प्रवरेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त स्वच्छता मोहीम

केवळ अट्टल राजकारणीच नाही तर जीवनाच्या विविध पैलूवर चांगलाच प्रभाव असलेल्या महात्मा गांधी यांनी  अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळविण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला.असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक स्नेहल सहाणे यांनी केले.

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे आणि रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. या वेळी झालेल्या कार्यक्रमात स्नेहल सहाणे या विद्यार्थिनीने आपले विचार मांडले. यावेळी डॉ.मधुकर खेतमाळस यांनीही  स्वयंसेवकांना मार्गदर्शनकरून स्वच्छ भारत मिशन राबविण्याचे आवाहन केले. प्रारंभी महाविद्यालयच्या प्रा.श्रद्धा रणपिसे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

स्वयंसेवक स्नेहल सहाणे हिने सांगितले कि, भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणता येईल म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा मान देण्यात आला आहे आणि आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आले असे तिने सांगितले तसेच अपर्णा कदम हिने भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली.

प्रतिमपूजन झाल्यानंतर रासेयोच्या वतीने प्रा. प्रविण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविले, महाविद्यालय परिसर आणि मुलींचे वसतिगृह गेट परिसर स्वच्छ केला. स्वयंसेवक दीप्ती शेळके हिने स्वच्छते बद्दल स्वयंसेवकांना शपथ दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन वाघ यांनी केले तर स्वयंसेवक प्रतिभा कर्डीले हिने मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी तसेच सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.

फोटो कॅप्शन :-लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात  राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्सवात निमित्त राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविताना विदयार्थी 

जलतरण स्पर्ध्ये मध्ये पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कुल च्या दहा खेळाडूंनी सुवर्ण, सिल्व्हर आणि कास्य असे ३१ पदक प्राप्त.तर, बॉक्सिंग स्पर्ध्येत १५ खेळाडूंची विभागीय स्पर्ध्येसाठी निवड

अहमदनगर येथिल वाडिया पार्क येथे पार पडलेलेल्या जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्ध्येमध्ये लोणी येथील पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कुल च्या दहा खेळाडूंनी सुवर्ण, सिल्व्हर आणि कास्य असे ३१ पदक प्राप्त केली असून पोलीस ब्राऊन मैदानावर झालेल्या  बॉक्सिंग स्पर्ध्ये मध्ये १५ सुवर्ण, ५ सिल्व्हर आणि ३ कास्य पदक मिळवून या स्पर्ध्ये मधील १५ खेळाडूंची विभागीय स्पर्ध्येसाठी निवड झाली  असल्याची माहिती प्राचार्य सुधीर मोरे यांनी दिली.

यामध्ये १७ वर्षे वयोगटातील करण धनवट  यांनी अनुक्रमे ५०,१००,२०० मीटर  आणि ४ मी. बाय १००,४ बे मिडले  रिले मध्ये पाच सुवर्ण पदक मिळविले. तर, वैभव तरटे १०० मीटर,४ बाय १००मी. रिले, ४ बे मिडले  रिले मध्ये तीन सुवर्ण पदक आणि अंश पाल या खेळाडूने १०० मी. रॉक,२००मी.बॅक, ४००मी.फ्री, ४ बाय १०० मी. फ्री रिले,४ बाय मोडले रिले असे पाच सुवर्ण पदक तसेच विनायक ठाकरे या विद्यार्थ्याने ४ बाय १०० मी, आणि ४ बाय मिडले मध्ये सुवर्ण आणि ५० मी. मध्ये ब्राँझ पदक मिळविले.तर १४ वर्षे वयोगटातील कुणाल घोंगडे यांनी ५०मी. मध्ये सिल्व्हर पदक मिळविले.

१९ वर्षे वयोगटातील अक्षय गांगुर्डे २००मी,४००,मी. ४बाय १००मी रिले, ४ बाय मिडले,स्पर्ध्येत सुवर्ण आणि सिल्वहर पदक मिळविले. मंगेश काळे याने १००मी. फ्री,५०मी फ्री,४ बाय १००मी रिले,४ बाय मोडले रिले मध्ये सुवर्ण आणि सिल्वहर पदक मिळविले.वैभव सरोदे याने १५०० मी फ्री मध्ये सुवर्ण,१००मी बॅक मध्ये ब्राँझ,४ बाय १०० रिले, ४ बाय मिडले मध्ये सुवर्ण आणि सिल्वहर पदक मिळविले.तर, यश पलांडे या खेळाडूने ४ बाय १०० मी, रिले स्पर्धेत सुवर्ण ४ बे मोडले स्पर्ध्येत सिल्व्हर पदक मिळविले.

पोलीस ग्राउंड येथे पार पडलेल्या बॉक्सिंग स्पर्ध्ये मध्ये शैलेश महाजन,शैलेश महाजन, निरंजन गांगुर्डे,सिद्ध थोपटे,तेजस पारखे,निहाल सावंत,प्रज्वल पाटील,तपस्वी भांबरे,वेद आजगेकर,शिध्येश ढमढेरे,आदर्श राठोड,मंथन फुरुडे, महेश ससाणे,  प्रथमेश  ठोंबरे यांनी सुवर्णपदक आणि मुंनाल तरडे, प्रेम पिसे,अशिष गुरव ,साहिल मानकर,सुशांत महाले यांनी सिल्व्हर आणि जयदीप दुशिंग,यश बोर्डे,गौरव लोहारे यांनी ब्राँझ पदक मिळविले. यातील १५ खेळाडूंची विभागीय स्पर्ध्येसाठी निवड झाली आहे.

