प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या ११ विद्यार्थिनींना भारत सरकारची संस्कृत शिष्यवृत्ती…

भारत सरकारच्या संस्कृत संवर्धन योजनेअंतर्गत केंद्रीय संस्कृत विश्व विद्यालयाकडून लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या ११ विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्या भारती कुमकर यांनी दिली.
संस्कृत भाषा आणि शिक्षणाच्या सर्वांगीण संवर्धन आणि विकासासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाची नोडल एजन्सी म्हणून केंद्रीय संस्कृत विद्यापीठामार्फत बहुविध केंद्रीय योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या एकूण ११ विद्यार्थिनींना प्रत्येकी रु. ५००० एवढी गुणवत्ता शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना संगणक विभाग प्रमुख प्रा. गिरीश सोनार यांनी सांगितले की संस्कृतला ज्ञान प्रणाली  म्हणून ओळखले जाते. संस्कृतमध्ये गणित, तत्त्वज्ञान, व्याकरण, संगीत, राजकारण, वैद्यकशास्त्र, वास्तुशास्त्र, धातूशास्त्र, नाटक, कविता, कथाकथन यांचा मोठा खजिना आहे. म्हणून संशोधनाच्या माध्यमातून संस्कृत शिक्षणात गुणात्मक बदल घडवून आणणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. ही शिष्यवृत्ती प्राप्त होण्यासाठी संस्कृत शिक्षिका निशाली शेजूळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रवरा अभियांत्रिकीचे क्रीडा संचालक डॉ श्रीनिवास मोतीयेळे यांच्यासह विद्यार्थ्याची राज्य एक्वाथोलोन स्पर्धेमध्ये रौप्य पदक

डोंबिवली ठाणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटनेतर्फे आयोजित राज्य एक्वाथोलोन  स्पर्धेमध्ये मास्टर गटामध्ये ( २०० मीटर स्विमिंग आणि दोन किलोमीटर धावणे ) प्रवरा अभियांत्रिकीचे क्रीडा संचालक डॉ श्रीनिवास मोतीयेळे यांनी २०० मीटर स्विमिंग आणि दोन किलोमीटर धावणे हे अंतर २३ मिनिट सहा सेकंदात यशस्वीरित्या पूर्ण करून रोप्य पदक पटकावले त्याचबरोबर अभिमानाची बाब म्हणजे प्रवरा अभियांत्रिकीच्या प्रतीक चिंचाने याने ओपन कॅटेगिरी मध्ये ७५० मीटर स्विमिंग आणि पाच किलोमीटर धावणे हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण करून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामधील ओपन कॅटेगिरीच्या खेळाडूंमध्ये नववे स्थान पटकावले  त्यासोबतच प्रवरा अभियांत्रिकीच्या प्रथमेश जाधव, जतिन लाल तसेच प्रवरा तंत्रनिकेतनच्या निसर्ग गुगले यांनी ओपन कॅटेगिरी मध्ये ७५० मीटर स्विमिंग आणि पाच किलोमीटर धावणे हे अंतर यशस्वीरित्या  पूर्ण करून  पहिल्या १५ खेळाडूंमध्ये आपले स्थान पटकावले.
खेळाडूंना प्रवरा अभियांत्रिकीचे क्रीडा संचालक डॉ श्रीनिवास मोतीयेळे,संस्थेचे क्रीडा संचालक डॉ प्रमोद विखे पाटील, जलतरण प्रशिक्षक अकील शेख यांचे मार्गदर्शन लाभले
या यश प्राप्त केलेल्या खेळाडूंचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल ना.  राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा  सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीचे सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. शिवानंद हिरेमठ , संस्थेचे अतांञिकचे संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालक प्रा. लीलावती सरोदे, सहशिक्षण अधिकारी प्रा. नंदकुमार दळे,संस्थेचे क्रीडा संचालक डॉ प्रमोद विखे पाटील, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय गुल्हाने, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय राठी,महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे सदस्य तसेच ट्रायथलॉन आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी पंच श्री.अभय देशमुख, आदींनी अभिनंदन केले आहे

संगमनेर प्रांत आणि प्रवरेच्या आश्वी महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार ‘उन्नतीसाठी युवक हाच दुवा

