दुर्गापूरच्या आनंद बाजारातून मुलांना मिळाले व्यावहारीक… हजारो रुपयांची उलाढाल…

पालकांचाही मोठा प्रतिसाद…


मुलांना आर्थिक साक्षरता मिळावी.त्यांना पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारी ज्ञान मिळावे यासाठी राहता तालुक्यातील दुर्गापूर येथील लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये बाल-गोपाळांनी हजारो रुपयांची उलाढाल केली.
विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे ,खाद्यपदार्थ यांची विक्रीसाठी स्टॉल मांडले होते. त्याचबरोबर स्थानिक विक्रेत्यांनीही त्यांचा माल आज बाजारासाठी आणला होता .स्थानिक दुर्गापूर हसनापूर चंद्रपूर भालेराववाडी चिंचपूर या ठिकाणाहून शेतकरी बाजारासाठी आले होते . आपले विद्यार्थी कशा तऱ्हेने माल विकतात हे बघण्याची उत्सुकत दिसून आली तसेच माल घेताना घासाघीस करणे, वजन बरोबर देतात की नाही हे बघणे मालाची योग्य पैसे घेतात की नाही याबाबत पालक जागरूकपणे चौकशी करतांना दिसले . काही विद्यार्थी आपल्या मालाची ओरडून जाहिरात करताना दिसत होते . मुख्य पाहुण्यासह विद्यालयातील शिक्षक व नागरिकांनी या बाल आनंद मेळाव्याचा आनंद लुटला.
आनंद बाजार मुलांना आनंद देणारा ठरला.वांगे घ्या..कांदे घ्या…ताजी लाल कोराची मेंथी…पालक गाजर अशा सर्वच भाजीपाला मुलांनी येथे विक्री करत आपला माल विकला.जिल्हा परिषदेच्या माजी अध्याक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.सुश्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम प्रवरेच्या शैक्षणिक संकुलात सुरु आहे.

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकीच्या नऊ विद्यार्थ्याची नामांकित कंपनीमध्ये निवड…

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल अभियांत्रिकी विभागाच्या २०२४-२५ बॅच चे अंतिम वर्षाच्या 9 विद्यार्थ्यांची घारडा केमिकल लिमिटेड या नामांकित व बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड झाली आहे. सदर निवड ही अंतिम सत्र सुरू होण्याआधीच झाली आहे. मागील वर्षी या विभागाच्या ६१ विद्यार्थ्यांची निवड नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झाली होती.

विद्यार्थ्‍यां दशेतच उद्योजक घडाव…

विद्यार्थ्‍यां दशेतच उद्योजक घडावा, वेगवेगळ्या व्‍यवसायाचा अनुभव त्‍यांना महाविद्यालय जीवनातच मिळावा या उद्देशाने शिक्षणातून विकासाकडे ही संकल्‍पना घेवून ‘बिल्‍डींग प्रवरा’ या विद्यार्थ्‍यांचा समावेश असलेल्‍या भव्‍य एक्‍स्‍पोचे आयोजन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या पुढाकाराने करण्‍यात येणार आहे.

विद्यार्थ्‍यांच्‍या सहभागाने आयोजित करण्‍यात आलेल्‍या या एक्‍स्‍पोमध्‍ये फनी गेम, खाद्य प‍दार्थांचे स्‍टॉल तसेच येणा-या दिवाळी निमित्‍ता लागणा-या सर्व साहित्‍यांचे १५० स्‍टॉल विद्यार्थी उभे करणार आहेत. दिनांक १८ ते २० ऑक्‍टोंबर २०२४ या तिन दिवसांच्‍या कालावधीत लोणी बुद्रूक येथील पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील क्रिडा संकुलाच्‍या मैदानावर या विद्यार्थ्‍यांच्‍या बिझनेस एक्‍स्पोचे आयोजन करण्‍यात आले आहे.

