प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी शाळेचा मुलींचा हॉकी संघ राज्यपातळीवर करणार पुणे विभागाचे नेतृत्व

कोळपेवाडी ता.कोपरगाव येथे झालेल्या विभागीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये प्रवरा कन्या विद्या मंदिर चा १९ वर्ष वयोगटाचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये सेमीफाइनल स्पर्धा प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी विरुद्ध (अहमदनगर ग्रामीण) , पुणे ग्रामीण (बारामती) यांच्यात झाली. या सामन्यात प्रवरा कन्या विद्या मंदिर च्या खेळाडूंनी २-० गोलने पुणे ग्रामीणचा पराभव करून संघ फायनल ( अंतिम ) स्पर्धेसाठी पात्र ठरला. फायनल स्पर्धा प्रवरा कन्या विद्या मंदिर विरुद्ध पुणे शहर यांच्यात झाली. यात प्रवरा कन्या विद्यामंदिरच्या संघाने पुणे शहर संघाचा ३-० गोलने दणदणीत पराभव करत विजय प्राप्त केला.या संघामध्ये कु.हर्षदा कुरूमकर, कु. कोमल चौधरी , कु. स्नेहा खंडागळे , कु. वैष्णवी काळाने, कु.पूनम गंधाक्षे ,कु. समीक्षा लगड , कु. आर्या शिंदे, कु. श्रुती फलके, कु. श्रेया काजळे, कु. ज्ञानेश्वरी गुट्टे ,कु. श्रावणी आमटे,कु.काव्या चव्हाण ,कु. तनिक्षा शिशोदीया, कु. राधेश्वरी वसावे,कु.संस्कृती लोहगळे, कु.वैष्णवी गुठे ,कु. वैष्णवी घोडके या विद्यार्थ्यीनींच्या संघाने सहभाग घेतला होता

पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदीर शाळेचा संघाची निवड झाली आहे.