सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या १२२ व्‍या जयंतीचे औचित्‍य साधून परंपरेप्रमाणे देण्‍यात येणा-या राज्‍यस्‍तरीय साहित्‍य आणि कलगौरव पुरस्‍कारांचे वितरण राज्‍यपालांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले.

भारतीय संस्‍कृतीचा मुलभूत सिंध्‍दांतच हा त्‍यागाशी जोडला गेला आहे. ही संस्‍कृती सगळ्यांमध्‍ये एकता निर्माण करणारी आहे. येथील साहित्‍य आणि कलासुध्‍दा मानवाला एकत्रित ठेवून मजबुत करण्‍याचे काम करत असल्‍यामुळेच उद्याच्‍या काळात भारत देश बौध्‍दीक, अध्‍यात्मिक, वैज्ञानिक, आर्थिेक क्षेत्रात जगावर राज्‍य करेल असा अशावाद केरळचे राज्‍यपाल आरीफ महोमंद खान यांनी व्‍यक्‍त केला.

आपल्‍या भाषणात राज्‍यपाल आरीफ महोमंद खान म्‍हणाले की, समाजातील साहित्‍यीकांचा आणि कलाकारांचा होणारा सन्‍मान हे समाज जिवंत असल्‍याचे लक्षण असून, जे शेतक-यांशी जोडल्‍या गेलेल्‍या संघटनातून हा सत्‍कार होत असल्‍याने याचे महत्‍व अधिक असल्‍याचा गौरवपूर्ण उल्‍लेख करुन, त्‍यांनी सांगितले की, महाराष्‍ट्राच्‍या भूमिला संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकारांमाचा जसा अध्‍यात्मिक वारसा मिळाला तसाच छत्रपती शिवाजी महाराजांकडून स्‍वराज्‍याचीही कल्‍पना मिळाली. या संकल्‍पनेतूनच स्‍वातंत्र्यांच्‍या आंदोलनाची प्रेरणा मिळाली असल्‍याचे स्‍पष्‍ट करुन, त्‍यांनी सांगितले की, मी कोण आहे किंवा मी कुठून येतो यापेक्षाही भारतीय संस्‍कृतीचे मुळ शोधले पाहीजे ती खरी आपली चेतना आहे. घरामध्‍ये जशी आपण किमती वस्‍तु जपून ठेवतो तशीही संस्‍कृती मुल्‍य आणि आदर्शांच्‍या आधारावर आपल्‍याला जपावी लागणार आहे. हे आदर्शच उद्या चरितार्थाचा भाग बनणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या १२२ व्‍या जयंतीचे औचित्‍य साधून परंपरेप्रमाणे देण्‍यात येणा-या राज्‍यस्‍तरीय साहित्‍य आणि कलगौरव पुरस्‍कारांचे वितरण राज्‍यपालांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले. ९५ व्‍या अखिल भारतीय साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष भारत सासणे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झालेल्‍या या कार्यक्रमास बुलढाणा अर्बन बॅकेचे अध्‍यक्ष राजेश्‍यामजी चांडक, पुरस्‍कार निवड समितीचे अध्‍यक्ष जेष्‍ठ साहित्‍यीक डॉ.रावसाहेब कसबे, माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्‍यासह प्रवरा परिवाराचे सर्व संस्‍थाचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्‍यवरांनी सर्व पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या स्‍मृतीस्‍थळास अभिवादन करुन पुष्‍पचक्र अर्पन केले. लोकनेते खा.डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या स्‍मृतीस्‍थळासही पुष्‍पाजंली अर्पन करण्‍यात आली.

यंदाच्‍या वर्षी साहित्‍य जीवन गौरव पुरस्‍काराने किशोर बेडकीहाळ, रविंद्र इंगळे-चावरेकर, अभय गुलाबचंद कांता, मंगेश नारायण काळे, के.जी भालेराव, हिरालाल पगडाल यांना साहित्‍य पुरस्‍काराने तर दत्‍ता भगत आणि छबुबाई चव्‍हाण यांना कला गौरव पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. रोख रक्‍कम स्‍मृतीचिन्‍ह असे या पुरसकाराचे स्‍वरुप असून, पुरस्‍काराचे यंदाचे ही ३२ वर्ष आहे.

