महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यातर्फे नाशिक येथील संदीप तंत्रनिकेतन येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत लोणी येथील विखे पाटील तंत्रनिकेतनचे विदयार्थी चमकले असून चांगली कामगीरी करत तृतिय क्रमांकाचे पारितोषिक पटकावीले असल्याची माहीती प्राचार्य प्रा.दशरथ मगर यांनी दिली.
विखे पाटील तंत्रनिकेतनचे मेकॅनिकल विभागाचे महेश वणे, निलेश खर्डे हे विद्यार्थ्यी या प्रश्नमंजुषा स्पर्धेत तृतिय क्रमांकाचे पाच हजार रूपयांचे बक्षिसाचे मानकरी ठरले आहे. तसेच चेतन कोकाटे, कुणाल बेंद्रे यांचीही कामगीरी सरस झाली आहे. त्यांना विभाग प्रमुख प्रा.राजेंद्र बेलकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कल्पक नेतृत्वाने अभ्यासक्रमाच्या पलिकडे जावून प्रवरेत अत्याधुनिक शिक्षण पध्दती सुरू आहे. आमचे विद्यार्थी सर्व स्तरावर आघाडीवर आहेत. विद्यार्थी केंद्रबिंदू माणून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे प्राचार्य प्रा.दशरथ मगर यांनी सांगितले.
फोटो कॅप्शन – लोणीः विखे पाटील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत यश प्राप्त केल्याबद्द्ल त्यांचा सत्कार करताना प्राचार्य प्रा. दशरथ मगर.