कोल्हारच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार मध्ये मैदानी स्पर्धा उत्साहात संपन्न

लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी  प्राध्यापक सिताराम वरखड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते  मागील दोन वर्षापासून करोना परिस्थिती मुळे विद्यार्थी खेळापासून वंचित राहिलेले होते . विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल इंटरनेट टीव्ही या सारख्या साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि त्याचा एकूण परिणाम विद्यार्थ्यांच्या शरीरावर मनावर जाणवत होता. या सर्व बाबी मधून सुटका करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मैदानावर आणणे अतिशय गरजेचे होते. या मैदानी स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी 100 मीटर ,200 मीटर धावणे ,400 मीटर धावणे 100 मीटर , 4 रिले स्पर्धा उंच उडी लांब उडी क्रीडा प्रकारामध्ये आपले नैपुण्य दाखवले . विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक वरखड म्हणाले विद्यार्थ्यांची शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती उत्तम राहण्यास मदत होते विद्यार्थ्यांच्या शरीरावर डोळ्यांवर मनांवर होणाऱ्या परिणामांपासून केवळ खेळच मुक्तता देऊ शकतो . खेळ आपणास व्यक्तिमत्त्व विकासामध्ये कष्ट करण्याची वृत्ती इत्यादी गुण निर्माण करण्यास मदत करतो . स्पर्धेची सुरुवात कोल्हार भगवतीपुर येथील भगवती मातेच्या मंदिराजवळ क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आली  . स्पर्धेचे सूत्रसंचालन तन्वी कडू आणि आणि श्रावणी थेटे यांनी केले तर पाहुण्यांची ओळख गुण राका हिने करून दिली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य  सुधीर मोरे यांनी केले .तर निशा मुथा हिने सर्वांचे आभार मानले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे क्रीडाशिक्षक कबीर शेख , ए.सी. कडू   अमोल म्हस्के , सुरेश जाटे  संदीप आहेर इत्यादी परिश्रम घेतले.

प्रवरेच्या कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून ममदापुर येथे द्राक्ष पिकांवर चर्चसत्र संपन्न

लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून ममदापुर ता राहाता येथे नुकतेच द्राक्ष पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन या विषयावरती  चर्चासत्रास उत्पादकांनी मोठा प्रतिसाद दिला अशी माहिती प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी दिली .  या चर्चासत्रास  प्रगतशील शेतकरी  सुभाष गडगे , बायर क्रॉप सायन्स चे विभागीय विक्री व्यवस्थापक  राहूल पाटील,  तंत्र अधिकारी  शुभम कडलग प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.  आपल्या मार्गदर्शनात  गडगे म्हणाले शेतकऱ्यांना  द्राक्ष पिकास आवश्यक असलेली जमीन,हवामान, पाणी ,खते व  विक्री व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले.तर राहुल पाटील यांनी द्राक्ष पिकाच्या कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.  चर्चासत्रास ममदापुर परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी श्री अनिल उंडे, दत्तात्रय म्हसे, अजय टिळेकर, संपत उंडे, एकनाथ जवरे, इरफान पटेल, अविनाश म्हसे, भाऊसाहेब गोरे आदी  हजर होते. सदर चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे , विस्तार विभाग प्रमुख प्रा. रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम वर्षातील विद्यार्थी अंकीत उंडे,ऋषिकेश पाटील, संकेत काळे, कुंजन गिरी, उदय निंबाळकर, तनोज कडू, तेजस तांबे, आकाश दिघे,ऋषिकेश चव्हाणके, गौरी भोंडे, मुग्धा सावंत,अक्षता भांगे,जान्हवी शिंदे, अमृता घोलप आदींनी प्रयत्न केले