हजारो वर्षांपुर्वीचा हा संस्‍कृतीचा इतिहासरामायण, महाभारत, कुराण, बायबल या सर्वच ग्रंथामध्‍ये पाहायला मिळतो. याचाच अर्थ ही एक शब्‍दाची ताकद आहे. शब्‍दांच्‍या समुहानेच भावना अभिव्‍यक्‍त होतात. यातूनच मानसीक बळ आणि मानवी भावना अधिक सुदृढ करण्‍याचे काम भाषेच्‍या माध्‍यमातून झाले असल्‍याचे सांगतानाच साहित्‍यातून आदर्श मुल्‍य निर्माण होण्‍याची गरज व्‍यक्‍त करतानाच प्राकृतीक बदलाची निशानी ही साहित्‍य आणि कलेच्‍या माध्‍यमातून दिसते. या कलेचे अमृत साहित्‍यीकांनी आणि कलाकारांनी निर्माण करताना साहित्‍यातून नैतिकतेचा, समानतेचा आणि लोककल्‍याणाचा भाव निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करावा असे आवाहन त्‍यांनी शेवटी केले.

साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष भारत सासणे म्‍हणाले की, समाजाला भाषा किंवा अक्षरज्ञान अवगत झाले असले तरी, समाज एका निरक्षरतेकडे जात आहे का? अशी भिती व्‍यक्‍त करतानाच कला कधी विभक्‍त होत नाही, तिचे कधी विभाजन करता येत नाही. कला आणि साहित्‍यामध्‍ये विस्‍तृत असे समाजजीवन समाविष्ठ असल्‍यामुळे राजकारणात आणि समाजकारणात तिची व्‍यापकता आपल्‍याला पाहायला मिळते. सद्य परिस्थितीत विचारांची गर्दी वाढली असली तरी, केवळ फॉलोअर्स असून चालणार नाही तर विचावंताची आवश्‍यकता असल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन सांगितले.

जीवन गौरव पुरस्‍कार प्राप्‍त किशोर बेडकीहाळ सत्‍काराला उत्‍तर देताना म्‍हणाले की, या मिळालेल्‍या पुरस्‍कारापर्यंत पोहोचण्‍यासाठी अनेकांच्‍या हाताची मदत झाली. हा पुरस्‍कार त्‍यांनी दिवंगत पत्‍नी आणि डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना समर्पित करीत असल्‍याचे सांगताच, पद्मश्रींच्‍या नावाने मिळणारा हा पुरस्‍कार मोठा आहे. कारण पद्मश्रींनी जो विचार दिला तो शोषणमुक्‍त समाज निर्मितीचा होता. समग्र समाज जीवनाच्‍या आर्थिक आणि सांस्‍कृतीक वातावरणातून समाज ताठमानेने उभा राहावा हा सहकार चळवळीचा विचार होता असे त्‍यांनी आपल्‍या मनोगतात सांगितले.

खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्‍वागत आणि प्रास्‍ताविकातून या साहित्‍य पुरस्‍कारांची ३२ वर्षांपासुनची सुरु असलेली परंपरा प्रवरा परिवाराने जोपासली आहे. साहित्‍यीक आणि कलाकारांचा या पुरस्‍काराने सन्‍मान करण्‍याची मिळणारी संधी हा आमचा गौरव असल्‍याचे ते म्‍हणाले. प्रवरा परिवाराच्‍या वतीने सर्व मान्‍यवरांचा सन्‍मान करण्‍यात आला. या कार्यक्रमास जिल्‍ह्यातून विविध संस्‍थाचे पदाधिकारी, साहित्‍यप्रेमी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

शिक्षणाबरोबरच व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची गरज – भारत सासणे

शिक्षणा सोबतच विवेकी विचार निर्भयता आणि व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची आवश्यकता असल्याचे मत ९५व्या अखिल भारतीय मराठी साहीत्य संम्मेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी केले.

 प्रवरा औद्योगिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक समूह आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्याच्या  पारितोषिक वितरण कार्यक्रमात भारत सासणे बोलत होते. संस्थेचे सहसचिव  भारत घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास विखे पाटील कारखान्याचे कार्यकारी संचालक अभिजित भागडे, कार्यालय अधिक्षक मधुकर चौधरी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, प्राचार्य डाॅ.प्रदिप दिघे,प्रा. नंदु दळे, डॉ. अण्णासाहेब तांबे आदी उपस्थित होते. 

