इंडस्ट्रीना पाहिजे असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे प्रयत्न प्रवरा औद्योगिक प्रशिक्षण संस्थे(आय.टी.आय.) मध्ये होत असल्यानेच इंडस्ट्री आणि प्रशिक्षण संस्थांमधील अंतर कमी होऊन प्रवरा आय.टी.आय मधील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरया उपलब्ध होत असल्याबद्दल ब्रीलीयंट बर्ड स्कूलच्या संचालिका सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
लोकनेते डो. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लिनी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मध्ये औरंगाबाद येथील एन.आर.बी. बेअरिंग्स , व्हेरॉक इंडस्ट्रीज व ऋचा इंजिनीरिंग या कंपनीच्या वतीने घेण्यात आलेल्या भारती मेळाव्यामध्ये सुमारे ९५ विद्यार्थ्यांची नोकरी साठी निवड झाल्याने सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी याविद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या पूर्वीही मोठ्या प्रमाणावर नोकर्यांसाठी विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे प्राचार्य जयंत धर्माधिकारी यांनी या वेळी सांगितले.
परीक्षेनंतर लगेचच या कंपनीमध्ये रुजू होणार्या विद्यार्थ्यांमध्ये वेल्डर विभागातील १९ वायरमन विभागातील ४ इलेकट्रीशियन विभागातील ३५, फिटर विभागातील २१, इलेक्ट्रॉनिक्स विभागातील १३ व मोटार मेकॅनिक विभागातील ३ विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती धर्माधिकारी यांनी दिली. प्रवरेचे जास्तीत जास्त विद्यार्थी कंपन्यांमध्ये नोकरीला लागावे याकरिता प्लेसमेंट सेल कार्यरत असल्याची माहिती प्रा. धनंजय आहेर यांनी यावेळी दिली. कंपनीच्या वतीने श्री. गिराम सर, श्री. शिसोदे सर, श्री.रामपल्लीवार सर व श्री. उऱ्हेकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कंपनीबद्दल माहिती दिली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील , जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष्या सौ. शालिनीताई विळे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य. कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे , टेक्निकल डायरेक्टर डॉ. रेड्डी, डॉ. हरिभाऊ आहेर आदींनी अभिनंदन केले.