प्रवरा शैक्षणिक संकुलात ३ हजार २२४ विद्यार्थ्याना लसीकरण

लोकनेते पद्यभुषण डॉ .बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालया अंतर्गत ३ हजार २२४ विद्यार्थ्याचे लसीकरण पूर्ण झाले आहे.   देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी १५ वर्षापुढील विद्यार्थ्यांना  कोव्हीडची लस देण्याचा निर्णय घेतला.  १ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरण देखिल सुरू झाले. माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकनेते पद्‌मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण व्हावे यासाठी स्वता: कोव्हीड पॉझिटिव्ह असतांना देखिल आरोग्य यंत्रणा, शासकीय अधिकारी, संबंधीत प्राचार्य यांच्याशी  संपर्क साधून संस्थेच्या ४२ माध्यामिक आणि कनिष्ठ महाविद्यालययपैकी २० शाळा आणि महाविद्यालयातील ३ हजार २२४ विद्यार्थ्याना लसीकरण पुर्ण झाले आहे. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालकांना आव्हान केल्याने संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांनी लसीकरण अॅपवर नोंदणी करून मोठा प्रतिसाद देखिल दिला आहे. शाळा आणि स्थानिक स्कुल कमिटीव्दारे प्रत्येक विद्यार्थ्याचे शंभर टक्के लसिकरणांचे नियोजन आहे. मागील दोन दिवसात शाळा आणि महाविद्यालये राज्य सरकारने बंद केली असली तरी प्रवरेच्या शैक्षणिक संकुलामार्फत  १५ वर्षापुढील सर्व विद्यार्थीना लस देण्याचे नियोजन संबंधीत शाळांनी केले आहे. 

प्रवरेच्या कृषि महाविद्यालया मार्फत थेट बांधावर जावून शेतक-यांना मार्गदर्शन

शेती क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणि पिक व्यवस्थापन यांची माहीती शेतकऱ्यांना व्हावी या उद्देशाने प्रवरेच्या कृषि संलग्नित महाविद्यालयामार्फत शिर्डी मतदार संघात शेतकरी-शास्त्रज्ञ संवादातून थेट बांधावर जावून  कृषी विस्ताराचा सुरू केलेला जागर  कृषी क्षेत्रातील सर्वच घटकांना मार्गदर्शक ठरत आहे.
लोकनेते पद्‌मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी अंतर्गत जैव तंञज्ञान, कृषि  व्यवसाय व्यवस्थापन, कृषि महाविद्यालय , डेअरी सायन्स आदीचे शिक्षण दिले जाते. कृषि शिक्षासोबतचं विद्यार्थी, शेतकरी आणि कृषिपुरक व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना कृषि क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान, पिक व्यवस्थापन,  लागवड तंत्र, बाजारपेठ, प्रक्रिया उद्योग, प्रक्रिया  याविषयी प्रत्यक्ष बांधावर जावून परिसंवाद, शिवारफेरी, चर्चासत्रातून माहीती देण्याचा अनोखा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कार्यक्रम नियोजन, प्रत्यक्ष बांधावर शिक्षण तर शेतक-यांना थेट बांधावर माहीती आणि विविध योजनेद्वारे शेतीमध्ये नाविन्य पुर्ण माहीती मिळत आहे. यासाठी संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक लिलावती सरोदे ,प्राचार्य ऋषिकेश औताडे, प्राचार्य निलेश दळे, प्राचार्य रोहीत उबरकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थी आणि शेती क्षेञासाठी महत्वपूर्ण ठरत आहे.

एस.टी. व एस. सी. विद्यार्थांसाठी प्रवरा अभियांत्रिकीमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाच्या ऑल इंडिया कॉन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने एस.टी. व एस. सी. स्कील डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गत एस.टी. व एस. सी. विद्यार्थांसाठी व्यक्तिमत्व विकास  विविध कौशल्य  प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाले असल्याची माहिती योजनेचे नोडल ऑफिसर प्रा. अब्दुल हमीद अन्सारी यांनी दिली.

