कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालय तसेच सिमॅसेस लर्निंग एलएलपी संस्थेच्या पुढाकारातून कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत दुग्ध उत्पादक शेतकरी आणि उद्योजगता या अभ्यासक्रमाचे नुकतेच लोणी येथे उदघाटन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी म.फु.कृ.वि. राहुरीचे विभागीय समन्वयक डॉ. दिलीप क्षीरसागर,संस्थेचे कौशल्य विकास संचालक प्रा. धनंजय आहेर , महाविद्यालाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे, ,अभ्यासक्रम प्रशिक्षक श्री. सुशांत सांबारे, श्री. अभिषेक सापटे, प्रशिक्षण समन्वयक मालती बनसोडे,कौशल्य विकाससमन्वयक प्रा. प्राची शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.
केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषिक्षेत्रात व्यवसाईक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक युवतींना मोफत रोजगरक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयापैकी लोणी येथील कृषी महाविद्यालयाची निवड झाली त्यानुसार दुग्ध उत्पादक शेतकरी आणि उद्योजगता या अभ्यासक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
फोटो कॅप्शन :-पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना आणि छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत लोणी येथील कृषी महाविद्यालयामध्ये ‘दुग्ध उत्पादक शेतकरी आणि उद्योजगता’ अभ्यासक्रमाचे उदघाटन प्रसंगी कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,म.फु.कृ.वि.चे विभागीय समन्वयक डॉ. दिलीप क्षीरसागर,प्रा. धनंजय आहेर , प्राचार्य प्रा. निलेश दळे, ,श्री. सुशांत सांबारे, श्री. अभिषेक सापटे, मालती बनसोडे प्रा. प्राची शिंदे आदि