केंद्र सरकारची २१ सैनिकी शाळांना मान्यता नगर मधील विखे पाटील शाळेचा समावेश

देशभरात २१ नव्या सैनिकी शाळा सुरू करण्यास संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यात राज्याच्या नगर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. विखे पाटील सैनिकी शाळा या एकमेव शाळेचा समावेश आहे. या नव्या सैनिकी शाळांमधील प्रवेशप्रक्रिया मे महिन्यापासून सुरू होणार असून, पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०२२-२३) या शाळा सुरू होणार आहेत.
केंद्रातर्फे देशभरात १०० नवीन सैनिकी शाळा स्थापन करण्यात येत आहेत. स्वयंसेवी संस्था, खासगी संस्था, राज्य सरकारांसोबत भागीदारी तत्त्वावर या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. त्या अंतर्गत २१ नव्या शाळांना मान्यता देण्यात आली आहे. सध्याच्या सैनिकी शाळा निवासी प्रकारच्या आहेत; परंतु २१ शाळांपैकी सात शाळा दिवसभराच्या असतील, तर १४ शाळा निवासी असतील.  प्रवेश प्रक्रिया सहाव्या इयत्तेपासून सुरू होईल. त्याचे वेळापत्रक www.sainikschool.ncog.gov. in या पोर्टलवर पाहता येईल.
अशी असेल प्रवेशप्रक्रिया
‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांसाठी सहाव्या इयत्तेत ४० टक्के जागा असतील. त्याच शाळेत आधी शिकत असलेल्यांसाठी ६० टक्के जागा ठेवल्या जातील. मात्र, त्यांना पात्रता चाचणी द्यावी लागेल. अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्याथ्र्यांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवर शाळेच्या अर्ज प्रक्रियेविषयी माहिती दिली जाईल. जे पात्र विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या शाळेत प्रवेश घेण्यास उत्सुक असतील, त्यांना ई-समुपदेशनासाठी www.sainikschool. ncog.gov.in येथे नोंदणी करावी लागेल.—

बॅटरी चलीत दुचाकी आणि ऑनलाईन बँकीगद्वारे चालविण्यात येणारे सॅनिटरी नॅपकीन मशीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत आणि स्टार्ट अप इंडीयाच्या माध्यमातून  देशात संशोधनाला गती मिळत आहे. बदलती शिक्षण पद्धतीचा स्विकार प्रवरेत नेहमीचं होत असतो म्हणूनचं अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली बॅटरी चलीत दुचाकी आणि ऑनलाईन बँकीगद्वारे  चालविण्यात येणारे  सॅनिटरी नॅपकीन मशीन हे महत्वपूर्ण आहे. त्यांचे पेटंट मिळविण्यासाठी आता प्रयत्न करावे असे प्रतिपादन जेष्ठ नेते आणि लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. लोणी येथील प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने,इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन चे विभाग प्रमुख डॉ. संजय कुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली नयन घोरपडे, अनुराधा भुसे, श्रृती आहेर यांनी  अल्प खर्चाचे ॲटोमॅटीक आणि मोबाईल बँकीगद्वारे चालणारे सॅनिटरी नॅपकीन मशीन तयार केले. यासाठी त्यांना ११ ते १२ हजार रुपये खर्च आला असून याद्वारे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी यांचा मोठा फायदा होणार आहे. यासाठी त्यांना डॉ. संदीप आहेर, प्रा. ए. एम. अन्सारी यांचे मार्गदर्शन लाभले   सध्या सर्वञ ई बाईकची धूम सुरु आहे त्यास सरकार देखिल प्रोत्साहन देप आहे. येथील प्राध्यपक डाॅ. संजय कुरकुटे यांनी जुन्यातून नवं काहीतरी हीसंकल्पना घेऊन बॅटरी चलीत दुचाकी तयार केली केवळ ४० ते ४५ हजार रुपये खर्च करून  खास शेतक-यासाठी चारा वाहतूक, दुध वाहतूक यासाठी ही गाडी महत्वपूर्ण ठरत आहे. बॅटरीद्वारे ही गाडी १०० किलो मीटर चालते. शिवाय ध्वनी आणि वायू प्रदुषण दखिल होत  नाही. यामध्ये अजूनही नवनवीन प्रयोग डॉ. कुरकुटे करणार  आहेत.  या संशोधनाची माहीती संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाणून घेत असतांनाच  विद्यार्थी आणि  शिक्षकांचे कौतुक करत येणा-या काळात हीच शिक्षणपद्धती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित आहे. या शिक्षण धोरणामुळे देशात रोजगार निर्मितीबरोबरचं आत्मनिर्भर भारत उभा राहणार आहे. संस्थेच्या माध्यमातून यांचे पेटंट मिळविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेली उपकरणे आपल्या  संस्थेत कशाप्रकारे वापर करता येईल यावर भर देण्याची सुचना करतांनाच संशोधन कार्यासाठी संस्था आपल्या बरोबर राहील असेही सांगितले. 

१९१ विद्यार्थ्यांची इंडिगो व एजिल एअरलाईन्समध्ये निवड

लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटीलप्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्हूमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेतील एकूण ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या ४०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती महाविद्यालयामध्ये इंडिगो एअरलाईन्सचे रिजनल मॅनेजर  विठ्ठल लबडे,  एजिल एअरलाईन्समुंबईचे मॅनेजर  आशिष अब्रहम, शिर्डी विमानतळ,  असि. एच. आर. बेंगलोर अरुणकुमार आणि रिजनल मॅनेजर,   हैद्राबाद कुमारसाहेब यांनी घेतल्या. या मुलाखातीमधून १९१ विद्यार्थ्यांची विमानतळावर बसचालक, लोडर व कार्यालयीन कर्मचारी म्हणून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली. पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली विविध नामांकित कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्हू आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून  इंडिगो एअरलाईन्स व एजिल एअरलाईन्स या हवाई वाहतूक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नामांकित कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्हूचे आयोजन केले होते. या मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद नोंदवला. सुरवातीला सर्व सहभागी विद्यार्थ्यांना कंपनीच्या अधिकाऱ्यानी मार्गदर्शन केले.  या विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल  संस्थेचे अध्यक्ष आ. राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व संस्थेच्या सर्व  संचालकांनी आणि पदाधिकार्यांनी अभिनंदन केले.