या प्रशिक्षणाअंतर्गत महाविद्यालयातील एस.टी. व एस. सी विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन स्कील, रिझ्युम रायटिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्याच्या मुलाखतीची तयारी, ग्रुप डिस्कशन व  ऍप्टिट्यूड  टेस्ट अश्या विविध प्रकारच्या गोष्टींचे कौशल्य प्राप्त करून देण्यात आले.त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त करण्याकरिता होणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या व्यक्तिमत्वविकास प्रशिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना नोकरी साठी मुलाखती देताना दयाव्या लागणाऱ्या चाळणी परीक्षेसाठी खूप चांगल्या प्रकारे होणार आहे.

हे प्रशिक्षण पुणे येथील  इम्पॅक्ट ट्रेनर्स  यांच्यामार्फत श्री. पंकज मित्तल तसेच नाशिक येथील  फ्लाय हाय अप्टिट्यूड् ट्रेनिंग सर्विसेस यांच्यामार्फत सी.ई.ओ. श्री. ओंकार जगदाळे व पूजा सनार यांनी दिले.  प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली.प्रा. निलेश कापसे, प्रा. लक्ष्मण लहामगे, प्रा. सचिन अनाप, प्रा. स्वप्निल बंगाळ, प्रा. दिबा आफ्रीन अन्सारी, प्रा. अर्चना पवार यांनी परिश्रम घेतले.यापूर्वीही अशापद्धतीचा पंधरा  दिवसांचा कोर्स सीयु-सकसिड संस्थेकडून सर्व विभागांच्या विभागप्रमुखांच्या साहाय्याने १६ ते २९ जानेवारी या कालाविधीत घेण्यात आला होता.

विद्यार्थ्‍यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्‍यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेत ई-लर्निंग सुविधा सुरु – संस्‍थेच्‍या प्रभारी मुख्‍य कार्यकारी आधिकारी सुस्मिता विखे पाटील यांची माहीती

‘कोरोना’ या संसर्गजन्‍य आजाराच्‍या या राष्‍ट्रीय संकटात विद्यार्थ्‍यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्‍यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेत ई-लर्निंग सुविधा सुरु करण्‍यात आली असुन, या माध्‍यमातुन शिक्षक आणि विद्यार्थ्‍यांच्‍या समन्‍वयासाठी व्‍हीडीओ कॉन्‍फरंसिंगव्‍दारे वर्गनिहाय चर्चा तसेच युट्युबव्‍दारे मार्गदर्शन सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. ग्रामीण भागातील या पहिल्‍या पथदर्शी प्रकल्‍पाची कार्यवाही, ठरवुन दिलेल्‍या वेळापत्रकानुसार शिक्षकांनी सुरु केली असल्‍याची माहीती संस्‍थेच्‍या प्रभारी मुख्‍य कार्यकारी आधिकारी सुस्मिता विखे पाटील यांनी दिली.

या संदर्भात माहीती देताना सुस्मिता विखे पाटील म्‍हणाल्‍या की, सुट्टीच्‍या या कालावधीत विद्यार्थ्‍यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्‍यासाठी संस्‍थेचे महासंचालक डॉ.यशवंतराव थोरात आणि अध्‍यक्ष आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली ई-लर्निंग सुविधेला प्राधान्‍य देण्‍यात आले असुन, विद्यार्थ्‍यांना त्‍यांचा अभ्‍यासक्रम ई-मेल, व्‍यु-ट्युब,व्हाट्सअप, इंस्‍टाग्राम आणि संस्‍थेच्‍या वेबसाईटच्‍या माध्‍यमातुन पोहचविण्‍याचा उपक्रम संस्‍थेने तातडीने सुरु केला आहे. वेळप्रसंगी बाभळेश्‍वर येथील कृषि विज्ञान केंद्राच्‍या कम्‍युनिटी रेडीओचीही मदत यासाठी घेण्‍यात येणार आहे. संस्‍थेने शिक्षक व विद्यार्थ्‍यांना वर्गनिहाय तयार करुन दिलेल्‍या वेळापत्रकाची अंमलबजावणी ई-लर्निंग या संकल्‍पनेतुन सुरु झाली असल्‍याचे त्‍यांनी याप्रसंगी नमुद केले.

