औषधाच्या होणार्या गैरवापर विरोधी आंतरराष्ट्रीय दिनानामित्त लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालयामध्ये प्रवरा औषध निर्माण शास्र महाविद्यालयाच्या वतीने औषधांचे होणारे गैरवापर, त्यातून होणारे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.
या चर्चा सत्रासाठी विद्यालयातील सर्व विध्यार्थी- विध्यार्थिनी तसेच मुख्याधापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्तीत होते . यावेळी महाविद्यालयाचे मुख्याधापक निवृत्ती येणगे यांनी प्रास्तविक केले. त्यानंतर प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्रा.डॉ. संजय भवर यांनी औषधांचे होणारे गैरवापर, त्यातून होणारे दुष्परिणाम अधोरेखीत करून त्यासंबंधित मार्गदर्शन केले त्यात त्यांनी औषधांचा होणारा गैरवापर कसा टाळावा व मानवी जिवनावर होणारे दुष्परिणाम कसे टाळावे यासंबंधी जनजागृती केली, सदर सत्राचे आभार प्रा. मयूर भोसले यांनी मानले.