या एक्‍स्पोमध्‍ये विद्यार्थ्‍यां बरोबरच शिक्षक आणि पालकांचाही सहभाग असणार असून, विद्यार्थी दशेतच उद्योजक घडविण्‍याच्‍या दृष्‍टीने एक छोटासा अनुभव या एक्‍स्‍पोमधून मिळावा हा विचार आहे. यापुर्वी गणेश उत्‍सव तसेच नवरात्र उत्‍सवात ‘सहकारातून समृध्‍दीकडे’ या संकल्‍पनेतून या उत्‍सवात विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग यशस्‍वीपणे राहीला. आता ‘शिक्षणातुन विकासाकडे’ ही संकल्‍पना घेवून बिल्‍डींग प्रवरा हा उपक्रम विद्यार्थ्‍यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.

यापुर्वी ग्रामीण भागात शिकलेला विद्यार्थी हा शेती व्‍यवसायाकडेच वळत असे. परंतू आता शिक्षणाच्‍या वाटाही विस्‍तृत झाल्‍या असल्‍याने मिळालेल्‍या शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्‍यांना व्‍यवसाय आणि उद्योगासाठी कसा करता येईल, व्‍यवसायामध्‍ये लागणा-या आवश्‍यक सुविधा मार्केटींगचे ज्ञान, माल भरण्‍याची प्रक्रीया याचा अनुभव या एक्‍स्‍पोमधून विद्यार्थ्‍यांना मिळावा हा उद्देश बिझनेस एक्‍स्‍पोच्‍या माध्‍यमातून आहे. या वर्षापासून हा बिझनेस एक्‍स्पो सुरु केला असून, भविष्‍यात वेगवेगळ्या ठिकाणी याचे आयोजन करण्यात येणार आहे

आदर्श विद्यार्थी घडविणे हाच प्रवरेचा ध्यास…विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयांत पालक मेळावा

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रवरा हे कायम प्रगतीपथावर आहे. आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांची एकत्रित सांगड घालण्याची गरज आहे अकरावी हा विद्यार्थ्यांचा पाया असतो त्या दृष्टीने हा पाया भक्कम करण्याचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचा आहे यासाठी प्रत्येकानं आपलं योगदान द्यावे असे प्रतिपादन लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुष्मिता विखे पाटील यांनी केले. लोणीच्या पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित अकरावीच्या पालक मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या.
यावेळी पालकांशी संवाद साधतांना डॉ. सुष्मिता विखे पाटील म्हणाल्या, अकरावी हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया आहे. हा पाया भक्कम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. प्रवरेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण आणि सर्वोत्तम शिक्षण हाच  हेतू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणातून पुढे जाण्यासाठी  संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम शालेय पातळीवरती सुरू आहेत. या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थी हा जागतिक पातळीवर पोहोचत आहे. याचाही आनंद मोठा असला तरी देखील आज पालकांनी देखील आपल्या मुलांबाबत जागृत राहण्याची गरज व्यक्त करताना मुलांना  चांगले संस्कार करतांना  त्यांच्याबरोबर दररोज पंधरा मिनिटे चर्चा करा. त्यांना समजून घ्या त्यांना येणाऱ्या अडचणी काय आहेत त्या जाणून घ्या आपण स्वतः मोबाईल पासून दूर राहा आपण वाचन आणि  आपण वाचन आणि खेळ  खेळा तेव्हा  मुले खेळतील. विद्यार्थी हा पालकांचा अनुकरण करत असतो तेव्हा आपण संस्कार करत असताना ती सुरुवात आपल्यापासून करा असे सांगून शिक्षणासोबतच प्रवरेच्या माध्यमातून संस्कृतीचा ही जतन होत आहे. सहकारातून समृद्धीकडे या माध्यमातून प्रवरा गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवल्या विविध उपक्रमातून ग्रामीण विद्यार्थी हे कुठेही कमी नाही याची जाणीव विद्यार्थ्यांनी करून दिली. येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये देखील प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये प्रवरा नवरात्र उत्सव हा विशेष उपक्रम हाती घेतला जाणार असल्याचे सांगतानाच या उपक्रमाच्या माध्यमातून घटस्थापना का करायची या मागील  उद्देश त्याचबरोबर महिलांचे यशस्वी महिलांचे व्याख्याने आणि दुर्गा सप्तशती पाठ असे विविध उपक्रम शालेय पातळीवरती राबवून  भारतीय संस्कृतीचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.  विद्यार्थीची  जेवढी चिंता तुम्हाला आहे तेवढीच आम्हाला आहे त्यामुळे एकत्रित काम करून आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम आपण करूया आणि यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा स्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदीरचे यश

जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धा पदमश्री डॉ विखे पाटील सैनिक स्कुल प्रवरानगर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांतील एकूण १४० स्पर्धक जलतरण पट्टूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणीच्या जलतरण पटूंनी उत्कृष्टपणे खेळाचे प्रदर्शन करुन २५ सुवर्णपदक, १३ रौप्यपदक, ७ कांस्यपदक पटकावले.