महसूलच्या योजना लोकपर्यत पोहचविण्यासाठी विद्यार्थी देणार योगदान. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन महसूल विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले होते या सप्ताहाचे औचित्य साधून ‘उन्नतीसाठी युवक हाच दुवा’ या अंतर्गत लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वणिज्य, विज्ञान व संगणक महाविद्यालय, आश्वी खुर्द आणि प्रांत अधिकारी संगमनेर यांच्यात नुकताच जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे सामजस्य करार करण्यात आला. या प्रसंगी अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री. सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. सुहास मापारी, संगमनेर विभागाचे प्रांतअधिकारी श्री. शैलेश हिंगे आदि मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या वतीने प्रा. देविदास दाभाडे समन्वयक म्हणून उपस्थित होते कला, वणिज्य, विज्ञान व संगणक महाविद्यालय हे २००१ पासून महाराष्ट्रातील एक नामांकित व शैक्षणिक नेतृत्व करणारे महाविद्यालय आहे उत्कृष्टतेचा व समाजविकासाचा ध्यास तसेच समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहचविणे हे ध्येय मानुन महाविद्यालय प्रारंभापासूनच काम करत आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास महाविद्यालय सतत प्राध्यान्य देत आले आहे. विद्यार्थ्यांबरोबरच परिसरातील सर्वसामान्य व्यक्तींच्या विकासास हातभार लागतील असे उपक्रम महाविद्यालय वेळोवेळी घेत आलेले आहे. महाविद्यालय व्यवस्थापन, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नातून महाविद्यालयाचा लौकिक वाढत गेलेला आहे. विद्यार्थ्यांची कठोर मेहनत घेण्याची तयारी आणि जागरुक पालकांचा खंबीर पाठिबा ही यास कारणीभूत आहे.
सध्या महाविद्यालयातून सुमारे ७०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्पर्धा परीक्षा विभागामार्फत सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात भर पडत असून प्रशासकीय सेवेतील अधिकारी घडवण्याचे काम महाविद्यालय करत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी प्रशासन नेहमीच पुढाकार घेऊन लोकांच्या समस्या दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करत आहे. कृषी व्यवस्थापन, महिला आरोग्य, व्यसनमुक्ती, हुंडा बंदी, एडस् जणजागृती, ई पेमेंट, आरोग्य सर्वेक्षण आदि याबाबत लोकामध्ये जाऊन जनजागृतीच्या माध्यमाने समाजाला भेडसावणा-या अडचणी दूर करुन एक सशक्त समाज उभा करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.
या सामंजस्य करारानुसार महसूल विभागाच्या योजना विद्यार्थ्यामार्फत लोकांपर्यंत पोहचविणे. शासनाच्या वेळावेळी येणा-या लोककल्याणकारी योजनांबाबत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे यामध्ये पिक पाहणी, ई हक्क प्रणाली, ई चावडी सलोखा योजना लक्ष्मी मुक्ती योजना सारखे उपक्रम तसेच लोक कल्याणकारी योजनांच्या प्रसार, प्रचार, प्रबोधन व अंमलबजावणी करणे. मतदार नोंदणी करणे गरजू व्यक्तींना विविध शासकीय दाखले प्रदान करून देणे. ही कामे विद्यार्थ्यांच्या मदतीने केली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व दोन क्रेडीट देण्यात येणार आहे.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री श्री. आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांञिकचे संचालक डॉ. प्रदीप दिघे यांनी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. राम पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे यांना शुभेच्छा देऊन महाविद्यालयीन उपक्रमाचे कौतुक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांचे यश…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत हिमांशू देवीदास नांगरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत सौ गायत्री बबन चितळकर आणि प्रदीप जगन्नाथ देठे यांची क्लार्क आणि टायपिस्ट या पदावर निवड झाली हे तीनही विद्यार्थी हे प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रातील आहेत.
महसूल मंञी आणि संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून परिसरातील विद्यार्थ्यांसाठी लोकतेने पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना करण्यात आली. परिसरात ठिकठिकाणी अभ्यासिका विकसित करण्यात येत आहेत आज यातून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करीत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकताच काही परीक्षांचा निकाल जाहीर झाला यात २०२० च्या परीक्षेत प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या राहता अभ्यासिकेतील हिमांशू नागरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. तसेच 2021 ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत सौ. गायत्री चितळकर आणि प्रदीप जगन्नाथ देठे यांची क्लार्क आणि टायपिस्ट या पदावर निवड झाली.

