प्रवरा सायन्स अकॅडमी’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या सात केंद्राद्वारें मराठी,इंग्रजी आणि सेमी ,इंग्रजी माध्यमाच्या एकुण ४१ शाळेतील सुमारे १ हजार ९२ विद्यार्थ्यांनी दिली प्रज्ञा शोध परीक्षा

स्पर्ध्येच्या युगात शालेय शिक्षण संपवून उच्यशिक्षणाच्या विविध संधीसाठी लागणाऱ्या पूर्व परीक्षेच्या तयारी मार्गदर्शनासाठी  प्रवरानगर येथे स्थापन  केलेल्या “प्रवरा सायन्स अकॅडमी’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विशेष नैपुण्य मिळवले असल्याची माहिती प्रवरा सायन्स अकॅडमीचे संचालक प्रा. शहाजी साखरे यांनी दिली.  मराठी,इंग्रजी आणि सेमी ,इंग्रजी माध्यमाच्या एकुण ४१ शाळेतील सुमारे १  हजार ९२ विद्यार्थ्यां सात केंद्रावर घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी बसले होते.

ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्म भुषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थ्ये मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवं-नविन संकल्पना राबविण्यात येत असतात . संस्थेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतुन आणि कल्पक मार्गदर्शनाखाली आधुनिक उपक्रम  राबवुन या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ऊत्तमोत्तम मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली जाते.

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. प्रवेश पुर्व परिक्षेत उत्तम यश संपादन केल्याशिवाय, १२ वी विज्ञान परीक्षेनंतरच्या ऊच्च शिक्षणासाठी चांगल्या दर्जाच्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळत नाही. इंजिनिअरींग, ऍग्रीकल्चर,  फार्मसी, मेडिकल,आर्किटेक्चर  ईत्यादी अभ्यासक्रमास  प्रवेश घेण्यासाठी एमएचसीसीइटी ,नीट ,आयआयटी,जेईई  सारख्या परिक्षेत चांगले यश संपादन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी  लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्म भुषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थ्ये गेल्या वर्षी पासून ” प्रवरा सायन्स अकॅडेमी”ची स्थापना केली आहे. आज या अकॅडेमी मध्ये  अकरावी  आणि बारावी विज्ञान शाखेचे एकुण ३४४ विद्यार्थी मार्गदर्शन घेत आहेत.पूर्व परिक्षेचे यश हे प्रामुख्याने  विद्यार्थ्यांच्या गणित व  विज्ञान  या विषयाच्या नैपुण्यावर  अवलंबून असते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिक्षणाच्यावेळीच गणित विज्ञान या विषयात आवड निर्माण व्हावी, यासाठी सुरवातीला प्रायोगितक तत्वावर अकॅडेमीने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या पाच शाळेतआठवी  ,नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स सुरु केला आहे.आज या अकॅडेमी मध्ये  एकुण ४२६  विद्यार्थी  फाउंडेशन कोर्स द्वारे मार्गदर्शन घेत आहेत.

प्रवरा सायन्स अकॅडमी’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये  इयत्ता आठवी मधील वैभव धारपळे,कु.स्नेहा बडे,ओंकार मेहर,प्रबोध तांबे,सार्थक निमसे,वैभव गायकर,कु.समृद्धी खांडरे तर, इयत्ता नववीच्या अथर्व चौधरी,सोमेश हुलजुटे, अरविंद इथापे,कु. सायली गागरे आणि इयत्ता दहावी मधील कु. अक्षदा जाधव, कु. अनुराधा मुळे, युवराज पवार, हर्षवर्धन होन या विद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्य मिळविले. 

या विद्यार्थ्यांचे  संस्थेचे अध्यक्ष आ.राधाकृष्ण विखे पाटील, जि. प. अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, खासदार सुजय  विखे पाटील, महासंचालक डॉ यशवंत थोरात, प्रा. दिगंबर खर्डे, आणि सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

फोटो कॅप्शन:- प्रवरा सायन्स अकॅडमी’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेसाठी  सात केंद्रावर  परीक्षा देणारे विद्यार्थी.