प्रवरा फार्मसी लोणी ची श्रुतिका विखे हिचे इंग्लंड येथील कोवेन्ट्री विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय लोणी येथील विद्यार्थिनी कु. श्रुतिका विखे हिचे युनाईटेड किंगडम या देशातील कोव्हेंट्री विद्यापीठ येथे मास्टर्स या पदवी साठी निवड झाली.

प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या वस्तीगृहातील मुलींच्या आजी आजोबांचा मेळावा संपन्न प्रवरेमुळे आम्हा मुलींची चिंता नाही

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिर या ठिकाणी वस्तीगृहामध्ये शिकत असलेल्या मुलींसाठी आजी आजोबा मेळावा त्या उत्साहात संपन्न झाला. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून झालेला हा आजी-आजोबा मेळावा हा प्रवर आहे मुलींच्या शिक्षणासाठी सुरक्षित असल्याची  भावना आजी आजोबांनी यावेळी व्यक्त केली.

आजी आजोबांचे स्वागत गीत,लेझीम पथकडून  झालेले स्वागत,शाळेतील संगीत शिकणाऱ्या मुलींनी  आजी आजोबांविषयी  केलेले गिते.आणि निसर्गरम्य परिसर,सोबत खास त्यांच्यासाठी आयोजित विविध खेळ यामध्ये ते चांगलेचं रमले.

 आजी आजोबांचे कुटुंबात असलेले स्थान किती महत्त्वाचे आहे. अनेक आजी आजोबांनी आपले अनुभव सांगितले व आज  होणाऱ्या पालक मेळाव्यासाठी आपल्याला बोलावले त्याबद्दल शाळेचे  मानत बदलत्या समाजात संस्कारांची कशी गरज आहे . आजच्या काळात मुलींची सुरक्षा किती महत्त्वाची आहे आणि या सगळ्या गोष्टी कन्या मंदिर मध्ये घडत आहेत म्हणून सर्व पालक मुलींना वस्तीगृहामध्ये टाकून निश्चित आहोतं असे मत काही आजोबा व पालकांनी व्यक्त केले.प्रवरा कन्या विद्या मंदिर मध्ये अनेक विद्यार्थिनी घडल्यात आणि वेगवेगळ्या पदांवर समाजात, राजकीय क्षेत्रात मानाने काम करत आहेत याचा काही पालकांनी विशेष उल्लेख केला. वेगवेगळ्या गमतीशीर खेळांचे आयोजन केले होते त्याचा आजी आजोबांनी आनंद लुटला. अगदी वय विसरून त्यांनी या खेळामध्ये सहभाग घेतला. आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला हा कार्यक्रम घेऊन विखे पाटील परिवारांने नेहमी वेगळं काहीतरी समाजाला देत आहेत. त्यामुळेच त्यांनी सुरू केलेल्या शाळांमध्ये चांगले काम सुरू आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या  क्रीडा शिक्षिका  विद्या घोरपडे यांनी आजी आजोबा मिळावा घेण्यामागचा उद्देश सफल झाला याचे समाधान व्यक्त केले. शाळेमध्ये घेतलेल्या उपक्रमामध्ये मुली भाग घेतात. गणेशोत्सव, नवरात्र अशा उपक्रमांमधून मुलींना चांगले संस्कार दिले जातात व खेळामधून शरीराचा व मनाचा भक्कमपणा दिला जातो.आजी आजोबा मेळावा यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, शिक्षण संचलिका लीलावती सरोदे प्राचार्य भारती कुमकर आणि विद्यालयातील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थिनींनी खूप मेहनत घेतली.

