प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी चे NMMS परीक्षेत घवघवीत यश

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परीक्षेत प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय लोणी या विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे.

या परीक्षेसाठी 55 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी 47 विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून पात्र ठरल्या आहेत. विद्यालयाचा शेकडा निकाल 85.45 इतका लागला आहे. तसेच 13 विद्यार्थिनींनी 100 पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत.

यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन.