लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित )प्रवरा ग्रामीण शिक्षण शिक्षण संस्था. प्रवरामनगर ,शिर्डी साई रूरल इन्स्टिटयूट,राहता,जनसेवा फाउंडेशनलोणी बुद्रुक आणि प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या संलग्नित एकून पंधरा महाविद्यालयांचा एकत्रित पदवीग्रहण समारंभ शनिवार दि २९ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० वा. आयोजित करण्यात आला असल्याची माहिती या महाविद्यालयांच्या वतीने देण्यात आली.
प्रवरा कन्या शैक्षणिक संकुलातील गंगुबाई विखे पाटील इनडोअर स्टेडियम मध्ये होणाऱ्या या पदवीदान समारंभामध्ये पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित )प्रवरा ग्रामीण शिक्षण शिक्षण संस्था. प्रवरामनगर ,शिर्डी साई रूरल इन्स्टिटयूट,राहता,जनसेवा फाउंडेशनलोणी बुद्रुक आणि प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ संलग्नित महाविद्यालयांतिल स्नातकांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून यावेळी आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ, शालिनीताई विखे पाटील, माजीमंत्री श्री आण्णासाहेब म्हस्के पाटील संस्थेचे विश्वस्त व सचिव श्री आबासाहेब खर्डे पाटील,प्रवरा अभिमत विदयापीठाचे प्र. कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.
शैक्षणिक परिश्रमातून विद्यार्थ्यांना मिळणारी ‘ पदवी ’ हा त्यांच्या जीवनातील सर्वात आनंदी व समाधानाचा असणारा क्षण. उज्वल भविष्याची वाटचाल करताना नवनवीन नोकरीच्या संधी प्राप्त करणे तसेच स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करणे या साठी विद्यार्थ्याने घेतलेली पदवी ही महत्वाची असते. म्हणूनच.सहकारी साखर कारखानदारीच्या यशस्वी उभारणीनंतर पद्मश्री विखे पाटील यांनी खेड्यातील मुले पदवीधर व्हावीत या उद्देशाने १९६४ साली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करून शेतकरी,शेतमजूर आणि बहुजन समाजातील मुलांना सुरवातीला पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयच्या माध्यमातून उच्च शिक्षणाची कवाडे खुली करून दिली.
त्यानंतर पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी वेगवेगळ्या संस्थांच्या माद्यमातून सर्वांगीण शिक्षणाचा मोठा विस्तार केला.आज लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित )प्रवरा ग्रामीण शिक्षण शिक्षण संस्था. संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयातून सुमारे ४२हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यातील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक शिक्षण देणारे लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय, सात्रळ येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय. आश्वी येथील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय , कोल्हार येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तसेच लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रीकी महाविद्यालय, प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्र महाविद्यालय, प्रवरा ग्रामीण आर्किटेक्चर महाविद्यालय, प्रवरा ग्रामीण शारीरिक शास्र महाविद्यालय, प्रवरा ग्रामीण शिक्षणशास्र महाविद्यालय आणि सिन्नर येथील सर विशवेसरय्या इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी महाविद्यालय),मोहू येथील आर्किटेक्चर महाविद्यालय, राहता येथील शिर्डी साई रूरल इन्स्टिटयूटचे कला विज्ञान व ,राहता,जनसेवा फाउंडेशन लोणी बुद्रुक या संस्थेचे शेंडी (अकोले ) येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय, तसेच प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळाचे पुणतांबा येथील कला, वाणिज्य महाविद्यालय,सवंस्तर येथील कला, वाणिज्य, आणि विज्ञान महाविद्यालय आदी महाविद्यालामधील स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
या पदवीदान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक डॉ.के टी व्ही रेड्डी, डॉ हरिभाऊ आहेर, प्रा दिगंबर खर्डे विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय गुल्हाने , औषधनिर्माणशास्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे, प्राचार्य डॉ.राम पवार, प्राचार्या जयश्री शिणगर , आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्राचार्या राजेश्वरी जगताप, प्रवरा ग्रामीण शिक्षण शास्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्या वाजे, शारीरिकशास्र महाविद्यालयाचे प्राचार्य विजय आमरे,डॉ. बाबासाहेब सलालकार,डॉ. सय्यद डॉ. सदाफळ यांनी केले.