शासनाच्‍या आदेशानुसार १४ मार्च २०२० पासुन संस्‍थेच्‍या अंतर्गत येणा-या सर्व शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्‍यांना संस्‍थेच्‍या स्‍कुल बस मधुन त्‍यांच्‍या घरी सोडण्‍यात आले आहे. फक्‍त इयत्‍ता १० आणि १२ वी च्‍या परिक्षा सुरु आहेत. या परिक्षेसाठी विद्यार्थ्‍यांना ‘कोरोना’ आजारापासुन सुरक्षित ठेवण्‍यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्या असल्‍याचे स्‍पष्‍ट करुन परिक्षा हॉल तसेच, महाविद्यालयीन परिसर औषध फवारणी करुन निर्जंतुंक करण्‍यासाठी रुग्‍णालयांच्‍या नियमानुसार अंमलबजावणी केल्‍याचे त्‍यांनी सांगितले. तांत्रिक महाविद्यालयांच्‍या तसेच इतर व्‍यवसायीक अभ्‍यासक्रमांच्‍या परिक्षांबाबत विद्यापीठ व शासनाकडुन येणा-या सुचनांचे पालन करण्‍यात येणार आहे. 

‘कोरोना’ या विषाणुचे संकट ही एक संधी मानुन संस्‍थेने ई-लर्निंगची सुरु केलेली सुविधा हा एक पथदर्शी प्रकल्‍प म्‍हणुन ग्रामीण भागात प्रथमच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने सुरु केला. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्‍यासाठी हा उपक्रम नवीन असला तरी भविष्‍यात याचे असलेले महत्‍व लक्षात घेवून ही ई-लर्निंग सुविधा घरबसल्‍या विद्यार्थ्‍यांना मिळणार असल्‍याने वर्क फॉर होम चे समाधान मिळेल असे सुस्मिता विखे पाटील यांनी सांगितले.

प्रत्येक घरात बीजमाता तयार व्हावी:- राहीबाई पोपरे

प्राप्त परिस्थिती मुळे शिक्षण घेता आले नाही, पण तुम्ही सर्व विद्यार्थी हे शिकलेले आहात, लिहता वाजता येत नसतानासुध्दा  मी  हे काम करू शकते तर, तुम्ही का नाही करू शकणार, तुमच्यातच एक राहीबाई तयार करा व आपल्या गावाचे, तालुक्याचे तसेच आपल्या परिवाराचे नाव लौकिक करा असे प्रतिपादन  बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.

लोणी येथे लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी महाविद्यालयात महिला दिनानिमित्त बिजमाता पद्मश्री सौ.राहीबाई पोपेरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या.याप्रसंगी कृषीभूषण सौ.सुजाता थेटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, प्राचार्य रोहित उंबरकर, प्राचार्य ऋषिकेश औताडे,प्राचार्य निलेश दळे,प्रा.मिनल शेळके, प्रा.अक्षया वाळुंज, प्रा.सारिका फरगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

एक सामान्य कुटुंबातील शेतकरी महिला राहीबाई यांनी आपल्या गावाचे नाव लौकिक केले, जसे त्यांच्या घरात औषधें व रासायनिकयुक्त फळे भाजीपाला खाल्याने आपल्या बालकांचे आरोग्य खराब होते त्यासाठी सेंद्रिय शेतीच हा पर्याय आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे राहीबाई पोपरे तसेच राहीबाई, यांच्या बियाणे बँकेचे आदीवासी परंपरेने जपलेल्या ५३ पिकांचे ११४ गावरान वाण आहेत. त्यामुळे त्यांच्या बियाणे बँकेत नक्कीच भेट द्या असे आवाहन  सौ.सुजाता थटे यांनी विद्यार्थ्यांना केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सायली इंगळे यांनी व्यक्त केले.