आपल्या मार्गदर्शनात भारत सासणे म्हणाले आजची तरुण पिढी ही स्वप्न बघणारी आणि स्वनपुर्ती करण्यासाठी कायम सक्षम असलेली पिढी आहे. विद्यार्थीनी कला, संस्कृती, वाचन चिंतन करतांना त्यावर विचारमंथन केले पाहीजे आभासी, चांगुळ पणा, उत्तम विचार, आनंदी जीवन यांचा समतोल  आयुष्यासाठी गरजेचा आहे.मूल्यव्यवस्था आणि व्यक्तीमत्व आणि आव्हाने मोठी असली तरी यातील संधी शोधण्याची गरज आहे. सत्यचा आवाज हा कायम ठेवतांना  निर्भयता, विवेकी विचार, व्यासंगवृत्ती जीवनाचा पाया असल्याचे  सासणे यांनी सांगून विद्यार्थी हा साधक असला पाहीजे. शालेय ज्ञानाबरोबरचे ग्रंथ संपदा वाचन यांतून आपली आपले ध्येय साथ करतांना सर्व साहित्याचे वाचन करावे जगात पोहण्यासाठी आणि जागतिकरणाच

भूत डोक्यात न ठेवता त्यास आव्हान न मानता ज्ञानाची साधना, नवीन रस्ते आणि उपलब्ध ज्ञान यातून आपण कसे प्रबळ होत राहू याचे प्रयत्न प्रवरा शैक्षणिक संस्थेतून होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरु

लोकनेते पद्‌मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषि महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरु झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. कृषी शिक्षणाची आवड असणारे परंतु वंचित राहिलेले, दहावी, बारावी पास किंवा नापास विद्यार्थी तसेच शेतीची आवड असणारे तरुण शेतकरी आणि ग्रामीण युवकांना, नोकरी करत असलेले परंतू कृषी शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्यांना कृषि पदविकेनंतरही मराठी भाषेतून कृषि शिक्षणांतून करिअर करता यावे या उद्देशाने संस्थेने हे अभ्यासक्रम सुरू केले असल्याचे विखे पाटील म्हणाले.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. सदर मुक्त कृषि शिक्षण केंद्रामार्फत माळी प्रशिक्षण, कृषि अधिष्ठान, उद्यानविद्या पदविका, कृषि पत्रकारिता, कृषि व्यवसाय व्यवस्थापन, फळबागा उत्पादन, भाजीपाला उत्पादन व फुलशेती पदविका इ. कृषिविषयक अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असून कृषि महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापक, तसेच कृषि शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा, प्रयोगशाळा, प्रात्यक्षिकांसाठी १०० एकर क्षेत्रावरील क्षेञ, प्रत्यक्ष कार्यानुभवासाठी कृषि आधारित विविध प्रकल्प, डिजिटल क्लासरुम इ. सुविधा मुक्त कृषि शिक्षण केंद्रामार्फत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असल्याची माहीती संचालिका डॉ. शुभांगी साळोखे यांनी सांगितले.

मुक्त कृषि शिक्षण केंद्रामार्फत कृषी क्षेत्रात आपले करिअर पुर्ण करण्याची ही संधी असून यासाठीची कृषि शिक्षणक्रम प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रवेश प्रक्रियेसाठी दि. ३० जून पर्यंत मुक्त विद्यापीठाच्या https://ycmou.ac.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करत असतांना अभ्यास केंद्र संकेतांक क्रमांक ५१२१९ यांवर नोंदणी करावी. प्रवेशासाठी तसेच अधिक माहीतीसाठी प्रा. आर. ए. दसपुते यांच्याशी ८६६८५२६५४९ या संपर्क क्रमांकावरती संपर्क करावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

