प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत देश विदेशातील तज्ञांचा संवाद

लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी,माहिती तंत्रज्ञान & इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक अभियांत्रिकी इंजिनीरिंग विभागातर्फे “पीआरईसीकॉन २०२३“ या अंतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देश विदेशातील तज्ञांनी आपला सहभाग नोंदविला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने यांनी सांगितले की या राष्ट्रीय परिषदेमुळे मुळे देशातील विविध भागातील विद्यार्थांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माहितीची देवाण घेवाण होणार आहे. तसेच प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे. त्यामुळे महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानंतर पुढील करियरसाठी नक्कीच लाभ होणार आहे. या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन प्रवरा ग्रामीण संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवानंद हिरेमठ यांच्या हस्ते झाले. विशेष अथिती म्हणून लंडनमधील इन्फोसिस मध्ये लीड कन्सल्टंट श्री रवींद्र शेळके, मुख्यवक्ते श्री. अमोल पोटगंटवार, श्री नरेन्द्र जाधव यांनी ऑनलाईन माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना श्री रवींद्र शेळके यांनी या उपक्रमचे विशेष कौतुक करत औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान व त्यामध्ये सातत्याने होणारे बदल हा शैक्षणिक अभ्यासक्रमात उपयुक्त होणार असल्याचा विश्वास व्यक्त करुन हा उपक्रम दरवर्षी आयोजित केल्याने विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकांसाठी यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. परिषदेसाठी विविध राज्यांमधून अभियांत्रिकीच्या विविध क्षेत्रातील विविध शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. या परिषदेमध्ये एकून २०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.यामध्ये पलक करीर,वैष्णवी विश्वासराव,ईश्वरी शिंदे,रामेश्वर गाडेकर,स्वहम राजू,दिनेश जाकीत या विद्यार्थ्यानी विशेष प्राविण्य मिळविले. कार्यक्रमचे प्रस्ताविक प्रा. महाजन यांनी केले आभार प्रदर्शन डॉ. कोरडे यांनी केले. या परिषदेचे संयोजन प्राध्यापिका सीमा लव्हाटे, डॉ. मिनिनाथ बेंद्रे, प्राध्यापक सचिन भोसले यांनी केले तर ही परिषद यशस्वी होण्यासाठी परिषदेचे समन्वयक प्रा. शकील शेख, प्रा. कमलेश कडू, प्रा. धनंजय राक्षे,सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.