फोटो कॅप्शन :- लोणी येथे  कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी महाविद्यालयात महिला दिनानिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना पद्मश्री सौ.राहीबाई पोपेरेदिसत असून समवेत कृषीभूषण सौ.सुजाता थेटे पाटील,कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, प्राचार्य रोहित उंबरकर, प्राचार्य ऋषिकेश औताडे,प्राचार्य निलेश दळे,प्रा.मिनल शेळके, प्रा.अक्षया वाळुंज, प्रा.सारिका फरगडे आदी.

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीत निवड.

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकत्याच घेण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह मधून मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या पाच विद्यार्थ्यांची पुणे येथील फ्लॅश विवेन मशनिंग टेक्नॉलॉजीज कंपनीने  तर, कु. ऋतुजा खर्डे हीची प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड या  नामांकित बहुराष्ट्रीय  कंपन्यामध्ये ४ लाखांचे वार्षिक पगाराचे पॅकेज देऊन नोकऱ्या उपलब्ध झाल्याची प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.

या मध्ये  मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या प्रद्युम्न घोरपडे, योगेश गोर्डे, निखिल मालुंजकार, अजिंक्य देशमुख व ऋषिकेश वाघचौरे या विद्यार्थ्यांची फ्लॅश विवेन मशनिंग टेक्नॉलॉजीज पुणे तर ऋतुजा खर्डे हीची प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे या बहुराष्ट्रीय नामांकित कंपन्यामध्ये निवड झाली आहे. औद्योगिकस्तरावर मंदीचे सावंत असतानाही,केमिकल इंजिनीरिंग क्षेत्रात देशात प्रसिद्ध व नावलौकिक असलेल्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागातील विद्यार्थ्यांची झालेली निवड ही महत्वाची असल्याचे सांगताना स्किल डेव्हलपमेंट आणि प्लेसमेंट विभागाचे संचालक प्रा. धनंजय आहेर म्हणाले की,महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक उपक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम आणि जलदगतीने तंत्रज्ञात होणाऱ्या बदलांची माहितीचे ज्ञान विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या मुळे या कंपन्यांनी अंतिम परीक्षा देण्यापूर्वीच चांगले पॅकेज देऊन नोकरीसाठी निवड केल्याचे ते म्हणाले.

प्लेसमेंटचे विभागाचे प्रमुख  डॉ. आण्णासाहेब वराडे म्हणाले की, महाविद्यालयातील  ज्यास्तीज्यास्त विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात अनेक नामांकित कंपन्याबरोबर करार केले असून विविध विभागातील विद्यार्थ्यांना नामांकित  कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळत या मुलाखतीसाठी प्रा. राजेंद्र निबाळकर ,प्रा. रविंद्र पारखे, प्रा. राजेंद्र शिंदे यांचे सहकार्य  लाभले.

विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा  सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजयविखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात,सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील,  शिक्षण संचालक डॉ. के टी व्ही रेड्डी,डॉ. हरिभाऊ आहेर,विभागप्रमुख प्रा. राजेंद्र खर्डे, ,सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.

फोटो कॅप्शन :- प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकत्याच घेण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह मधून मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागातील निकऱ्या प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने, ट्रेनिंग प्लेसमेंटचे संचालक प्रा. धनंजय आहेर,  डॉ. आण्णासाहेब वराडे, विभागप्रमुख प्रा. राजेंद्र खर्डे, प्रा. राजेंद्र निंबाळकर,प्रा. रविंद्र पारखे, प्रा. राजेंद्र शिंदे आदी. 

‘स्वच्छ भारत ,सुंदर भारत’ या राज्यस्तरीय शिबिरासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील चार स्वयंसेवकांची विदयापीठ संघात निवड.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या वतीने लोणी येथील  कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या चार स्वयंसेवकांची राज्यस्तरीय शिबिरासाठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली.