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाने जर्मनी मधील नामांकित “व्याटक्राफ्ट इंडस्ट्रीज प्रा. लि आणि “नेक्स्ट टू सन एर्जी” या सौर उर्जा तंत्रज्ञान विकसित करणा-या कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आला..

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाने जर्मनी मधील नामांकित “व्याटक्राफ्ट इंडस्ट्रीज प्रा. लि आणि “नेक्स्ट टू सन एर्जी” या सौर उर्जा तंत्रज्ञान विकसित करणा-या कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आला.सदर करारानुसार जर्मनीतील या दोन मानांकित कंपन्या प्रवरेच्या कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरती “व्हर्टीकल बायफेसिअल सोलर” तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक तयार करणार असल्याचे महसूल मंत्री आणि संस्थेचे चेअरमन राधाकृष्ण विखे पाटील  यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकऱ्यांना नेहमीची शेती करत असतांना सौर उर्जा निर्मीती करणे शक्य होणार आहे. सदर तंत्रज्ञान हे “नेक्स्ट टू सन एर्जी” या कंपनीने विकसित केलेले असून संपूर्ण जगभरामध्ये याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम “व्याटक्राफ्ट इंडस्ट्रीज प्रा. लि” ही कंपनी करणार आहे. सदर प्रात्यक्षिक प्रकल्पासाठी संपूर्ण भारतातून एकमेव प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या कृषी महाविद्यालयाची निवड करण्यात आली असल्याचे विखे पाटील म्हणाले.
मुंबई येथील हॉटेल ताज मध्ये सौर उर्जा प्रकल्पा संदर्भात झालेल्या  विशेष बैठकीत उपमुख्यमंत्री आणि उर्जामंत्री ना.देवेंद्र फडणवीस, जर्मनी देशाचे व्हाइस चान्सलर रॉबर्ट हाव्यक व त्यांच्या मंत्री मंडळातील सहका-यांसमवेत या सामजस्य करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या.

टेकएक्सोपो २०२३….प्रवरा अभियांत्रिकी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी यांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा टेकएक्सोपो २०२३ चे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातून २२५ प्रकल्पांनी सहभाग घेतला अशी माहीती प्रवरा अभियांञिकीचे प्राचार्य डॉ.एस.एम.गुल्हाणे यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी मायक्रोसॉफ्ट, मुंबईचे वरिष्ठ उद्योग कार्यकारी अधिकारी आणि इन्स्ट्रुमेंटेशन आणि नियंत्रण विभागाचे माजी विद्यार्थी महेंद्र हसबनीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी श्री हसबनीस यांनी अभियांत्रिकीच्या विविध क्षेत्रातील तांत्रिक बदलांची माहिती दिली. त्यांनी असेही नमूद केले की आता चॅट जीपीटी तंत्रज्ञान अस्तित्वात आले आहे, त्यामुळे तुमच्या समोर अनेक संधी आणि आव्हाने आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातील तंत्रज्ञान व्यवस्थापन उदयोन्मुख आव्हानेही त्यांनी विशद केली.
सी. आय. आय. ए. मुंबईचे मुख्य मिशन प्रवर्तक श्री. कृष्णकुमार रंगनाथन सांगितले की नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी अनेक स्टार्टअप संधी उपलब्ध आहेत. त्यांनी स्टार्टअप प्रकल्पांच्या संधी विस्तृतपणे सांगितल्या.
या स्पर्धेत अभियांत्रिकी प्रवर्गातून डॉ. वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या “स्मार्ट लर्निंग डिव्हाइस” प्रकल्पाला प्रथम पारितोषिक मिळाले. गुरू गोविंद सिंग कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च सेंटर नाशिकच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या “चीट डिटेक्शन सिस्टम युजिंग एम्बेडेड क्यूआर कोड आणि स्पीच रेकग्निशन” या प्रकल्पाला द्वितीय पारितोषिक मिळाले. आणि, तिसरे पारितोषिक “डिझाइन ऑफ मल्टी-ऑपरेशनल मशीन ”
प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे.
पॉलिटेक्निक श्रेणीतून, शासकीय पॉलिटेक्निक अहमदनगरने विकसित केलेल्या “अॅडव्हान्स डिफेन्स सिस्टिम” या प्रकल्पाला प्रथम पारितोषिक मिळाले.
संजीवनी के.बी. पी. पॉलिटेक्निक कोपरगावच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या सी,एन,एन. आधारित फेस रिकग्निशन” या प्रकल्पाला द्वितीय पारितोषिक मिळाले.
आणि तिसरे पारितोषिक जिंकले अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, संगमनेरच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेला “फॉरेस्टेशन डिटेक्शन सिस्टम” प्रकल्पाने.
या प्रसंगी संजीवनी के बी पी पॉलिटेक्निकला “टेक एक्सपो-२०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा सहभाग” हा पुरस्कार मिळाला.