केंद्र सरकारची २१ सैनिकी शाळांना मान्यता नगर मधील विखे पाटील शाळेचा समावेश

देशभरात २१ नव्या सैनिकी शाळा सुरू करण्यास संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यात राज्याच्या नगर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. विखे पाटील सैनिकी शाळा या एकमेव शाळेचा समावेश आहे. या नव्या सैनिकी शाळांमधील प्रवेशप्रक्रिया मे महिन्यापासून सुरू होणार असून, पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०२२-२३) या शाळा सुरू होणार आहेत.
केंद्रातर्फे देशभरात १०० नवीन सैनिकी शाळा स्थापन करण्यात येत आहेत. स्वयंसेवी संस्था, खासगी संस्था, राज्य सरकारांसोबत भागीदारी तत्त्वावर या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. त्या अंतर्गत २१ नव्या शाळांना मान्यता देण्यात आली आहे. सध्याच्या सैनिकी शाळा निवासी प्रकारच्या आहेत; परंतु २१ शाळांपैकी सात शाळा दिवसभराच्या असतील, तर १४ शाळा निवासी असतील.  प्रवेश प्रक्रिया सहाव्या इयत्तेपासून सुरू होईल. त्याचे वेळापत्रक www.sainikschool.ncog.gov. in या पोर्टलवर पाहता येईल.
अशी असेल प्रवेशप्रक्रिया
‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांसाठी सहाव्या इयत्तेत ४० टक्के जागा असतील. त्याच शाळेत आधी शिकत असलेल्यांसाठी ६० टक्के जागा ठेवल्या जातील. मात्र, त्यांना पात्रता चाचणी द्यावी लागेल. अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्याथ्र्यांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवर शाळेच्या अर्ज प्रक्रियेविषयी माहिती दिली जाईल. जे पात्र विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या शाळेत प्रवेश घेण्यास उत्सुक असतील, त्यांना ई-समुपदेशनासाठी www.sainikschool. ncog.gov.in येथे नोंदणी करावी लागेल.—

बॅटरी चलीत दुचाकी आणि ऑनलाईन बँकीगद्वारे चालविण्यात येणारे सॅनिटरी नॅपकीन मशीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत आणि स्टार्ट अप इंडीयाच्या माध्यमातून  देशात संशोधनाला गती मिळत आहे. बदलती शिक्षण पद्धतीचा स्विकार प्रवरेत नेहमीचं होत असतो म्हणूनचं अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली बॅटरी चलीत दुचाकी आणि ऑनलाईन बँकीगद्वारे  चालविण्यात येणारे  सॅनिटरी नॅपकीन मशीन हे महत्वपूर्ण आहे. त्यांचे पेटंट मिळविण्यासाठी आता प्रयत्न करावे असे प्रतिपादन जेष्ठ नेते आणि लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. लोणी येथील प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने,इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन चे विभाग प्रमुख डॉ. संजय कुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली नयन घोरपडे, अनुराधा भुसे, श्रृती आहेर यांनी  अल्प खर्चाचे ॲटोमॅटीक आणि मोबाईल बँकीगद्वारे चालणारे सॅनिटरी नॅपकीन मशीन तयार केले. यासाठी त्यांना ११ ते १२ हजार रुपये खर्च आला असून याद्वारे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी यांचा मोठा फायदा होणार आहे. यासाठी त्यांना डॉ. संदीप आहेर, प्रा. ए. एम. अन्सारी यांचे मार्गदर्शन लाभले   सध्या सर्वञ ई बाईकची धूम सुरु आहे त्यास सरकार देखिल प्रोत्साहन देप आहे. येथील प्राध्यपक डाॅ. संजय कुरकुटे यांनी जुन्यातून नवं काहीतरी हीसंकल्पना घेऊन बॅटरी चलीत दुचाकी तयार केली केवळ ४० ते ४५ हजार रुपये खर्च करून  खास शेतक-यासाठी चारा वाहतूक, दुध वाहतूक यासाठी ही गाडी महत्वपूर्ण ठरत आहे. बॅटरीद्वारे ही गाडी १०० किलो मीटर चालते. शिवाय ध्वनी आणि वायू प्रदुषण दखिल होत  नाही. यामध्ये अजूनही नवनवीन प्रयोग डॉ. कुरकुटे करणार  आहेत.  या संशोधनाची माहीती संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाणून घेत असतांनाच  विद्यार्थी आणि  शिक्षकांचे कौतुक करत येणा-या काळात हीच शिक्षणपद्धती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित आहे. या शिक्षण धोरणामुळे देशात रोजगार निर्मितीबरोबरचं आत्मनिर्भर भारत उभा राहणार आहे. संस्थेच्या माध्यमातून यांचे पेटंट मिळविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेली उपकरणे आपल्या  संस्थेत कशाप्रकारे वापर करता येईल यावर भर देण्याची सुचना करतांनाच संशोधन कार्यासाठी संस्था आपल्या बरोबर राहील असेही सांगितले. 