मेजर सिता शेळकेच्या कर्तबगारीचा प्रवरेलाही अभिमान!…मंत्री विखे पाटील यांनी केले अभिनंदन!

केरळ राज्यातील वायनाड येथील  नैसर्गिक संकटात आपल्या कुशल बुध्दीने केवळ ३१ तासांत सेतू उभा करणा-या लष्कर सेवेतील सीता शेळके या प्रवेच्या माजी विद्यार्थीने दाखवलेल्या कर्तबगारीचा प्रवरा परीवाराला सार्थ अभिमान असल्याची भावना पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

प्रवरा अभियात्रिकी महाविद्यालयाची  माजी विद्यार्थीनी असलेली  सिता अशोक शेळके सध्या लष्करी सेवेत आहेत. केरळ मधील वायनाड येथे पावसाने ओढवलेल्या नैसर्गिक संटकात मेजर सीता शेळके यांच्या नेतृत्वाखालील टिमने अवघ्या ३१ तासात पुलाची उभारणी करून मदत कार्यासाठीचा मार्ग सुकर करून दिला.मेजर सीता शेळके यांच्या टिमने दाखवलेल्या तत्परतेने पुरग्रस्तांना मोठी मद्दत झाली.

या सर्व प्रक्रीयेत आपले कर्तृत्व दाखवणारी सीता शेळके ही प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची माजी विद्यार्थीनी असून संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०१० साली मॅकेनिकल विभागातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

    मोठ्या प्रमाणात वायनाड येथे झालेल्या  पावसाने  आसपासची चार गावे नाहीशी झालेली होती. आणि मुख्य म्हणजे या गावांशी संपर्क करण्यासाठी  असलेला नदीवरील जुना पूल नष्ट झाला होता. या गावांतील बचावलेल्या नागरीकांना मदत पोहोचवण्यासाठी  पुलाची उभारणी करायला पाहिजे होती.

 ज्या दिवशी ही दुर्घटना घडली आणि लष्कराला माहिती मिळाली त्याच दिवशी बंगळूरू येथील मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपने आपले सत्तर जवान आणि पुलासाठी अत्यावश्यक  साहित्य सुमारे २० गाड्यांमध्ये भरून रवाना केले. या तुकडीचे नेतृत्व  या तुकडीतील एकमेव महिला अधिकारी मेजर सीता अशोकराव शेळके यांच्याकडे होते.

सिता शेळके यांनी केलेल्या अथक परिश्रमाचे आणि त्यांच्या टिमच्या कार्याचा मोठा अभिमान प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेस असून, देश सेवे बरोबरच लष्काराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी अतिशय धैर्याने बजावणार्या सीता शेळके आणि त्यांच्या टिमचे मंत्री विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहै.

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिरचे यश

पुणे येथील शिवछत्रपती स्टेडियम बालेवाडी येथे झालेल्या सुब्रतो मुखर्जी राज्यस्तरीय  फुटबॉल स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणीच्या १७ वर्षे वयोगटाच्या संघाने नाशिक संघाचा ४-० ने पराभव करत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

प्रवरेच्या कृषी व संलग्नित महाविद्यालयांना आएसओ 9001:2015 मानांकन प्राप्त

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी आणि संलग्नित महाविद्यालयांना नुकतेच आयएसओ 9001:2015 मानांकन प्राप्त झाले आहे.

प्रवरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर संस्थेचा नावलौकिक मिळवला-सौ शालिनीताई विखे पाटील