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत देश विदेशातील तज्ञांचा संवाद

लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी,माहिती तंत्रज्ञान & इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक अभियांत्रिकी इंजिनीरिंग विभागातर्फे “पीआरईसीकॉन २०२३“ या अंतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देश विदेशातील तज्ञांनी आपला सहभाग नोंदविला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने यांनी सांगितले की या राष्ट्रीय परिषदेमुळे मुळे देशातील विविध भागातील विद्यार्थांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माहितीची देवाण घेवाण होणार आहे. तसेच प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे. त्यामुळे महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानंतर पुढील करियरसाठी नक्कीच लाभ होणार आहे. या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन प्रवरा ग्रामीण संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवानंद हिरेमठ यांच्या हस्ते झाले. विशेष अथिती म्हणून लंडनमधील इन्फोसिस मध्ये लीड कन्सल्टंट श्री रवींद्र शेळके, मुख्यवक्ते श्री. अमोल पोटगंटवार, श्री नरेन्द्र जाधव यांनी ऑनलाईन माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना श्री रवींद्र शेळके यांनी या उपक्रमचे विशेष कौतुक करत औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान व त्यामध्ये सातत्याने होणारे बदल हा शैक्षणिक अभ्यासक्रमात उपयुक्त होणार असल्याचा विश्वास व्यक्त करुन हा उपक्रम दरवर्षी आयोजित केल्याने विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकांसाठी यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. परिषदेसाठी विविध राज्यांमधून अभियांत्रिकीच्या विविध क्षेत्रातील विविध शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. या परिषदेमध्ये एकून २०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.यामध्ये पलक करीर,वैष्णवी विश्वासराव,ईश्वरी शिंदे,रामेश्वर गाडेकर,स्वहम राजू,दिनेश जाकीत या विद्यार्थ्यानी विशेष प्राविण्य मिळविले. कार्यक्रमचे प्रस्ताविक प्रा. महाजन यांनी केले आभार प्रदर्शन डॉ. कोरडे यांनी केले. या परिषदेचे संयोजन प्राध्यापिका सीमा लव्हाटे, डॉ. मिनिनाथ बेंद्रे, प्राध्यापक सचिन भोसले यांनी केले तर ही परिषद यशस्वी होण्यासाठी परिषदेचे समन्वयक प्रा. शकील शेख, प्रा. कमलेश कडू, प्रा. धनंजय राक्षे,सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

