गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रवरा हे कायम प्रगतीपथावर आहे. आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांची एकत्रित सांगड घालण्याची गरज आहे अकरावी हा विद्यार्थ्यांचा पाया असतो त्या दृष्टीने हा पाया भक्कम करण्याचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचा आहे यासाठी प्रत्येकानं आपलं योगदान द्यावे असे प्रतिपादन लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुष्मिता विखे पाटील यांनी केले. लोणीच्या पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित अकरावीच्या पालक मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या.
यावेळी पालकांशी संवाद साधतांना डॉ. सुष्मिता विखे पाटील म्हणाल्या, अकरावी हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया आहे. हा पाया भक्कम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. प्रवरेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण आणि सर्वोत्तम शिक्षण हाच हेतू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणातून पुढे जाण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम शालेय पातळीवरती सुरू आहेत. या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थी हा जागतिक पातळीवर पोहोचत आहे. याचाही आनंद मोठा असला तरी देखील आज पालकांनी देखील आपल्या मुलांबाबत जागृत राहण्याची गरज व्यक्त करताना मुलांना चांगले संस्कार करतांना त्यांच्याबरोबर दररोज पंधरा मिनिटे चर्चा करा. त्यांना समजून घ्या त्यांना येणाऱ्या अडचणी काय आहेत त्या जाणून घ्या आपण स्वतः मोबाईल पासून दूर राहा आपण वाचन आणि आपण वाचन आणि खेळ खेळा तेव्हा मुले खेळतील. विद्यार्थी हा पालकांचा अनुकरण करत असतो तेव्हा आपण संस्कार करत असताना ती सुरुवात आपल्यापासून करा असे सांगून शिक्षणासोबतच प्रवरेच्या माध्यमातून संस्कृतीचा ही जतन होत आहे. सहकारातून समृद्धीकडे या माध्यमातून प्रवरा गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवल्या विविध उपक्रमातून ग्रामीण विद्यार्थी हे कुठेही कमी नाही याची जाणीव विद्यार्थ्यांनी करून दिली. येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये देखील प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये प्रवरा नवरात्र उत्सव हा विशेष उपक्रम हाती घेतला जाणार असल्याचे सांगतानाच या उपक्रमाच्या माध्यमातून घटस्थापना का करायची या मागील उद्देश त्याचबरोबर महिलांचे यशस्वी महिलांचे व्याख्याने आणि दुर्गा सप्तशती पाठ असे विविध उपक्रम शालेय पातळीवरती राबवून भारतीय संस्कृतीचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. विद्यार्थीची जेवढी चिंता तुम्हाला आहे तेवढीच आम्हाला आहे त्यामुळे एकत्रित काम करून आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम आपण करूया आणि यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे असेही त्यांनी सांगितले.