या सर्व खेळाडूंचे  राज्याचे गृह निर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील , माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के  पाटील,खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील,महासंचालक डॉ.यशवंत थोरात,सचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. अशोक कोल्हे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, प्रा. दिगंबर खर्डे, कमांडण्ट डॉ.भरत कुमार ,प्रा. विजय आहेर यांचेसह शिक्षक आणि विद्यार्थिनींनी अभिनंदन केले.

चौकट :- पोलीस ग्राउंड येथे पार पडलेल्या बॉक्सिंग स्पर्ध्ये मध्ये याच विद्यालयाच्या खेळाडूंनी १५ सुवर्ण ५ सिल्व्हर आणि ३ कास्य पदक मिळविले यातील १५ खेळाडूंची विभागीय स्पर्ध्ये साठी निवड झाली आहे.  

फोटो कॅप्शन ;-जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण, सिल्व्हर असे ३१ पदके  मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांसमवेत कमांडण्ट डॉ.भरत कुमार, प्राचार्य सुधीर मोरे आणि प्रशिक्षक आदी.

प्रवरा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला आयएसओ मानांकन.

स्थापनेपासूनच गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या लोणी येथील  प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला नुकतेच “आयएसओ” मानांकन प्राप्त झाले असल्याची माहिती प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथिल प्रवरा महाविद्यालयातील उपलब्ध शैक्षणिक सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, गुणवत्ता, संशोधन, परिपूर्ण  ग्रंथालय, विध्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र वसतिगृहे, द्रुकश्राव्य माध्यमांनी परिपूर्ण वर्ग, अद्यावत जिमखाना, क्रीडासुविधा, अनुभवी  व उच्च शिक्षित शिक्षकवृंद, उज्वल निकालाची परंपरा, उत्कृष्ट प्लेसमेंट, सामाजिक कार्यातील महाविद्यालयाचा सहभाग,विविध संस्थांशी सामंजस्य करार, आदी बाबींचा अभ्यास करून लोणी येथील औषधनिर्माणशास्त्र  महाविद्यालयआय.एस.ओ ९००१:२०१५  क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टिम चे निकष पूर्ण करत असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे,प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचे डॉ. राव यांनी सांगितले.

सदर मानंकानाबद्दल राज्याचे गृह निर्माणमंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,खासदार डॉ. सुजय विखे पाटील,जिल्हा परिषद अध्यक्ष्या ना. सौ.शालिनीताई विखे पाटील,संस्थेचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात,रणरागिणी महिला मंडलाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी  अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे पाटील, संचालक,तांत्रिक-शिक्षणडॉ. के.टी.व्ही. रेड्डी, यांनी अभिनंदन केले.  

फुटबॉल स्पर्धेमध्ये प्रवरा कन्या विद्या मंदिरचा दबदबा .. राज्यस्तरावर निवड

नुकत्याच कोळपेवाडी येथे पार पडलेल्या विभागीय फुटबॉल स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या १४ वर्षें वयोगटातील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात पुणे संघावर विजय मिळवून प्रथम क्रमांक मिळवून प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या मुलींच्या या संघाने फुटबॉल स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला असून या संघाची राज्यस्तरावर निवड झाली असल्याची माहिती संचालिका सौ.लीलावती सरोदे यांनी दिली.

विद्यालयाच्या प्राचार्या सौ. कुमकर, क्रीडा संचालिका आणि फुटबॉल कोच सौ. विद्या गाढे-घोरपडे , हॉकी मार्गदर्शक सौ. कल्पना कडू यांच्या मार्गदर्शनाखाली गोलकिपर कु. भावना देशमुख,कु, दीप्ती बर्डे,कु. वैष्णवी काळे,कु. ईश्वरी नरवडे, यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच कु. निकिता जाधव,कु. गायत्री बोरुडे, कु. युतिका अहिरे,कु. प्रणिता पगार, कु.तेजल  उचित, कु.श्रद्धा मुंढे,कु. ऋतुजा सिनारे, कु. मयुरी लेकुळे, कु. श्रुती पाटील,समृद्धी जंगले,कु. पायल काळखैरे,सरिता आंधळे, तनुजा अहिरे,वैष्णवी मोरे यांच्या संघाने सेमीफायनल मध्ये सोलापूर ग्रामीण संघाचा ५X ० ने पराभव  करीत अंतिम सामन्यात पुणे शहराच्या सेंट मेरी संघाबरोबर अटीतटीची लढत देऊन २X० ने पुणे संघावर विजय मिळविला.

या मुलींचे राज्याचे गृह निर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील , माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के  पाटील,खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील,महासंचालक डॉ.यशवंत थोरात,मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. अशोक कोल्हे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, प्रा. दिगंबर खर्डे, प्रा. विजय आहेर यांचेसह शिक्षक आणि विद्यार्थिनींनी अभिनंदन केले.

फोटो कॅप्शन ;-विभागीय फुटबॉल स्पर्धेत प्रप्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या मुलींच्या संघासोबत संचालिका सौ.लीलावती सरोदे प्राचार्या सौ. कुमकर, क्रीडा संचालिका आणि फुटबॉल कोच सौ. विद्या गाढे-घोरपडे , हॉकी मार्गदर्शक सौ. कल्पना कडू आदी.