लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयातीळ अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांनी कार्यानुभवातून विविध दुग्धजण्यपदार्थांची निर्मिती करून त्याची विक्री केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी दिली.
कृषी पदवीच्या अभ्यासक्रमानुसार अंतिम सत्रात विद्यार्थ्याला प्रत्यक्ष व्यावसायिक ज्ञान मिळावे यासाठी त्यांना महाविद्यालयात विविध विभागात कार्यानुभव कार्यक्रम असतो. त्यानुसार कृषी महाविद्यालयातील पशु विज्ञान व दुग्ध शास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. दीपाली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कु. अश्विनी लबडे, कु. सायली एखंडे , अमोल पवार ,शुभम गव्हाणे ,ज्ञानेश्वर पाठक,तुषार उगले , परमेश्वर हगारे ,निलेश मगर , सुरज पवार आदि विद्यार्थ्यांनी पेढा, गुलाबजामून, पनीर,व्हे ड्रिंक्स , सुगंधी दुध इ. पदार्थांची निर्मिती केली.त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन परीसरत विक्री केंद्र सुरु करून पदार्थ विक्रीचा अनुभव घेतला. संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी या विक्री केंद्रास भेट देऊन विद्यार्थांच्या उपक्रमाचे कौतुक केले.