१९१ विद्यार्थ्यांची इंडिगो व एजिल एअरलाईन्समध्ये निवड

लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटीलप्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्हूमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेतील एकूण ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या ४०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती महाविद्यालयामध्ये इंडिगो एअरलाईन्सचे रिजनल मॅनेजर  विठ्ठल लबडे,  एजिल एअरलाईन्समुंबईचे मॅनेजर  आशिष अब्रहम, शिर्डी विमानतळ,  असि. एच. आर. बेंगलोर अरुणकुमार आणि रिजनल मॅनेजर,   हैद्राबाद कुमारसाहेब यांनी घेतल्या. या मुलाखातीमधून १९१ विद्यार्थ्यांची विमानतळावर बसचालक, लोडर व कार्यालयीन कर्मचारी म्हणून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली. पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली विविध नामांकित कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्हू आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून  इंडिगो एअरलाईन्स व एजिल एअरलाईन्स या हवाई वाहतूक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नामांकित कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्हूचे आयोजन केले होते. या मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद नोंदवला. सुरवातीला सर्व सहभागी विद्यार्थ्यांना कंपनीच्या अधिकाऱ्यानी मार्गदर्शन केले.  या विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल  संस्थेचे अध्यक्ष आ. राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व संस्थेच्या सर्व  संचालकांनी आणि पदाधिकार्यांनी अभिनंदन केले.   

आ.विखेना फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कर प्रदान

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भाजप नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापनदिनाच्या जेष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले.

आ.राधाकृष्ण विखे पाटील लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे चेअरमन आहेत.गेली अनेक वर्षे सहकार चळवळीत काम करताना सामाजिक दायित्व म्हणून त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून पुणे विद्यापीठाने आ.विखे पाटील यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्याचा निर्णय घेतला.कुलगुरू डॉ नितीन करमरकर यांनी या पुरस्काराबद्दल दूरध्वनीवरून आ.विखे यांना माहीती दिली.

पुणे विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी स्थापना दिवसाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील व्यक्तीना जीवनसाधना आणि युवा पुरस्कार देवून गौरविण्यात येते. शैक्षणिक क्षेत्रात गुणात्मक कार्य करणार्या संस्थाना सुध्दा दरवर्षी सन्मानित करण्यात येत असते.यंदाच्या ७३ व्या स्थापना दिवसानिमिताने पुणे येथे झालेल्या या सन्मान सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे कुलगुरू डॉ नितीन करमळकर प्र कुलगुरू डॉ एम.एस.उमराणी कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आ.विखे पाटील यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.मानपत्र स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.मानपत्राचे वाचन सिनेट सदस्य राजेश पांडे यांनी केले.
या पुरस्कार सोहळ्यास विखे पाटील कुटूबियांसह प्रवरा परीवारातील सर्व संस्थाचे पदाधिकारी संचालक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापन केलेल्या आणि पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील वटवृक्ष केलेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आ.विखे पाटील अनेक शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत.याचा मोठा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झाला.हजारो विद्यार्थी या शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत असून दिडलाख माजी विद्यार्थी देशात आणि परदेशात विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असून यासर्व माजी विद्यार्थ्याचे संघटन आ.विखे पाटील यांनी केले आहे.

प्रामुख्याने कोव्हीड संकटात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यामातून पद्मश्री डॉ विखे पाटील महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या कोव्हीड सेंटरचा मोठा उपयोग रुग्णांना झाला.मोफत उपचार आणि सुविधा आ.विखे यांनी उपलब्ध करून दिल्याने सामान्य नागरीकांचे कोट्यावधी रुपये वाचले.मराठा आरक्षणाच्या निर्माण झालेल्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेतला.याचाही लाभ नव्याने प्रवेश घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्याना झाला.