रासेयो,उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय कक्ष मुंबई व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या विद्यमाने बोरवण-धडगाव ता- अक्राणी,जि-नंदुरबार येथे  ‘स्वच्छ भारत ,सुंदर भारत’  या संकल्पनेवरती  राज्यस्तरीय शिबिरासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.महावीरसिंग चव्हाण यांनी निवड केलेला १६ स्वयंसेवकांचा संघ पाठविण्यात आला. सदर संघामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,लोणी येथील  स्वयंसेवक चि.अनुराग देशमुख चि.हर्षल तांबे, कु.स्नेहल सहाणे,कु.अनुजा दहातोंडे यांची निवड करण्यात आली.सदर निवडीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे आणि रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन  केले. निवड झाल्यानंतर संचालक डॉ.महावीरसिंग चव्हाण यांनी स्वयंसेवकांना आणि कार्यक्रम अधीकारी यांना शिबिरांचे उद्देश आणि महत्व, शिबिराचे नियम,शिबिरदारम्यान करावयाचे कार्यक्रम आणि शिबिराचे स्वयंसेवकांसाठीचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.

सदर शिबीर हे ६ मार्च ते १२ मार्च या कालावधीदरम्यान संपन्न होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.  श्री.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजय  विखे पाटील, विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात, महासंचालकाच्या सहायक सचिव सौ.सुष्मीता माने, सहसचिव भारत घोगरे, कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, शिक्षण संचालक  डॉ.हरिभाऊ आहेर, डॉ.दिगंबर खर्डे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

जमीनीचे बिघडलेले अयोग्य सुधारण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिले तर, भविष्यात सर्वांना चांगले अन्न मिळून देश विषमुक्त होईल -पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा विश्वास.

पदमश्री उपाधीचा बहुमान हा काळ्या आईला देऊन अधिक उत्पादनाच्या मोहापायी औषधे आणि रासायनिक खतांच्या अतिवापराने जमीनीचे बिघडलेले अयोग्य सुधारण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिले तर, भविष्यात सर्वांना चांगले अन्न मिळून देश विषमुक्त होईल असा विश्वास बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केला.

लोणी खुर्द येथे कै. गं.भा. मंजुळाबाई वसंतराव घोगरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त अविष्कार बायोफार्म प्रा.लि च्या वतीने बिजमाता पद्मश्री सौ. राहीबाई पोपेरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या. कै. मंजुळाबाई घोगरे या पदमश्री विखे पाटील यांच्या कन्या आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या भगिनी होत्या. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,खासदार डॉ.सुजय विखे पाटील, भाऊसाहेब विठ्ठलराव विखे पाटील,रामराव भदगले, कैलास तांबे, प्रतापराव तांबे, शांतीनाथ आहेर,डॉ.वसंराव कवडे, श्रीमती मनकर्णाबाई  कवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी आपले मनोगत व्यक्त करताना श्री भारत घोगरे म्हणाले की, आमच्या मातोश्री कै.गं.भा. मंजुळाबाई वसंतराव घोगरे यांनी प्रतिकूल परिस्थितीत कौटुंबिक जबाबदारी पार पडताना, वनौषधी बाबत सखोल ज्ञान आणि बियाणे संवर्धनाचा त्यांचा छंद होता. अविष्कार बायोफार्म चे बीज हे आमच्या मातोश्रीच्या अचेतन मनातले स्पष्ट न झालेले वास्तव असावे असे सांगताना पैस्याचे योग्य नियोजन करून कष्ठ करण्याची शिकवण आमच्या जीवनात उपयोगी पडत असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी यावेळी श्री मछिंद्र घोगरे, सौ. ज्योती घोगरे, अविष्कार घोगरे,अभिजित घोगरे, प्रसाद घोगरे,यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या प्रसंगी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते  कै. घोगरे यांच्या समाधी स्थळावर तयार करण्यात आलेल्या बागे मध्ये दिवंगत नातलगांच्या नावाने औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांचे रोपंण करण्यात आले.       

