कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कमवा व शिका विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक

आर्थिक परिस्थिती खडतर असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करतानाच सुरु केलेल्या “कमवा आणि शिका’ योजने द्वारे शिक्षण घेता येईल अशी कल्पना नसलेले हजारो युवक-युवती “कमवा आणि शिका ” योजनेतून शिक्षण घेऊन देश आणि जागतिक पातळीवर स्थावरझाले असून नुकत्याच पार पडलेल्या स्वयंसिद्धा यात्रेत लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या विविध वस्तूंची विक्री करून अर्थार्जन केल्याने विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असल्याची माहिती कृषी  शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांनी दिली.

उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक गरीब कुटुंबातील होतकरू मूले-मुलींना शिक्षण मिळाले पाटहजे या साठी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी  यासाठी या योजनेचा आणखी विस्तार करून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये ” कमवा आणि शिका “ही योजना आणखी प्रभावी पणे स्वबळावर सुरू केली.संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातही हि योजना   सन २००३ पासून कार्यान्वित आहे.  आज पर्यंत अनेकांनी या योजनेचा लाभ घेऊन शिक्षण पूर्ण केल्या नंतर  मोठ्या पदावर काम करण्याची मजल मारली आहे.

त्याच अनुषंगाने पंचायत समिती राहता आणि जनसेवा फाऊंडेशन लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी येथे पाच दिवसीय स्वयंसिद्ध यात्राचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध बचतगट, महाविद्यालयाच्या कमवा आणि शिका मधील विद्यार्थ्यांनी स्टॉल लावून आपल्या उत्पादनाचे सादरीकरण करण्यात आले यामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कागदी फुले व बुके बनवून त्याची विक्री केली तसेच महाविद्यालयातील शेती विभागाद्वारे उत्पादित पेरू, ढोबळी मिरची व पेरू रोपे यांची माहिती व विक्री केली.

विद्यार्थ्यांनी यावेळी मान्यवरांना माहिती पटवून दिली यामध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जि. परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील व कार्यकारी सहाय्यक सुश्मिता माने यांनी विद्यार्थ्यांचा स्टॉल बघून कौतुक केले. कार्यक्रमाच्या सांगता समारंभावेळी सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून विद्यार्थ्यांनी बनवलेले कागदी  बुके घेऊन इतर संस्थांना वापरण्याचे आव्हान करून प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन अभिनंदन केले.या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कृषी संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे यांनी अभिनंदन केले व या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना फार्म विभाग प्रमुख श्री.सुनील कानडे, प्रशांत आहेर तसेच कमवा आणि शिका समन्वयक प्रा. मनीषा आदिक यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो कॅप्शन :- कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातीळल ‘कमवा आणि शिका’योजनेतील  विद्यार्थ्यांनी वस्तु विक्रीतून केलेल्या कमाई या  उपक्रमाचे कौतुककरताना ना.सौ शालिनीताई विखे , सरपंच सौ. मनीषा आहेर, सौ. रुपाली लोंढे आणि मान्यवर