एस.टी. व एस. सी. विद्यार्थांसाठी प्रवरा अभियांत्रिकीमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाच्या ऑल इंडिया कॉन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने एस.टी. व एस. सी. स्कील डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गत एस.टी. व एस. सी. विद्यार्थांसाठी व्यक्तिमत्व विकास  विविध कौशल्य  प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाले असल्याची माहिती योजनेचे नोडल ऑफिसर प्रा. अब्दुल हमीद अन्सारी यांनी दिली.

या प्रशिक्षणाअंतर्गत महाविद्यालयातील एस.टी. व एस. सी विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन स्कील, रिझ्युम रायटिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्याच्या मुलाखतीची तयारी, ग्रुप डिस्कशन व  ऍप्टिट्यूड  टेस्ट अश्या विविध प्रकारच्या गोष्टींचे कौशल्य प्राप्त करून देण्यात आले.त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त करण्याकरिता होणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या व्यक्तिमत्वविकास प्रशिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना नोकरी साठी मुलाखती देताना दयाव्या लागणाऱ्या चाळणी परीक्षेसाठी खूप चांगल्या प्रकारे होणार आहे.

हे प्रशिक्षण पुणे येथील  इम्पॅक्ट ट्रेनर्स  यांच्यामार्फत श्री. पंकज मित्तल तसेच नाशिक येथील  फ्लाय हाय अप्टिट्यूड् ट्रेनिंग सर्विसेस यांच्यामार्फत सी.ई.ओ. श्री. ओंकार जगदाळे व पूजा सनार यांनी दिले.  प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली.प्रा. निलेश कापसे, प्रा. लक्ष्मण लहामगे, प्रा. सचिन अनाप, प्रा. स्वप्निल बंगाळ, प्रा. दिबा आफ्रीन अन्सारी, प्रा. अर्चना पवार यांनी परिश्रम घेतले.यापूर्वीही अशापद्धतीचा पंधरा  दिवसांचा कोर्स सीयु-सकसिड संस्थेकडून सर्व विभागांच्या विभागप्रमुखांच्या साहाय्याने १६ ते २९ जानेवारी या कालाविधीत घेण्यात आला होता.