ये सुवर्णपदक मिळवले. संजीवनी पावरा हीस १०० व २०० मीटर धावणे या स्पर्धा प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळाले तर प्रसाद नलावडे, तेजस साखरे, गौरव ठाकरे यांनी अनुक्रमे १००, २०० व ४०० मीटर  धावणे या स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकाविले तर पुष्कराज पवार याने थाळीफेक या स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळाले.तसेच महाविद्यालयाच्या मुलांच्या रिले संघामध्ये ४ x १०० मी रिलेमध्ये सुवर्णपदक तर ४ x ४०० मध्ये रोप्य पदक मिळविले.

प्रवरा ग्रामीण अभियांञिकी महाविद्यालयातील “इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल अभियांत्रिकी” विभागाच्या पाच विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड…

लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या “इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल ” विभागाच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या पाच विद्यार्थ्यांची इमर्सन एक्सपोर्ट इंजिनिअरिंग सेंटर., नाशिक व जॉन्सन कंट्रोल., पुणे’ या बहुराष्ट्रीय कंपण्यामध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करून ५.६० लाखांपर्यंत पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

यामध्ये प्राजक्ता मोटे, भैरवी राऊत, निरंजना कडू आणि ऋषिकेश मोरे या विद्यार्थ्यांची ‘इमर्सन एक्सपोर्ट इंजिनिअरिंग सेंटर., नाशिक’ आणि अभिषेक घोरपडे या विद्यार्थ्याची  ‘जॉन्सन कंट्रोल., पुणे’ या कंपन्यांमध्ये निवड झाली. तसेच ते म्हणाले, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी नेहमीच प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढ व प्लेसमेंट साठी विविध कोर्सेस व ऍक्टिव्हिटी चे आयोजन केले जाते.यामध्ये सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट,ऍप्टीट्युड टेस्ट, सॉफ्टवेअर व स्कील डेव्हलपमेंट कोर्सेस, एंटरप्रीन्यूअरशिप इंटरनॅशनल प्रोग्रॅम, करियर गायडन्स, सराव मुलाखत इत्यादी उपक्रमांचा अंतर्भाव आहे.

प्रवरेच्या गृहविज्ञान आणि संगणकशास्ञ महाविद्यालयातील निकिता जवरे यांची निवड…

लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था ,लोणी या संस्थेतील  गृहविज्ञान आणि  संगणकशास्त्र महिला महाविद्यालय, लोणी येथील  संगणकशास्त्र या शाखेतील विद्यार्थिनी कु .निकिता बाळासाहेब जवरे  हिची   स्पायजेट लिमिटेड,हरियाना,दिल्ली या विमान  क्षेत्रातील नामांकित कंपनीमध्ये दिल्ली येथे निवड  झाली .