धड्पडकरून कोषातून बाहेर पडनारा पतंग जीवनातील प्रयत्नांद्वारेच प्रत्येक गोष्ट शिकत पुढे जातो. त्याच प्रमाणे ध्येय प्राप्ती अशक्य कधीच नसते त्यासाठी जीद्द,चिकाटी, आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणे ज्याला शक्य होईल तो जीवनात यशस्वी होतॊच असे प्रतिपादन पद्मश्री विखे पाटील सैनिकी स्कुल आणि सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थे (एस.पी.आय.) चे माजी विद्यार्थी आणि सध्या गोरखा रेजिमेंटचे प्रमुख मेजर निखिल निकम यांनी केले.
लोणी पद्मश्री विखे पाटील सैनिकी स्कुल आणि सैनिकी सेवापूर्व शिक्षण इन्स्टिट्यूटच्या (एस.पी.आय.) च्या २२ व्या स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात मेजर निखिल निकम बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी लोणी खुर्दच्या सरपंच सौ. मनीषा आहेर,प्रवरा ग्रामीन शिक्षण संस्थेचे सदस्य ज्ञानदेव म्हस्के,आप्पासाहेब दिघे, सदस्य व सचिव श्री भारत घोगरे, शिक्षणाधिकारी प्रा. विजय आहेर, कन्या कॅम्पसच्या संचालक सौ. लीलावती सरोदे,गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कुलच्या प्राचार्या सौ संगिता देवकर, प्रवरा पब्लिक स्कुलचे प्राचार्य सयाराम शेळके, प्रवरा हाईसस्कुलचे प्राचार्य श्री निर्मळ ,विलास शेळके,सौ. ज्योती कौशिक तसेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एन डी ए) परीक्षेची तयारी करणारे माजी विदयार्थी श्री आदित्य कासार,रौमिक चोखंडे,राज करणोरे आणि सत्यम सानप आदी मान्यवर उपस्थित होते . प्रारंभी शाळेचे कमांडण्ट कर्नल डॉ. भरतकुमार यांनी स्वागत तर, प्राचार्य सुधीर मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या वार्षिक प्रगतीचा अहवाल सादर केला.
भारत गाढवे, रमेश दळे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक आणि क्रीडा पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक पारितोषिकांमध्ये सिद्धांत शेळके,तन्मय पवार,सुशील पुरी,महेश ढाकळे,आणि क्रीडा पारितोषिकांमध्ये मृणाल तारडे ,यश कुताल,निरंजन गांगर्डे,गौरव माधावी तर ,सर्वसमावेशक सिध्दांत शेळके,जयगलांडे,तेजस पारखे,महेश ससाणे यांचा समावेश होता . यावर्षीची चॅम्पियन ट्रॉफी वैद्दय हाऊस ने प्राप्त केली. या वेळी जबाबदारी पेक्षा सरस कामगिरी केलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांचाही सन्मान करण्यात आला. या मध्ये भारत गाढवे,इसाक पठाण,रमेश दळे,अकिल शेख,आर एम मोरे,बी. ए कुलांगे,प्रमोद देशमुख,विनय धालयांत,शहाजी मगर,दीपक ढोणे, संतोष कांबळे,विनोद शिरसाठ,अण्णासाहेब पगारे, संदीप पडघलमल,गणेश काळे, सौ. सविता दिवे,सौ सुनिता खोडे यांना सन्मानित करण्यात आले.
तर, प्रा. राजेश माघाडे आणि सुनील ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर, भारत हमको जनसे भीप्यारा है. हि थीम असलेला सांकृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांची उपस्थीतीउल्लेखनीय होती शेवटी इसाक पठाण यांनी आभार व्यक्त केले.