नोकरी आणि उद्योजकतेमध्ये प्रवरा अव्वल…

प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात उद्योग संस्था परिसवांद

लोकनेते पद्माभूषण डाँ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात उद्योग संस्था परिसवांद नुकताच संपन्न झाला. या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी आणि औषधनिर्माण उद्योजकता यावियषी तज्ञांनी मार्गदर्शन केले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर यांनी दिली.
महाविदयालयाने विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी साठी येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय योजना या उद्देशाने विविध नामांकित कंपनीच्या एच आर व्यवस्थापक मंडळी बरोबर परिसवांद महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या परिसवांदासाठी जे. बि. केमिकल्स प्रा. लीचे उपाध्यक्ष मनोज चिटणीस, प्रिझम लाइफ सायन्स संस्थापक संचालक अजय जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील तर प्रमुख अतिथी माजी मंञी श्री. अण्णासाहेब म्हस्के पाटील हे व्यवस्थापन प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर सिरिम इन्स्टिटयूट चे जनरल मॅनेजर श्री. पंकज ठाकूर, प्रीमियम सिरम चे उपाध्यक्ष श्री. संदीप पाटील, सन फार्मा चे श्री.मीनाकेतन राय, सिप्ला च्या सौ. गीता राय डब्लू. एन. एस च्या सौ. नीता नाशिककर,सौ. श्रद्धा कोकणे, साईटेक फार्मा चे चैतन्य बोरावके, रेव फार्मा. चे रोहित पांडे, सक्सेस्स अकॅडेमि चे श्री. गणेश आव्हाड हे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. यासभे मुळे महाविद्यालय आणि फार्मा कंपन्या मधील अंतर कमी होऊन विद्यार्थ्यांना नोकरी, संशोधन, प्रशिक्षण इत्यादी क्षेत्रात काम करण्याच्या संधी उपलब्ध होतील असे मत सर्व औषधनिर्माण शास्ञ महाविद्यालयाचे संचालक श्री. बी. एम. पाटील यांनी व्यक्त केले.
श्री. चिटणीस यांनी फार्मा कंपनीची सध्य परिस्थिती व विद्यार्थ्यांकडून अपेक्षा यावर मार्गदर्शन केले तर श्री पंकज ठाकूर यांनी औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील संशोधणातील संधी यावर आपला मत प्रदर्शित केले.
सौ. नाशिककर यांनी औषधनिर्मानशास्त्रतील विविध नवीन नोकरी क्षेत्र यावर विद्यार्थांना संबोधित केले. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री अजय जोशी यांनी उद्योजक्ता कसा घडतील यांवर प्रकाशझोत टाकला.
विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा भविष्यात नोकरीसाठी होणार आहे.महाविद्यालयात स्वतंत्र ट्रैनिंग व प्लेसमेंट विभाग कार्यरत असून या विभागंतर्गत या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभे साठी एकूण ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. सोमेश्वर मनकर ,माजी विद्यार्थी संघटना प्रमुख सौ. हेमलता भवर, डॉ. संतोष दिघे, डॉ. सुहास सिद्धेश्वर व इतर सर्व शिक्षक तसेच सर्व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन डॉ. सोमेश्वर मनकर यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य श्री. संजय भवर यांनी केले.

विखे पाटील महाविद्यालयात खाद्य संस्कृती महोत्सवातून विद्यार्थ्यानी घेतले व्यावाहीक ज्ञान-….डॉ. प्रदीप दिघे

लोणी येथील लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान वृद्धिंगत होण्याच्या दृष्टिकोनातून वाणिज्य महोत्सल आयोजन करण्यात आले. त्यात विविध स्वरूपाचे ४० स्टॉल विद्यार्थ्यांनी थाटले. या स्टॉलच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ५३ हजार रुपयांची कमाई केली. अवघ्या तीन तासांमध्ये खाद्य संस्कृती, कृषी संस्कृती, व्यापार व व्यवसाय तसेच इलेक्ट्रॉनिक साधने, फॅशनेबल ड्रेस, ज्ञान- विज्ञान व मनोरंजनपर उपक्रम याबरोबरच विविध स्टॉलच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्केटिंग कशा पद्धतीने केले जाऊ शकते याचे ज्ञान मिळाले. अतिशय कमी कालावधीमध्ये या उपक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एक आगळावेगळा उपक्रम यानिमित्ताने महाविद्यालय संपन्न झाला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली.
वाणिज्य विभागाच्या वतीने झालेल्या या महोत्सवास संस्थेचे संचालक अण्णासाहेब भोसले,अलकाताई दिघे, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब रणपिसे आदी उपस्थित होते. वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ ज्वेलरी, फॅशनेबल कपडे यांच्यासह इलेक्ट्रॉनिक वाहने यांचे स्टॉल अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने सजविले होते. महाविद्यालयात संपन्न झालेल्या या खाद्य संस्कृतीला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. व यानिमित्ताने एक आगळावेगळा उपक्रम सर्वांनीच अनुभवला. यासाठी वाणिज्य विभागातील डॉ. विजय खर्डे, डॉ. विजय निर्मळ, डॉ. विजय शिंदे प्रा. ताजने, प्रा. गोपाळे, प्रा. ठोके, प्रा.रंजना दिघे यांनी विशेष परिश्रम घेतले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे प्राचार्य प्रदीप दिघे, उपप्राचार्य आर. जी.रसाळ, उपप्राचार्य वाबळे ए.एस. उपप्राचार्या छाया गलांडे यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनीही यासाठी विशेष परिश्रम घेतले.

सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय पेंटिंग स्पर्धेत प्रवरेच्या कन्या विद्या मंदीरचे यश.

भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघाने घेतलेल्या “सक्षम : राष्ट्रीय निबंध, पेंटिंग व प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२२” मधील “हरित और स्वच्छ उर्जा अपनाएँ, आजादी का अमृत महोत्सव मनाएँ” या संकल्पनेवर आधारित पेंटिंग स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इ. १० वीमध्ये शिकणाऱ्या कु. स्नेहल व तेजल सूर्यभान तांबे या भगिणीनी “सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय पेंटिंग” हा पुरस्कार प्राप्त केला. अशी माहीती प्राचार्या दिप्ती आॅडेप यांनी दिली.

या विजयी स्पर्धेत रुपये चार हजार रोख आणि उपलब्धी प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षणांसोबतचं विविध स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिले जाते.यामुळे प्रवरेतील विद्यार्थी कायमचं विविध स्पर्धेत विजयी ठरत असतात. या स्पर्धेतील सर्व विद्यार्थिनींना संगणक विभाग प्रमुख प्रा. गिरीश सोनार, श्री. जितेंद्र बोरा, श्री. सुरेश गोडगे, कु. पल्लवी पवार, कु. सोनाली मेढे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील,खा.डाॅ.सुजय विखे पाटील,संस्थेचे सह सचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांनी अभिनंदन केले आहे.

सात्रळ महाविद्यालयात सॉफ्ट स्किल ट्रेनिंग प्रोग्राम

शिक्षणासोबतचं विद्यार्थ्याना विविध ज्ञान देण्यात प्रवरा शैक्षणिक संकुल हे आघाडीवर…….. सागर भाले

शिक्षणासोबतचं विद्यार्थ्याना विविध ज्ञान देण्यात प्रवरा शैक्षणिक संकुल हे आघाडीवर आहे.ग्रामीण मुले ही सर्वच क्षेञात आघाडीवर असले तरी प्रवरेत वेळोवेळी होणारे व्यक्तीमहत्व प्रशिक्षणे आणि कौशल्य आधारीत प्रशिक्षणांमुळे प्रवरेचा विद्यार्थी हा हर्व गुणसंपन्न आहे असे प्रतिपादन रुबीकॉन स्किलचे संचालक सागर भाले यांनी केले.
लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सात्रळ येथे
संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग प्लेसमेंट सेल आणि रुबीकॉन स्किल प्रायव्हेट लिमिटेड ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सागर भाले बोलत होते.
प्रशिक्षण कर्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख कशी करून द्यावी,मुलाखतीस जातांना तसेच मुलाखतीपूर्वीची तयारी, मुलाखती दरम्यान द्यावयाची उत्तरे, संभाव्य प्रश्न , मुलाखतीनंतर काय करावे, या सर्वांची तयारी, स्वतःचे ज्ञान आणि अज्ञान कसे ओळखावे आणि त्याचा आपल्या भविष्यासाठी वापर कसा करावा तसेच वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांतून मुलांकडून या सर्व गोष्टींची तयारी करून घेतली.खाजगी क्षेञामध्ये काम करतांना आपली वागणूक कशी असावी या सर्व गोष्टींचे विद्यार्थ्यांना प्रशिशक श्री हंजला खान आणि श्री सागर भाले यांनी तयारी करून घेतली. या चार दिवसांमध्ये प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन प्रत्येक गोष्ट शिकून घेतली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे चार दिवसांचा ट्रेनिंग प्रोग्राम पार पडला.या ट्रेनिंग साठी ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग प्लेसमेंट सेल च्या समन्वयक सौ. छाया कार्ले यांनी चार दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेतला. . या प्रसंगी कु. पुनम गागरे, पांडुरंग मुसमाडे, कु .सायली हारदे, सचिन मुसमाडे, तृतीय वर्ष विज्ञान, अनिकेत बेलकर, अश्विनकुमार सजगुरे, कु.मन्सुरी जैनाब, कु. मोहिनी ढेपे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ , शिक्षण संचालक डॉ. पी एम दिघे , संस्थेचे प्लेसमेंट अधिकारी डॉ. मनोज परजणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे उपप्राचार्य डॉ.जयश्री सिनगर , डॉ.दिपक घोलप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी ट्रेनिंग प्लेसमेंट सेल च्या समन्वयक सौ. छाया कार्ले, प्रा. स्वाती कडू, प्रा.प्रियांका तांबे, प्रा. गौरी क्षिरसागर ,प्रा.हरी दिवेकर, प्रा. देविदास हारदे ,प्रा. तुषार कडस्कर , प्रा.सुधीर वाघे ,प्रा. राहुल कडू यांनी प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
कु. प्रांजल शिंगोटे आणि कु. मयुरी नांगरे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर आभार प्रा. स्वाती कडू यांनी आभार मानले.