पदमश्री राहीबाई म्हणाल्या की, ‘मला मिळालेली  पद्मश्री  उपाधी  ही  मी आतापर्यंत केलेल्या काळ्या आईच्या सेवेचा गौरव असून, बायफ संस्थेमुळे मला माझे काम सर्वांपर्यंत पोहोचवता आले. असे सांगताना “टाकी चे घाव सोसल्या शिवाय, दगडाला देवपण येत नाही”,या शिकवणीतूनच मातीशी नाते जोडताना, घरातील विरोध पत्करून गेली बावीस वर्ष सेंद्रिय शेती आणि गावरान बियाणांच्या संवर्धनातून विषमुक्त अन्नधान्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न करता आले असे सांगताना, कै. गं.भा. मंजुळाबाई घोगरे या मातेचे प्रयत्नही त्याच दिशेने होतेअसे सांगून,काळ्या आई बरोबरच आपल्या मातापित्यांची सेवा करण्याचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला…

सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, जुन्या पिढीतील माणसांकडून घेण्यासारखे खूप ज्ञान असते परंतु विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये जुन्या -नव्या विचारामध्ये फरक पडत असल्याने हा ज्ञानाचा ठेवा आटत चालायचे सांगून,गं.भा. मंजुळाबाई घोगरे यांनी प्राप्त परिस्थिती मध्ये कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना,संस्काराचे रोपण, आपल्या मुलांवर केल्या मुळेच आज स्व;कष्टला हे कुटुंब महत्व देत असल्याचे त्या म्हणाल्या.

मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, आदिवासी भागातील निरक्षर असलेल्या राहीबाई यांच्या कार्याची दखल घेऊन पायरेन्स या संस्थेने प्रथम त्यांना सन्मानित केले होते,आता पदमश्री मुळे त्यांचे कार्य अधिक लोकांसमोर जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  दिनेश भाने यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर अविष्कार घोगरे यांनी आभार व्यक्त केले.

सागरी जलतरण स्पर्ध्येत प्रवरा कन्या विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींना गोल्ड मेडल. समुद्रात झेप घेतलेल्या विद्यार्थिनीचे प्रवरा परिसरातून कौतुक.

मुंबई येथे संकरॉक ते गेट वे ऑफ इंडिया अशी पाच किलोमीटर अंतराची सागरी जलतरण स्पर्धेत प्रवरा कन्या विदया मंदिरच्या  जलतरणपटूंनी लक्षवेधक कामगिरी बजावताण दोन गोल्ड मेडल मिळविले असल्याची माहिती प्राचार्या सौ. भारती कुमकर यांनी दिली. जलतरण तलावात प्रशिक्षण घेतलेल्या या विद्यार्थिनींनी थेट समुद्रात झेप घेतल्याने त्यांचे प्रवरा परिसरातून कौतुक होत आहे.

महाराष्ट्र राज्य ऍमेच्युअर ऍक्‍वॅटिक असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या या स्पर्ध्येमध्ये प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या इयत्ता पाचवी मधील कु. साफिया पठाण आणि इयत्ता आठवी मधील कु. सुप्रिया अपसुंदे या जलतरणपटूंनी पाच किलोमीटर अंतराचा थरार अनुभवताना गोल्ड मेडल मिळविले तर,इयत्ता चौथी मधील कु. द्रुष्टी मोरे,इयत्ता पाचवी मधील कु.सायली राऊत, इयत्ता आठवी मधील कु.प्रियांका शितोळे इयत्ता नववी मधील कु.साक्षी शिंदे या विद्यार्थिनींनी प्रमाणपत्र मिळविले. या स्पर्धेत राज्यभरातून जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. खेळाडूंच्या जीवरक्षणासाठी स्पीड बोड, जीवरक्षक, डॉक्टर, पानबुडे आदी तैनात करण्यात आलेले होते. जलतरण कोच सुचित्रा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या पूर्वीसुद्धा सागरी जलतरण स्पर्ध्ये मध्ये प्रवरानगरच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन चमकदार कामगिरी केलेली आहे.

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात,कॅम्पस संचालिका सौ. लीलावती सरोदे, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.