युवकांच्या हाताला काम मिळावे या साठी विशेष कौशल्याचे प्रशिक्षण- प्रा. धनंजय आहेर.
भविष्यातील रोजगार संधी ओळखून तरुणांमधील उद्यमशीलतेला पुरेपूर वाव देण्यासाठी प्रवरेतील विविध महाविद्यालयांमधील प्रत्येक युवक-युवतींना उत्तम व दर्जेदार कुशल प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक युवकांच्या हाताला काम मिळावे या साठी विशेष कौशल्याचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती प्रवरा कौश्यल्य विकास विभागाचे संचालक प्रा धनंजय आहेर यांनी दिली.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था व प्रवरा स्किल डेव्हलपमेंट विभागाच्या वतीने लोणी येथील आय. टी. आय कॅम्पस मध्ये जागतिक ‘कौशल्य विकास दिन’ साजरा करण्यात आला. प्रा. धनंजय आहेर बोलत होते. या प्रसंगी प्रा. ए.एच. अन्सारी सर, शैलेश कुलधरण व संस्थेचे विविध शाखेतील सर्व समन्वयक उपस्थित होते .या वेळी प्रा. आहेर यांनी कौशल्य काळाची कशी गरज आहे व ते विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त कशी पोहचेल या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच. प्रा. अन्सारी यांनी कौशल्य विकास मध्ये असणारे विविध योजना बद्दल माहिती सांगून त्या योजनेचे फायदे सांगितले.व सर्वाना कौशल्य विकास दिनाच्या शुभेच्या दिल्या