नगर जिल्ह्य़ातील आत्महत्याग्रस्त २०८ शेतकरी कुटुंबियांना दतक घेवून विखे पाटील परीवाराने या शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतानाच या कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करण्याचे दायित्व स्विकारले आहे.

आ.विखे पाटील यांनी राजकारणा पलीकडे जावून केलेल्या या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेवून पुणे विद्यापीठाने यंदाच्या वर्षी जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय केला.

पुरस्कार कोव्हीड योध्दयांना समर्पित

आपल्या पुरस्काराबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना आ.विखे पाटील म्हणाले की पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे आणि आदरणीय खासदार साहेबांनी घालून दिलेल्या मार्गावरुनच ग्रामीण भागात काम करीत राहीलो.या कामात कुटूबियांनी साथ दिली.कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहीले.शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनता सतत पाठबळ देते म्हणूनच काम करताना आत्मविश्वास मिळतो.त्यामुळेच हा पुरस्कार जनता, सर्व कार्यकर्ते,आणि जीवावर उदार होवून कोव्हीड संकटात समाजाची सेवा करणार्या कोव्हीड योध्दयांना हा पुरस्कार मी समर्पित करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

प्रवरेतील खेळाडूची कामगिरी ही दिशादर्शक आहे

प्रवरेतील खेळाडूची कामगिरी ही दिशादर्शक आहे. प्रवरा शैक्षणिक संकुल हे शिक्षक क्षेत्राबरोबरचं क्रिडा क्षेत्रात देखिल आघाडीवर आहे असे प्रतिपादन लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.    लोणी येथील पद्मश्री डॉ. विखे पाटील महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु.स्वप्नाली भानुदास शिंदे यांची आसाम रायफल तायक्वांदो स्पर्धेत खेळाडू तसेच राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवड झाली. याबद्दल माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.   ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षणासोबतचं क्रिडा क्षेत्रासाठी सेवा सुविधा दिल्याने आज प्रवरेतून चांगले खेळाडू निर्माण होत आहे यांचा मोठा आनंद आहे असे माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.यापुढे ही शिक्षणांसोबत खेळाडूना प्रोत्साहन संस्थेच्या माध्यमातून दिले जाईल असेही सांगितले केले.

लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयास सलग तिस-या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्रदान


लोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय  पुरस्कार पुणे येथे जेष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर यांच्या हस्ते संस्थेच्या विश्वस्त सौ.शालिनीताई विखे यांना  प्रदान  करण्यात आला. या महाविद्यालयाने सलग तिसऱ्या वर्षी हा पुरस्कार मिळविला आहे.
साविञीबाई फुले पुणे विद्यापीठांच्या प्रांगणात विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापनदिनी झालेल्या कार्यक्रमात विविध संस्था आणि व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. विखे महाविद्यालयाचा पुरस्कार संस्थेच्या विश्वस्त आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्यासह संचालक किशोर नावंदर, सौ.रोहीणी निघुते, सौ.अलका दिघे, प्राचार्य प्रदीप दिघे, प्राचार्य महेश खर्डे, प्रा.दत्‍तात्रय थोरात, डॉ.रामदास बोरसे, डॉ अनिल वाबळे, प्रा.भाउसाहेब रणपिसे यांनी हा पुरस्कार स्विकारला.प्रदान केला. 
१९७१ साली १०२ मुले व ८ मुलींना प्रवेश देऊन लोणीसारख्या खेडेगावात उच्च शिक्षणाची  सुविधा निर्माण केलेल्या या महाविद्यालयाने आपल्या पाच दशकांच्या कालखंडात परिपूर्ण शैक्षणिक सुविधा आणि वृक्षराजीने नटलेला ५१ एकरांचा विस्तीर्ण परिसर एखाद्या छोटेखानी विद्यापीठास शोभेल असाच निर्माण केला झाला आहे. तीन हजारांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त मुलींची संख्या आणि यापूर्वी तीनदा नॅककडून  A ग्रेड मानांकन प्राप्त केलेल्या या महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा तिस-यादा उत्कृष्ट महविद्यालयास हा पुरस्कार मिळाला आहे असे प्राचार्य डॉ.प्रदिप दिघे यांनी सांगितले.
शेतक-यांच्या, शेतमजुरांच्या  मुला–मुलींसाठी उच्च शिक्षणाची सुविधा घराजवळ निर्माण करताना इंग्रजी, विज्ञान व गणित असे विषय घेऊन आपल्या जीवनात स्व:ताच्या पायावर उभे राहिले पाहिजे असा आग्रह धरणारे पद्मश्री विखे पाटील यांनी आर्थिक आडचण हा शिक्षणातील अडसर ठरू नये यासाठी सुरुवातीपासूनच कमवा व शिका योजना सुरू करून आतापर्यंत दहा हजारांच्या वर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी निर्माण करून दिली आहे. 
कला, विज्ञान व वाणिज्य असे शिक्षण देणा- या महाविद्यालयामध्ये पदवी स्तरावर १९ आणि पदव्युत्तर स्तरावर २१ विषय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. याशिवाय रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र, भौतिकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, वाणिज्य , अर्थशास्त्र आणि मराठी  असे आठ संशोधन केंद्र कार्यरत आहेत. याबरोबरच करियर ओरिएंटेड कोर्सची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच कालसुसंगत अभ्यासक्रम सुरु करून विद्यार्थ्याना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात सामील करुन घेण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न निश्चितच गौरवास्पद आहे.
नैसर्गिक प्रकाशयुक्त वास्तूंचा उत्कृष्ट नमुना असलेली ग्रंथालयाची इमारत आपले लक्ष वेधल्याशिवाय राहत नाही. महाविद्यालयात प्लेसमेंटचा उपक्रम मोठ्या आस्थेने राबविला जात असून ; आजपर्यन्त हजारो विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी त्यातून मिळाल्या आहेत. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे राहाता कामा नये म्हणून महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले असून अनेक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. 
   महाविद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  आ. राधाकृष्ण विखे पाटील,  जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई  विखे पाटील, माजीमंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, खा. डॉ.सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे, सहशिक्षण संचालक नंदकुमार दळे आदींनी अभिनंदन केले आहे.

प्रवराच्या डी फार्मसीचा मेडमार्ट फार्म कंपनी सोबत सामंजस्य करार

लोकनेते  पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म मोहु चिंचोली तालुका सिन्नर व मेडमार्ट फार्मा प्रायव्हेट लिमिटेड विरार ठाणे यांचे दरम्यान नुकताच सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. विजय तांबे यांनी दिली.           फार्मसी शिक्षणामध्ये औषध कंपन्या आणि महाविद्यालय यामध्ये विविध स्तरांवर जसे विद्यार्थी प्रशिक्षण,  इंडस्ट्रीयल  भेटी,  नवीन औषधी संशोधन, औषध विकसित करणे, विद्यार्थ्यांना नोकरी मध्ये सामावून घेणे आदी विषयांची या करारामध्ये नोंद केली जाते. प्रवरा डी फार्मसी च्या वतीने या अगोदर २२ कंपन्यांबरोबर सामंजस्य करार केले आहेत. मेडमार्ट फार्म यांच्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये विभागीय मार्केटिंग शाखा कार्यरत आहेत. मेडमार्ट फार्म कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश शेळके यावेळी म्हणाले की, आम्हाला अधिक चांगल्या प्रकारचे ज्ञान असलेले होतकरू विद्यार्थी मिळणे ही काळाची गरज बनलेली आहे. आम्ही या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे,  त्यांच्यासाठी व्याख्याने आयोजित करणे, नोकरीच्या संधी उपलब्ध करणे, एकंदरीत महाविद्यालयीन शिक्षणाची गुणवत्ता वाढ होणे याकामी मदत करणार आहे. यावेळी मेडमार्ट फार्मचे प्रतिनिधी  मार्केटिंग मॅनेजर  संदीप चकोर, ट्रेनिंग विभाग प्रमुख श्री. रवींद्र माने, आस्थापना प्रमुख. शरद गिते,  जायभाये,  अशोक शेळके,  महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. योगेश ठोंबरे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाकडून गुणवत्तावाढीसाठी नेहमी प्रयत्न केले जात आहेत. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील,  खा. डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ सहसचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक सौ.लिलावती सरोदे आदींनी अभिनंदन केले.

