लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली याचे कारण म्हणजे महाविद्यालयाला नुकताच
महाराष्ट्र शासनाच्या करियर कट्टा उपक्रमांतर्गत उत्कृष्ट केंद्र हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुणे येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला या पुरस्काराबरोबरच रुपये एक लाखाचा धनादेश सन्मानचिन्ह महाविद्यालयास प्रदान करण्यात आले हा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी स्वीकारला. शासनाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअर कट्टा हा उपक्रम चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून यावा यासाठी हा पुरस्कार महाविद्यालयास मोलाचा ठरणार आहे
राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव तालुकास्तरीय स्पर्धेत लोणीच्या प्रवरा कन्या विद्या मंदीर विद्यार्थ्यींनींच्या संघाने पटकवला प्रथम क्रमांक
जिल्हास्तरासाठी झाली निवड….
राहाता तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग आणि तालुका विज्ञान गणित अध्यापक संघटना यांचे संयुक्त विद्यमाने श्री यशवंतराव चव्हाण माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय राजुरी येथे राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था रवीनगर , नागपूर आणि जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा मानवाच्या शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या प्रमुख विषयांतर्गत भरड धान्य पौष्टीक आहार , आधुनिक प्रगत तंत्रज्ञान , विज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर पार पडली. या स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणीच्या विद्यार्थ्यींनींच्या संघाने पटकवला प्रथम क्रमांक मिळवत जिल्हा पातळीवर निवड झाली आहे.
आश्वी खुर्द येथील विद्यानिकेतन चे राज्यस्तरीय ड्रॉपरोबॉल स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळविले यश
लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन आणि कनिष्ठ महाविद्यालय शाळेच्या विद्यार्थ्यांनी नायगाव जि. सातारा येथे संपन्न झालेल्या १४ व्या राज्यस्तरीय ड्रॉपरोबॉल स्पर्धेत विवीध बक्षिसे विद्यार्थ्यानी प्राप्त केली.
या स्पर्धेत ज्युनियर गटात चि. पृथ्वीराज क्षिरसागर याने सिंगल इव्हेंट मधे प्रथम पारितोषिक व गोल्ड मेडल मिळविले, चि. अभिनव डहाळे याने ट्रिपल इव्हेंट मधे प्रथम पारितोषिक व गोल्ड मेडल मिळवले, ज्युनियर मुली गटात कु. गंभीरे शेडळ, कु. तेजल गंभीरे व वैष्णवी जेडगुले यांनी ट्रिपल इव्हेंट मधे प्रथम पारितोषिक व गोल्ड मेडल मिळवले , तसेच सब ज्युनियर मुली गटाच्या स्पर्धेत कु. रुपाली शेंडकर व कु समिक्षा मुन्तोडे यांनी डबल इव्हेंट मधे द्वितीय पारितोषिक व सिल्व्हर मेडल मिळवले, ज्युनियर मुले गटात चि. विवेक वर्पे याने सुपर सोलो इव्हेंट मधे प्रथम पारितोषिक व गोल्ड मेडल मिळवले, चि. ओमकार म्हस्के याने ट्रिपल इव्हेंट मधे प्रथम पारितोषिक व गोल्ड मेडल मिळवले तर चि. प्रसाद लावरे याने डबल इव्हेंट मधे द्वितीय पारितोषिक व सिल्व्हर मेडल मिळवले.