प्रवरेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त स्वच्छता मोहीम

केवळ अट्टल राजकारणीच नाही तर जीवनाच्या विविध पैलूवर चांगलाच प्रभाव असलेल्या महात्मा गांधी यांनी  अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळविण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला.असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक स्नेहल सहाणे यांनी केले.

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे आणि रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. या वेळी झालेल्या कार्यक्रमात स्नेहल सहाणे या विद्यार्थिनीने आपले विचार मांडले. यावेळी डॉ.मधुकर खेतमाळस यांनीही  स्वयंसेवकांना मार्गदर्शनकरून स्वच्छ भारत मिशन राबविण्याचे आवाहन केले. प्रारंभी महाविद्यालयच्या प्रा.श्रद्धा रणपिसे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

स्वयंसेवक स्नेहल सहाणे हिने सांगितले कि, भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणता येईल म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा मान देण्यात आला आहे आणि आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आले असे तिने सांगितले तसेच अपर्णा कदम हिने भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली.

प्रतिमपूजन झाल्यानंतर रासेयोच्या वतीने प्रा. प्रविण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविले, महाविद्यालय परिसर आणि मुलींचे वसतिगृह गेट परिसर स्वच्छ केला. स्वयंसेवक दीप्ती शेळके हिने स्वच्छते बद्दल स्वयंसेवकांना शपथ दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन वाघ यांनी केले तर स्वयंसेवक प्रतिभा कर्डीले हिने मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी तसेच सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.

फोटो कॅप्शन :-लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात  राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्सवात निमित्त राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविताना विदयार्थी