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केलेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची प्रवरा हायस्कूल ही एक नामांकित शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थी,शिक्षक आणि पालकांनी एकमेकांच्या साह्याने उत्तम प्रगती साधली आहे.विद्यार्थ्यानी येथील माजी विद्यार्थ्याचा आदर्श घेऊन पुढे जावू आपले स्वप्न पुर्ण करावे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्याकोल्हार येथील प्रवरा हायस्कूल या सीबीएसई शाळेच्या ४८ व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात सौ.विखे बोलत होत्या. यावेळी प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे पाटील,स्कूल च्या माजी विद्यिर्थीनी सौ. अनिता हरिभाऊ खर्डे, सौ.कोमल वडीतके,अशोक असावा, संभाजी देवकर,प्रशांत खर्डे, गोरख खर्डे,आबासाहेब राऊत ,प्रा नंदकुमार दळे,सुनील शिंदे, प्राचार्य सुधीर मोरे,यांच्या सह सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सौ.विखे पाटील म्हणाल्या,सी बी एस ई चा अभ्यासक्रम नुकताच सुरू केलेल्या या शाळेने अल्पावधीतच उत्तम असे यश संपादन केले आहे.मुलांनी माजी विद्यार्थ्यांना आदर्श म्हणून ठेवावे. या शाळेचे विद्यार्थी देश परदेशामध्ये आपले आणि आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करीत आहे. कोल्हार सारख्या ग्रामीण भागामध्ये प्रवरेने अत्यल्प फिमध्ये सर्वांसाठी शिक्षण उपलब्ध करून दिलेले आहेत.शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी मेहनत घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
केले.
शाळेचे माजी विद्यार्थिनी शाखाधिकारी स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र अनिता खर्डे आणि बँक ऑफ इंडियाच्या कृृषि अधिकारी कोमल वडीतके यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेहनत,जिद्द त्याचप्रमाणे अदनाधारकपणा या गुणांचा आत्मसात करण्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे प्राचार्य सुधीर मोरे यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मिताली अंबुलगेकर आणि प्रा. प्रिया कडसकर यांनी केले. कु. संस्कृती पानसरे हिने मानले.

वात्सल्य सिंधू बीज बॅक, डॉ.विखे पाटील महाविद्यालयाचा उपक्रम

गावरान बियाणे आरोग्यादाायी आहेत.या वाणांचे महत्व आणि जुन्या वाणाचे जतन करण्यासाठी वात्सल्यसिंधू बीज बँक विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास व्यक्त करतानाच या माध्यमातून जुन्या वाणांचे जतन होण्यास मदत होईल असे प्रतिपादन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागाने सुरू केलेल्या वात्सल्यसिंधू बीज संग्रहालयाचा शुभारंभ सौ. विखे पाटील यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी संस्थेचे शिक्षण संचालक आणि प्राचार्य डाॅ. प्रदीप दिघे, कॅम्पस संचालक डॉ. राम पवार या विभागाचे प्रमुख डाॅ. अनिल वाबळे, वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. महेश खर्डे, प्रा. छाया गलांडे, डॉ. शांताराम चौधरी आदींसह वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.

यावेळी बोलतांना सौ. विखे म्हणाल्या की, प्रवरेच्या माध्यमातून शिक्षणासोबतच विविध उपक्रम नेहमी सुरू असतात याच माध्यमातून वासल्यसिंधू बीज संग्रहालय हा उपक्रम शेतकऱ्यांच्या करीता मार्गदर्शक ठरेलच पण भविष्याच्या दृष्टीने कृषी आणि वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्याना संशोधनासाठी खूपच उपयुक्त ठरेल.

जुन्या वाण्याचं बीज जतन करण्यासाठी सुध्दा सदर उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल असे सांगतानाच या माध्यमातून बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या बियाणा बरोबरच शेतकऱ्यांकडून संकलित केलेल्या बियाणाचे संग्रहालय या बीज बँकेच्या माध्यमातून विकसित करण्यात मोठी मदत होईल. जुने वाण त्याचबरोबर त्यांचा औषधी वापर याविषयीची जनजागृती होण्यास बीज बॅकेच्या माध्यमातून काम करण्याचे आवाहन सौ.विखे यांनी केले.

प्रारंभी डॉ. आर. ए. पवार यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती देतांना वनस्पतीशास्त्र विभागाच्या माध्यमातून प्रवरा परिसरातील २५ शाळा महाविद्यालयांमध्ये औषधी वनस्पती उद्यान हा उपक्रम देखील सुरू आहे. तर डाॅ.अनिल वाबळे यांनी या माध्यमातून जुन्या वाणांचा प्रचार प्रसार आणि त्याचे जतन करण्याचं काम महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या माध्यमातून करुन या बीज बॅकेची व्याप्ती वाढणार असून यामुळे शेतक-यांना बियाणे पुरवठा करण्याबरोबरचं विद्यार्थ्याच्या संशोधनाला चालना मिळले असे डाॅ. वाबळे यांनी सांगितले.