प्रवरा ग्रामीण औषधीनिर्माणशास्त्र महाविद्यालय व कायटेल टेकनॉलॉजि प्रा.ली. मध्ये सामंजस्य करार

लोकनेते पद्मभूषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण औषधीनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि कायटेल टेकनॉलॉजि प्रा.ली. मध्ये सामंजस्य करार झाल्याची माहिती महाविद्यालचे प्रचार्य डाॅ.संजय भवर यांनी दिली.    या सामंजस्य कराराचा फायदा ग्रामीण भागातील मुलांना व्हावा आणि त्यांना नवीन औषधे मार्केट मध्ये येण्यापूर्वी ती मनुष्य वापरासाठी कशी गुणकारी व सुरक्षित आहेत याचा अभ्यास व्हावा या साठी हा समंजस्या करार फायद्याचा ठरणार आहे. तसेच आजच्या या कोरोना कालावधी मध्ये विद्यार्थ्यांना औषधे गुणवत्ता सुधारणा बद्द्ल प्रक्षिक्षण मिळावे  या उद्देशाने हा सामंजस्य करार करत असल्याचे  कायटेल टेकनॉलॉजि प्रा.ली.चे मुख्य कार्यकारी अधिकारी  पियुष राजपूत यांनी सांगितले.  या सामंजस्य करारानुसार महाविद्यालय व कायटेल टेकनॉलॉजि प्रा.ली. या मध्ये विविध विद्यार्थी गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम होणार असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. या मध्ये प्रामुख्याने नवीन औषधांवरील संशोधन, मानवीय औषधी चाचणी,  त्यांची सुरक्षतता तपासणी प्रशिक्षण आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत . प्रवरा औषधीनिर्मानशास्त्र महाविद्यालयात असे विविध सामंजस्या करार करण्यात आले असून सध्य परिस्थिती मध्ये औषध कंपनी मध्ये चालणाऱ्या विविध नवनवीन तंत्रज्ञानाचा शिक्षक- विद्यार्थ्यांना या मार्फत मोफत मिळत आहे. महाविद्यालयातील ट्रेनिंग आणि प्लेसमेंट चे प्रमुख प्रा.सोमेश्वर मनकर यांनी हा सामंजस्य करार करण्यात विशेष परिश्रम घेतले.   महाविद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंञी आ.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,खा.डाॅ.सुजय विखे पाटील,संस्थेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,सहसचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक सौ.लिलावती सरोदे आदींनी अभिनंदन केले आहे

कॉलेज ऑफ फार्मसीचे डाॅ.विजय तांबे यांना भारत सरकार कडून पेटंट

लोकनेते पद्मभुषणबाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म मोहु चिंचोली( ता. सिन्नर) या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय तांबे यांचेकडून भारत सरकार कडे डिझाईन पेटंट नोंदणी झाली होती यांस सरकारकडून पेटंट मिळाला आहे, याविषयी अधिक माहिती देताना डॉ. तांबे यांनी सांगितले की, वेगवेगळ्या संशोधन कार्यामधील नाविन्यपूर्ण गोष्टींचा समावेश पेटंट नोंदणी करून भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयमार्फत अधिकृत केला जातो. आम्ही संशोधक सहकाऱ्यांच्या मदतीने ‘ऑटोमॅटिक मेडिसिन डोसेज अपलाईंग डिवाइस विथ कंट्रोल्ड हेल्थ मॉनिटरिंग’ यासाठी डिझाईन केलेले उपकरण पेटंट नोंदणीसाठी दिले होते त्याची अधिकृत नोंद पेटंट जनरल मध्ये झाली. महाविद्यालयाकडून संशोधन कामासाठी नेहमी सुविधा पुरविल्या जातात व इतर आवश्यक मदत दिली जाते. सदर पेटंट मिळणे ही महाविद्यालयासाठी व संस्थेसाठी गौरवाची बाब आहे. असे मत संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुश्मिता विखे यांनी व्यक्त करतांनाच डाॅ.तांबे यांचे अभिनंदन केले आहे.
डॉ. तांबे यांचे यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे शिक्षण संचालक सौ.लिलावती सरोदे यांनी अभिनंदन केले.