प्रवरा कृषी व कृषी सल्ग्नित महाविद्यालायान्द्वारे ग्रीनलाईफ अग्रो इंडस्ट्री प्रा. लि. नेवासा या नामांकित कंपनीशी औद्योगिक व शैक्षणिक सामंज्यस करार झाला असल्याची माहिती प्राचार्य रोहित उंबरकर यांनी दिली.
या सामंज्यस कराराद्वारे संस्थेंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय ,कृषी जैवतंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय व व्यवस्थापन या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रशिक्षण कार्यशाळा, शेतकरी मेळावे, अनुभवी उद्योगांचे मार्गदर्शन व नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याचे ग्रीनलाईफ कंपनीचे अध्यक्ष किरण जोंधळे यांनी सांगितले . कृषी व कृषी सलग्न महाविद्यालयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य. निलेश दळे,कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य. रोहित उंबरकर, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. ऋषिकेश औताडे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारासाठी ट्रेनिंग व प्लेसमेण्ट अधिकारी प्रा. रमेश जाधव, प्रा. धीरज कारले यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो कॅप्शन :-प्रवरा कृषी व कृषी सल्ग्नित महाविद्यालायानी नेवासा येथील ग्रीनलाईफ अग्रो इंडस्ट्री प्रा. लि. या नामांकित कंपनीशी औद्योगिक व शैक्षणिक सामंज्यस करारावर स्वाक्षरी करताना ग्रीनलाईफ कंपनीचे अध्यक्ष किरण जोंधळे, कृषी व कृषी सलग्न महाविद्यालयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य. निलेश दळे,कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य. रोहित उंबरकर, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. ऋषिकेश औताडे, ट्रेनिंग व प्लेसमेण्ट अधिकारी प्रा. रमेश जाधव, प्रा. धीरज कारले आदी.