लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या कॅम्पस मुलाखतीमध्ये बेंगलोरस्थित जी व्ही के बायो सायन्स प्राव्हेट लिमिटेड, हैदराबाद या बहुराष्ट्रीय कंपनीने महाविद्यालयातील एम एस सी केमिस्ट्री विभागातील १५ विद्यार्थ्यांची तीन लाख रुपये असे आकर्षक पैकेज देऊन नोकरीसाठी निवड केली असल्याची माहिती संस्थेचे प्लेसमेन्ट विभागाचे संचालक प्रा. धनंजय आहेर यांनी दिली.
जी व्ही के बायो सायन्स कंपनीने पद्मश्री विखे पाटील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या कॅम्पस मुलाखतीमध्ये सुमारे १६६ सहभाग घेतला या पैकी १५ विद्यार्थ्यांची तीन लाख रुपये असे आकर्षक पैकेज देऊन नोकरीसाठी निवड केली आहे. या वेळी जी व्ही के बायो सायन्स कंपनीचे वरिष्ठ संचालक डॉ.अनिल पाल, सहा संचालक डॉ प्रादीपत सिन्हा, एच आर मॅनेजर पुजा धिल्लोन, उपसंचालक आदित्य दोन्नती आदी उपस्थित होते.
माजी मंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटीलयांच्या संकल्पनेतून आणि नाबार्डचे माजी चेअरमन व संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट विभागातर्फे सातत्याने विविध महाविद्यालयांमध्ये परिसर मुलाखतींचे आयोजन केले जात असून त्याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी होत आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, सहसचिव श्री. भारत घोगरे, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. के. टी. व्ही रेड्डी,डॉ. हरिभाऊ आहेर,आस्थापना संचालक प्रा. दिगंबर खर्डे, प्राचार्य डॉ प्रदीप दिघे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
फोटोकॅप्शन :- पदमश्री विखे पाटील कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये जी व्ही के बायो सायन्स प्राव्हेट लिमिटेड, हैदराबाद या बहुराष्ट्रीय कंपनीने आयोजित केलेल्या परिसर मुलाखतीद्वारे १५ विद्यार्थ्यांची नोकरी साठी निवड झाल्याने त्यांचा गौरव करताना प्लेसमेन्ट विभागाचे संचालक प्रा. धनंजय आहेर ,प्राचार्य डॉ प्रदीप दिघे ,प्रा दत्तात्रय थोरात आणि शिक्षक