गुणवत्ता पूर्ण शिक्षण आणि रोजगार उपलब्धी हेच प्रवरेचे ध्येय – सौ. विखे

प्रवरेच्या १८४२ विद्यार्थ्याची बहुराष्ट्रीय कंपनी निवड

गुणवत्ता पूर्ण शिक्षण आणि रोजगार उपलब्धी हाच प्रवरेचा ध्यास आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी आई-वडीलांच्या अपेक्षा पूर्ण करतांना आत्मविश्वासाने पुढे जावे असे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले. यावर्षी १८४२ विद्यार्थ्याची बहुराष्ट्रीय कंपनीत झालेली निवड हा प्रवरा परीवारासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट विभागाने आयोजित बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये निवड झाल्यालेल्या विद्यार्थ्याच्या सत्कार समारंभात सौ. विखे पाटील बोलत होत्या.

यावेळी संस्थेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील तञ निकेतनचे प्राचार्य डॉ. व्ही आर. राठी, औषध निर्माणशास्त्रज्ञ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर, डॉ रविंद्र जाधव, गृह विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुश्री खैरे, आय. टी. आयचे प्राचार्य अर्जुन आहेर, प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. मनोज परजणे आदीसह निवड झालेले विद्यार्थी उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात सौ विखे पाटील म्हणाल्या सामान्य जनतेच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे. शिक्षणातून त्यांची प्रगती व्हावी. हा पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचा प्रयत्न होता आज संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणासोबत नोकरीची उपलब्धता हे धोरण आहे. आज संस्थेची १८४२ विद्यार्थ्यांची निवड हा मोठा आनंद असून हेच स्वप्न पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे होते. मुलांनी बाहेर जावून नोकरी करावी यासाठी आई-वडीलांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे. निवड झालेल्या क्षेत्रात अनुभव घेत पुढे जा असा संदेश देतानाच संस्थेचे आणि आपल्या परिवारांचे नांव मोठे करा असे ही सांगितले.

यावेळी डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी प्लेसमेंट विभागाचे कार्य हे गौरव प्राप्त आहे. विविध सेवा सुविधा, करिअर मार्गदर्शन यामुळे प्रवरेचा प्लेसमेंट विभाग आघाडीवर असल्याचे सांगितले. प्रारंभी प्राचार्य अर्जुन आहेर यांनी पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय, तंत्रनिकेतन, आय. टी. आय, गृह विज्ञान महाविद्यालय, औषधनिर्माण महाविद्यालय यांतून नोकरी प्राप्त २०२२- २०२३ च्या आढावा घेतला. कार्यक्रमाचे आभार डाॅ.संजय भवर यांनी मानले.

कोट……
पालकांनो मुलांची काळजी करु नका प्रवरा
शैक्षणिक संकुलातून आदर्श विद्यार्थी घडत असतो.मुलांसोबत मुलीही नोकरी मिळविण्यात आघाडीवर आहेत. आपल्या मुलांना पाठबळ देण्यासाठी विखे पाटील परिवार त्यांच्या सोबत आहे. नोकरी सोबतचं स्वता: ची कंपनी स्थापना करा. देशात आणि परदेशात संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. त्याचे मार्गदर्शन घेऊन पुढे जातांना आत्मविश्वास कायम ठेवा हा संदेश सौ.विखे पाटील यांनी दिला.