महिलांकडे पॅनल इकॉनॉमी असल्यानेच आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून बचत गटांतील ९७ हजार महिलांना रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी निर्माण केल्या होत्या. आता शिर्डी या आंतरराष्ट्रीय धार्मिकस्थळला भेट देणाऱ्या सुमारे तीन कोटी भाविकांच्या संख्येचा विचार करून टाटा केमिकल्स सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) च्या कस्तुरी विभागाने ग्रामीण भागातील बचत गटांना मार्गदर्शन करून राज्यातील महिलाबचत गटांना प्रेरणादायी ठरेल असे काम करावे अशी अपेक्षा माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
लोणी येथे जनसेवा फौंडेशन व पंचायत समिती राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंम सिद्धा यात्रा राहाता तालुकास्तरिय सक्षम महिला महोत्सव २०१९ भव्य प्रदर्शन विक्री खाद्य महोत्सवाचे उदघाटन करताना माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे बोलत होते याप्रसंगी माजी मंत्री आणासाहेब म्हस्के पाटील,टाटा केमिकल्स सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) च्या कस्तुरी विभागाच्या प्रमुख मुग्धा शहा ,प्रशिक्षण प्रमुख डॉ. मंजुषा कदम ,प स सभापती हिराबाई कातोरे,उपसभापती बबलू म्हस्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर,शिर्डी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अर्चना कोते,तहसीलदार कुंदन हिरे, जितेंद्र मेटकर, भारत घोगरे ,प्रकल्प संचालक रुपाली लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी श्री विखे पाटील म्हणाले कि, महिलांमध्ये कर्तृत्व सिद्ध करण्याची जिद्द असते ,जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ना. सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी स्वयंसिध्दा यात्रेच्या माध्यमातून बचत गटातील महिलानांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचे मोठे काम केले असून, जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपणही सुमारे ९७ हजार महिलांना कर्जाच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न केला होता. ९८ टक्के कर्जाची वसुली असलेल्या महिलांच्या बचत गटांना भांडवलाबरोबरच प्रशिक्षण देऊन हे गट उत्पादित करीत असलेल्या वस्तूंचे वर्गीकरण करून टाटा केमिकल्स सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) च्या कस्तुरी विभागाने राज्यातील महिलांना प्रेरणादायी ठरेल असे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करताना या कामी सहकार्य करीत असलेल्या नाबार्ड बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांचे आभार व्यक्त केले.
टाटा केमिकल्स सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) च्या कस्तुरी विभागाच्या मुग्धा शहा, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान २०१८ मधील उत्कृष्ठ ग्राम पंचायत पुरस्कार, बचत गटांना कर्ज वाटप ,तालुकास्तरीय हिरकणी पुरस्कार प्राप्त बचत गटांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जी प. सदस्या सौ. कविताताई लहारे, पुष्पाताई रोहम,दिनेश बर्डे, शाम माळी,प. स सदस्य उमेश जपे, भारत अंत्रे,संतोष ब्राह्मणे, काळू राजपूत,सौ. अर्चनाताई आहेर, शोभाताई जेजुरकर,सौ.नंदाताई तांबे,सौ.सुवर्णाताई तेलोरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे,तालुका कृषी अधिकारीडॉ. बापूसाहेब शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, लोणी बु;चे सरपंच लक्ष्मण बनसोडे,उपसरपंच अनिल विखे, लोणीखुर्दच्या सरपंच सौ. मनीषा आहेर, उपसरपंच सौ. सुवर्ण घोगरे यांचे सह महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.