राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला आणि खासदार डॉ . सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाज प्रबोधनाबरोबरच प्रवरा परिसरातील मुला-मुलींच्या उपजत कला,क्रिडा गुणांना वाव देताना स्थानिक नागरिकांना आपल्याच मुलांच्या सादरीकरणातून मनोरंजन व्हावे आणि खेड्यातील मुला-मुलींमध्ये आत्मविश्वासही निर्माण व्हावा या करिता सोमवार दिनांक २ ते गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर २०१९ या कालावधीमध्ये ‘प्रवरा सामाजिक प्रबोधन व क्रीडा महोत्सव २०१९ “चे आयोजन करण्यात आले आहे.
प्रवरा आणि गणेश परिसरातील राहता,श्रीरामपूर, राहुरी आणि संगमनेर तालुक्यातील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालये, गणेश प्रसारक मंडळ, सेंट जॉन स्कूल ,प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुल , नगर पालिकांच्या शाळा आदींसह विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना या सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवामध्ये सामावून घेण्यात आलेले आहे. यासाठी स्थानिक नागरिकांच्या सहभागाबरोबरच प्रवरा परिसरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील शिक्षकांच्या विविध कमिट्या स्थापन करून अतिशय सुसुत्रतबद्ध आणि नेटके नियोजन करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक २ सप्टेंबर रोजी प्रवरा परिसरातील लोणी, प्रवरानगर,कोल्हार,सात्रळ, आणि आश्वी या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना होऊन या महोत्सवाला सुरवात होणार आहे. सार्वजनिक गणेश उत्सवाला “सामाजिक प्रबोधनाची’ जोड देऊन सामाजिक शांततेची पावती ” ठरणाऱ्या या ‘प्रवरा सामाजिक प्रबोधन व क्रीडा महोत्सवा’च्या माध्यमातून तरुणांमधील सांघिक भावना व्यापक करताना त्यांच्यातील कलागुणांचा विकास होण्यासाठी महत्वाचे व्यासपीठ ठरणार आहेच परंतु मनोरंजनासाठी व्यावसायिक कलाकारांकरिता होणारा खर्च टाळून तो आपल्याच मुला-मुलींसाठी व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी होत असल्याने खेड्यातील मुलांमध्येही आत्मविश्वास निर्माण करणारा ठरेल आणि स्थानिक नागरिकांनाही आपल्या मुला – मुलींचे कौतुक पाहताना येईल आणि मनोरंजन होईल विशेषतः महिलांना मनोरंजनाची संधी या माध्यमातून मिळणार आहे.
एकंदरच खेड्यातील मुला-मुली मधील उपजत कला, क्रीडा गुणांचा विकास, स्पर्धेच्या माध्यमातून सांघिक भावनेची निर्मिती, समाज प्रबोधकरांच्या वाणीतून सामाजिक प्रबोधन, पालकांना आपल्या मुला-मुली मधील कला-क्रीडा गुण हेरतानाच स्थानिक नागरिकांना करमणुकीचे साधन असी तरुणाईच्या अवांतर विकासाची पंच सूत्री या ‘प्रवरा सामाजिक प्रबोधन व क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून साधली जाणार आहे.उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांसाठी विविध बक्षिसांचे लकी ड्रॉ ठेवण्यात आली असून गुरुवार दि १२ सप्टेबर २०१९ रोजी सत्यनारायण पूजा होऊन गणपती वित्सर्जनाणे या महोत्सवाची सांगता होणार आहे.